अजित पवार भाजपसोबत जाणार की नाही? ‘त्या’ चर्चांवर अजित पवार यांनी स्वतःच सांगितलं…

| Updated on: Apr 18, 2023 | 3:03 PM

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अजित पवार हे 40 आमदारांना घेऊन भाजप सोबत जातील या चर्चेवर स्वतः अजित पवार यांनी स्पष्टीकरण देत जाहीर खुलासा केला आहे.

अजित पवार भाजपसोबत जाणार की नाही? त्या चर्चांवर अजित पवार यांनी स्वतःच सांगितलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 40 आमदार सोबत घेऊन भाजप सोबत सत्ता स्थापन करेल अशा स्वरूपाचं चर्चा राज्यात सुरू आहे. असे असताना स्वतः अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. माझ्या बाबत पसरवला जाणाऱ्या बातम्यांमध्ये तथ्य नाही, आमदार मला कामानिमित्त भेटण्यासाठी आले होते. कारण नसताना माझ्याबद्दल गैरसमज पसरविल्या जात असल्याचा अजित पवार यांनी म्हटलं आहे. आम्ही पवार साहेबांच्या मार्गदर्शनातच राष्ट्रवादीत काम करत आहोत. बातम्यांमुळे कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करून घेऊ नये, मला आमदार कामानिमित्त भेटले दुसरा अर्थ नाही. आम्ही राष्ट्रवादीतच राहणार असल्याचे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे.

मी उपमुख्यमंत्री पद गेल्यानंतर बदल केला. पण ट्विटर काय सारखा झेंडा लावून ठेऊ का? आमचं वकील पत्र काय दुसऱ्या पक्षांनी घेतलं आहे का? भाजपसोबतच्या जाण्याच्या चर्चाना तथ्य नाही असेही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

माझ्या बाबतच्या चर्चा थांबवा, त्याचा आता तुकडा पाडा असेही आवाहन अजित पवार यांनी केले आहे. शरद पवार यांनी स्वतः सांगितले आहे की यामध्ये कुठलेही तथ्य नाही. माझ्या भूमिकेवर दुसऱ्या पक्षातील नेत्यांनी बोलू नये. शिंदे गटाच्या नेत्यांना बोलण्याचा अधिकार नाही.

हे सुद्धा वाचा

आमच्या पक्षातील प्रवक्ते आमची भूमिका मांडतील. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील स्थापना स्वाभिमानातून झाली आहे. तेव्हा पासून आम्ही काम करत आहोत, जो पर्यन्त जीवात जीव आहे, तो पर्यन्त राष्ट्रवादीचे काम करीत राहील असेही अजित पवार यांनी म्हंटलं आहे.

मी कुठल्याही आमदारांच्या सह्या घेतलेल्या नाहीत. मी भाजपला पाठिंबा देणार नाही आणि तशी शक्यताही वर्तवली नाही. या संदर्भातील ज्या बातम्या पेरल्या जात आहे, त्याच्यातून आमचे कार्यकर्ते नाराज होतात. त्यांनी त्यावर विश्वास ठेऊ नका असेही आवाहन यावेळी अजित पवार यांनी केले आहे.

महाविकास आघाडीतील काही नेत्यांना या वेळेला अजित पवार यांनी टोला लगावला आहे आमच्या पक्षातील बाजू आम्ही मांडू तुम्हाला मांडण्याचा कोणी अधिकार दिला ? असे म्हणत अजित पवारांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.

याशिवाय अजित पवार यांनी आम्ही सर्व राष्ट्रवादीतच आहोत असे म्हणत सुरू असलेल्या चर्चा निरर्थक असल्याचं सांगत कार्यकर्त्यांनी संभ्रम निर्माण करू नये असेही आवाहन अजित पवार यांनी पुन्हा पुन्हा केले आहे.