तोतऱ्याचा महाराष्ट्राला अभिमान! किरीट सोमय्यांनी चुटकी वाजवली, उद्धव ठाकरे यांना चॅलेंज दिलं…
उद्धव ठाकरे, संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर किरीट सोमय्या यांनी स्पष्टच उत्तर दिले आहे. त्यावर त्यांनी स्वतःला उद्धव ठाकरे काय म्हणतात हे सांगत रश्मी ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या ( Kirit Somaiya ) हे पुन्हा एकदा आक्रमक झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी मात्र किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्या सांगत पलटवार केला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या टीकेवर किरीट सोमय्या म्हणाले त्यांची पीडा समजून घेतली पाहिजे. संजय राऊत यांनी केलेळी शिवीगाळ त्यांची संस्कृती दाखवते. तशी संस्कृती आमची नाही. आणि उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात. पण या तोतऱ्याने तुमच्या बायकोचे एकोणीस बंगले कुठे गायब केले ते द्या. या तोतऱ्यावर महाराष्ट्राला अभिमान आहे. मी उद्धव ठाकरे यांना खुलं चॅलेंज करतोय, ज्या शिव्या द्यायच्या आहे त्या द्या पण एकोणीस बंगले कुठे गायब केले ते सांगा ना? असा सवाल किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला आहे.
किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी गंभीर आरोप केले होते. त्यावरून संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली होती. त्यामध्ये संजय राऊत यांना काही दिवस ईडीच्या कोठवडीत देखील राहावे लागले आहे. त्यावरून त्यांची पीडा समजून घेतली पाहिजे असं म्हणत सोमय्या यांनी कोपरखळी लागावली आहे.
संजय राऊत यांनी दिलेल्या शिव्यांचा उच्चार किरीट सोमय्या यांनी भर पत्रकार परिषदेत केला आहे. त्यामध्ये भडवा, xतिया, भxवा, पोपटलाल असं म्हंटलं आहे. त्यावरून त्यांची संस्कृती दिसते आहे असं म्हणत पलटवार केला आहे. खालच्या पातळीचे लोकं आहे की खालच्या पातळीची भाषा बोलतात असं म्हणत सोमय्या यांनी संजय राऊत यांना डिवचलं आहे.
इतकंच काय उद्धव ठाकरे मला तोतऱ्या म्हणतात, पण महाराष्ट्राला या तोतऱ्याचा अभिमान असल्याचे म्हंटले आहे. यावेळी त्यांनी थेट रश्मी ठाकरे यांच्यावरही निशाणा साधला आहे. एकोणीस बंगले कुठे लपविले म्हणत जुन्या कारवाईवरून डिवचले आहे. त्यामुळे सोमय्या आणि ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहे.
याशिवाय किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांच्या कागल येथील घरावर सुरू असलेल्या ईडीच्या कारवाईवरुन किरीट सोमय्या यांनी हल्लाबोल केला आहे. कारखान्याच्या संदर्भात घोटाळा केल्याचा आरोप यापूर्वीच केला होता, त्याचाच संदर्भ देऊन किरीट सोमय्या हल्लाबोल केला आहे.
हसन मुश्रीफ यांनी 58 कोटी रुपयांचा गैरव्यवहार केला असल्याची कबुली दिली आयकर विभागाला कबुली दिल्याचा दावाही सोमय्या यांनी केला असून जोरदार टीका केली आहे.