‘त्या’ कुटुंबाला मुख्यमंत्र्याच्या हस्ते 5 लाख रुपयांचा धनादेश; आमचं सरकार संवेदनशील, नंतरही…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मयत शेतकरी पुंडलीक जाधव यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. त्यानंतरही सरकार मदत करेल अशी ग्वाही एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.

'त्या' कुटुंबाला मुख्यमंत्र्याच्या हस्ते 5 लाख रुपयांचा धनादेश; आमचं सरकार संवेदनशील, नंतरही...
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Apr 14, 2023 | 2:57 PM

मुंबई : मागील महिण्यात सरकारच्या विरोधात विविध मागण्यांसाठी आदिवासी शेतकरी बांधवांनी पायी मोर्चा काढला होता. त्याला लॉन्ग मार्चही म्हंटल्या गेलं. खरंतर यापूर्वी आदिवासी शेतकऱ्यांचं लाल वादळ मुंबईच्या दिशेने धडकलं होतं. त्यानंतर आता जवळपास ठाणे हद्दीपर्यन्त हे लाल वादळ जाऊन पोहचलेलं असतांना सरकार सोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आंदोलन स्थगिती करण्यात आले होते. परंतु त्याच रात्री एका शेतकऱ्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता. पुंडलीक जाधव असं शेतकऱ्यांचे नाव होते. हृदय विकाराचा झटका बसल्याने त्यांना शहापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, पुढील उपचारासाठीचा विचार सुरू असतांनाच त्यांचा वाशिंदमध्ये मृत्यू झाला होता.

नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातील मोहाडी या गावातील पुंडलीक जाधव हे शेतकरी होते. 17 मार्चला पायी चालत असतांना जेवण केल्यावर त्यांना अस्वस्थ वाटू लागले होते. त्याच वेळी सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी रुग्णवाहिकेच्या माध्यमातून शहापूर रुग्णालय गाठले होते.

त्यांच्यावर उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता. त्यानंतर संपूर्ण मोर्चात खळबळ उडाली होती. पुंडलीक जाधव या शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर मोर्चेकरी शेतकरी आक्रमक झाले होते. त्यामध्ये त्या शेतकरी कुटुंबाला मदत सरकारने करावी अशी मागणी केली जात होती.

हे सुद्धा वाचा

खरंतर पुंडलीक जाधव या मयत शेतकऱ्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने जाधव कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. गावात अडीच एकर जमीन असतांना ती नावावर नसल्याने ते मोर्चात सहभागी झाले होते. त्यातच दुर्दैवी मृत्यू पुंडलीक जाधव यांचा झाला होता.

त्यानंतर पुंडलीक जाधव यांच्या कुटुंबाला आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सरकारच्या माध्यमातून पाच लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे. यावेळी मुख्यमंत्री यांनी धनादेश दिल्यानंतर यानंतरही काही मदत लागल्यास सांगा असं एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पुंडलीक जाधव या शेतकऱ्याचा सरकारच्या विरोधात मोर्चा करत असतांना दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबाला वाऱ्यावर सोडणार नाही असं सांगितलं होतं त्यानुसार पाच लाख रुपयांचा धनादेश दिला आहे.

त्यामध्ये नंतरही काही मदत लागली तर आम्ही करू हे सरकार संवेदनशील सरकार असल्याचेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हंटलं आहे. जाधव कुटुंबाप्रमाणेच इतर शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत, त्या देखील पूर्ण करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याबाबत शिंदे यांनी आश्वस्त केले आहे.

महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.