अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किती आमदार? राजकीय हालचाली वाढल्या…

उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता शरद पवार यांना भाजप धक्का देणार असल्याची चर्चा होऊ लागली आहे. त्यामध्ये अजित पवार यांच्यासोबत काही आमदार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे किती आमदार? राजकीय हालचाली वाढल्या...
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 18, 2023 | 11:05 AM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे काही आमदारांसोबत राष्ट्रवादीतून बाहेर पडत भाजपसोबत सत्ता स्थापन करेल अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. त्यातच आता अजित पवार यांच्यासोबत 53 पैकी 40 आमदार असल्याचं एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तांत म्हटले आहे. त्यावरून संपूर्ण राज्यात आणि राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राज्यातील सत्ता संघर्षाचा निकाल काही दिवसांमध्येच लागेल असे चित्र आहे. सुप्रीम कोर्टात सुनावणी झाल्यानंतर निकाल राखून ठेवण्यात आला होता. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह सोळा आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा हा महत्त्वाचा विषय आहे आणि त्यावरूनच राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे 53 पैकी 40 आमदार आहेत. असं वृत्त द न्यू इंडियन एक्सप्रेसने दिले आहे. योग्यवेळ आल्यावर 40 आमदारांच्या पाठिंब्याची यादी अजित पवार राज्यपालांना देणार असल्याचेही त्यामध्ये म्हंटले आहे.

यामध्ये अजित पवार यांनी 40 आमदारांना वैयक्तिकरित्या संपर्क साधल्याचे समोर आले आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी अजितदादांनी शपथ घेतल्यास सरकर पडण्याची वेळ येणार नाही असंही त्या वृत्तात म्हंटलं गेलं आहे.

हे सुद्धा वाचा

2019 ला राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट घेऊन अजित पवार यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली होती. यामध्ये अजित पवार यांना उपमुख्यमंत्री पद ही देण्यात आलं होतं. याशिवाय मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली होता.

महाराष्ट्रातील जनता साखर झोपेत असताना शपथविधी पार पडल्याने राज्यात खळबळ उडाली होती. उलट सुलट चर्चा ही रंगू लागल्या होत्या. त्यानंतर शरद पवार यांनी अजित पवार यांचं बंड क्षमवलं होतं. 80 तासांतच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी स्थापन केलेले सरकार पडलं होतं.

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीच्या माध्यमातून नवं सरकार स्थापन झालं. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत अडीच वर्ष राज्याचा कारभार हाकला होता.

त्यानंतर शिवसेनेतील एक गट बाहेर पडून त्यांनी भाजपसोबत राज्यात सरकार स्थापन केलं आणि त्यानंतर थेट सुप्रीम कोर्टात या सत्ता संघर्षाची सुनावणी सुरू झाली. मात्र, एकनाथ शिंदे यांच्या विरोधात निकाल गेला तर त्यापूर्वीच सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं बोललं जात आहे.

अजित पवार हे राष्ट्रवादीचे 40 आमदार घेऊन भाजपसोबत सरकार स्थापन करणार असल्याची ही चर्चा होऊ लागलेली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलंच आपल्याच बघायला मिळतंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.