प्रदेश कार्यालयात नेते येताच, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी; राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर हालचाली वाढल्या

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अनिल देशमुख, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, फौजिया खान, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, राजेश टोपे हे पोहचले आहेत.

प्रदेश कार्यालयात नेते येताच, कार्यकर्त्यांची जोरदार घोषणाबाजी; राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर हालचाली वाढल्या
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 11:25 AM

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा शरद पवार यांनी दिला आहे. तो राजीनामा मागे घ्यावा यासाठी अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी युवती कॉंग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाच्या मोठी गर्दी केली आहे. शरद पवार हेच अध्यक्ष रहावेत यासाठी कार्यकर्ते आणि पदाधिकारी आग्रही आहे. त्याच पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात बैठक होणार आहे. या बैठकीला राज्यातील महत्वाचे नेते उपस्थित आहे. त्यामध्ये अनेक नेत्यांनी शरद पवार हेच अध्यक्ष राहावे अशी भूमिका आजवर मांडली असून तसा ठराव केला जाणार असल्याचे बोलले जात आहे. त्याच बैठकीसाठी अनेक नेते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात पोहचत आहे.

याच दरम्यान राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या प्रदेश कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, सुनील तटकरे, अनिल देशमुख, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रफुल्ल पटेल, फौजिया खान, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड, दिलीप वळसे पाटील, एकनाथ खडसे, राजेश टोपे हे पोहचले आहेत. त्याच दरम्यान बाहेर आंदोलन करत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी यातील काही नेत्यांच्या एन्ट्री वेळी जोरदार घोषणाबाजी केली आहे.

यामध्ये सुप्रिया सुळे, अजित पवार यांच्या एन्ट्रीवेळी शरद पवार हेच अध्यक्ष राहावे अशी मागणी करणाऱ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. यामध्ये देश का नेता कैसा हो… शरद पवार जैसा हो… अशा घोषणा देण्यात आला. यावेळी मात्र कार्यकर्त्यांनी आवाज वाढवून या दोन्ही नेत्यांकडे बघून घोषणा दिल्या.

हे सुद्धा वाचा

खरंतर शरद पवार यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर अजित पवार यांनी वेगळी भूमिका मांडली होती. त्यामध्ये अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयाचे कारण देत नवीन अध्यक्ष दिला तर का नको, पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार होईल असेही म्हंटले होते. त्यानंतर सुप्रिया सुळे यांनीही स्पष्ट भूमिका मांडली नव्हती. त्यामुळे पवार कुटुंबात काही बोलणं झालं आहे का? अशी शंका कार्यकर्त्यांच्या मनात आहे.

शरद पवार हेच अध्यक्ष राहावे, हवं तर कार्याध्यक्ष पद निर्माण करून इतरांना द्या पण पक्षाची जबाबदारी शरद पवार यांच्याकडेच ठेवा अशी मागणी कार्यकर्ते गेल्या तीन दिवसांपासून लावून धरत आहे. अध्यक्ष निवड समितीने याबाबत शरद पवार यांचा राजीनामा नामंजूर करावा अशी मागणी केली आहे.

त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयात येत असतांना कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत शरद पवार यांच्या नावाने घोषणाबाजी दिली आहे. त्यामुळे काहीसं वेगळं चित्र राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या कार्यालयाबाहेर पाहायला मिळाले आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.