मुकेश अंबानी यांना ई-मेलवर मिळाली धमकी, 20 कोटी द्या नाहीतर…

देशातील नामवंत उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा धमकी मिळाली आहे. ई-मेलवरून त्यांना धमकी देण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांना ई-मेलवर मिळाली धमकी,  20 कोटी द्या नाहीतर...
Follow us
| Updated on: Oct 28, 2023 | 10:40 AM

मुंबई | 28 ऑक्टोबर 2023 : देशातील नामवंत उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी (mukesh ambani)  यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडून 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे आणि पैसे दिले नाहीत तर जीव गमवावा लागेल, असे त्याने म्हटले आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 27 ऑक्टोबर रोजी मुकेश अंबानी यांच्या कंपनीच्या ईमे ल आयडीवर एका अज्ञात व्यक्तीने धमकीचा मेला पाठवला. ‘तुम्ही आम्हाला 20 कोटी रुपये दिले नाहीत तर आम्ही तुम्हाला जीवानिशी मारू, आमच्याकडे भारतातील सर्वोत्तम शूटर आहेत’ असे त्या धमकीच्या ई-मेलमध्ये लिहीले होते.

पोलिसांनी दाखल केली FIR, तपास सुरू

धमकीचा हा मेल आल्यानंतर हा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सिक्योरिटी इन्चार्जने दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे मुंबईच्या गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

गेल्या वर्षीही मिळाली होती धमकी

मुकेश अंबानी आणि अंबानी परिवाराला धमकी मिळण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही एका व्यक्तीने दक्षिण मुंबईतील सर एचएन रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटलला फोन केला होता. त्याने रुग्णालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली होती. त्यानंतर त्या कॉलरने मुकेश अंबानी, नीता अंबानी, आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांची नावे घेतली आणि त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच मुकेश अंबानी यांचे ‘अँटिलिया’ हे घर उडवून देण्याची धमकीही देण्यात आली होती.

2021 मध्ये घराजवळ आढळली स्फोटकांनी भरलेली कार

तर फेब्रुवारी 2021 साली मुकेश अंबानी यांच्या घराजवळ एक एसयूव्ही सापडल्याने खळबळ उडाली होती. दक्षिण मुंबईतील अंबानींच्या ‘अँटिलिया’ या घराजवळ स्फोटकांनी भरलेली एसयूव्ही सापडली होती. त्यात सुमारे 20 जिलेटिनच्या काड्या आणि एक पत्र सापडले. पत्रात मुकेश अंबानी आणि त्यांच्या पत्नी नीता अंबानी यांना धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या प्रकरणी कारवाई करत काही जणांना अटक केली.

Non Stop LIVE Update
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.