अजित पवार यांचा ‘असाही’ खट्याळपणा, मंत्री शंभुराज देसाईच्या मांडीवर का मारली बुक्की? व्हिडिओ चर्चेत
राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा मागे काही दिवसांपूर्वी एक डोळा मारण्याचा व्हिडिओ समोर आला होता. आता त्यानंतर अजित पवार यांचा बुक्की मारतांनाचा व्हिडिओ समोर आला आहे.
मुंबई : राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. आता अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू आहे. यामध्ये विधानसभेतील वातावरण तापलेले असतांना विधानसभेच्या पायऱ्यांवर मात्र हलकेफुलके आणि काहीसे गमतीशीर वातावरण दिसून आले. यामध्ये आज तर संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावरुन स्पष्टीकरण देत असतांना मंत्री दादा भुसे यांनी जहरी टीका करत शरद पवार यांचे नाव घेऊन संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला होता. दादा भुसे यांनी संजय राऊत यांचा एकेरी उल्लेख केल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले होते.
विरोधी पक्षेनेते अजित पवार यांचा आक्रमकपणा सभागृहात पाहायला मिळत असतांना दुसरीकडे अजित पवार यांचा सभागृहाच्या पायऱ्यांवर मात्र काहीसा खट्याळपणा पाहायला मिळाला. अनेकदा अजित पवार त्यांच्या कठोरपणामुळे आणि गंमतीशीरपणामुळे ओलखळे जातात.
अजित पवार यांच्या अनोख्या स्वभाव पुन्हा एकदा पाहायला मिळाला. यामध्ये धुळ्याचे आमदार फारूक शहा हे मतदार संघातील विविध प्रश्नांसाठी पायऱ्यांवर बसून उपोषण करत होते. त्यामध्ये फारूक शहा यांच्या जवळून जात असतांना अजित पवार आणि शंभुराज देसाई थांबले होते.
आमदार फारूक शहा यांची मनधरणी करत असतांना अनेक आमदार त्यांच्यासोबत फोटो काढत होते. त्याचवेळेला अजित पवार आणि शंभुराज देसाई यांनी फोटो काढण्यासाठी उभे राहिलेले असतांना अजित पवार यांचा खट्याळपणा दिसला.
अजित पवार यांनी शंभुराज देसाई यांच्या मांडीवर चेष्टने बुक्की मारली. त्यानंतर अजित पवार गालातल्या गालात हसले देखील. खरंतर अजित पवार यांचा असा स्वभाव कमी प्रमाणात दिसतो. मागे काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी डोळा मारल्याचाही एक व्हिडिओ समोर आला होता.
विधानसभेत आक्रमक असलेले दादा विधानसभेच्या बाहेर मात्र हलकेफुलके वातावरण निर्माण करत असतात. यामध्ये नुकताच त्यांनी डोळा मारण्याचा प्रसंग असो नाहीतर आत्ता नुकताच शभुराज देसाई यांच्या मांडीवर चेष्टने मारलेली बुक्की असो. अजित पवार यांचा खट्याळपणा अनेकदा समोर आला आहे.
दरम्यान अजित पवार यांचा अनेकदा कठोरपणाही समोर आलेला आहे. पत्रकार परिषदेत पत्रकारांना उत्तर देतांना चिडलेले अजित पवार असो नाहीतर भर सभेत एखाद्या कार्यकर्त्यावर भडकलेले अजित पवार बघायला मिळाले आहे. विधानसभेतही अजित पवार यांचा आक्रमकपणा पाहायला मिळत आहे.
आजही दादा भुसे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका करत असतांना शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख केला होता त्यावर उत्तर देत असतांना अजित पवार यांनी दादा भुसे यांना खडेबोल सुनावत दिलगिरी व्यक्त करण्यासह रेकॉर्डवरुन तो शब्द काढून टाकण्यासाठी सांगितले होते.