शरद पवार यांची पत्रकार परिषद होण्यापूर्वी संजय राऊत ‘सिल्व्हर ओक’वर, संजय राऊत यांच्या भेटीचं कारण काय?
शरद पवार यांना अध्यक्ष समिती भेटून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे भेटीसाठी गेले आहे. त्यामध्ये शरद पवार यांची थोड्याच वेळात पत्रकार परिषद होत असतांना राऊत काय चर्चा करणार याकडे लक्ष लागून आहे.
मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाचा आपण राजीनामा देत असल्याची भूमिका शरद पवार यांनी 2 मे ला घेतली होती. त्यानंतर संपूर्ण राज्यासह देशभरात खळबळ उडाली होती. शरद पवार हेच अध्यक्ष असावेत अशी मागणी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लावून धरली होती. त्यामध्ये अजित पवार वगळता शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये अशी भूमिका घेतली होती. तर अजित पवार यांनी शरद पवार यांचे वय पाहता आणि त्यांच्यासमोर पक्षाचा अध्यक्ष घडला तर काय अडचण आहे असा सवाल उपस्थित करत शरद पवार यांचा निर्णय कसा योग्य आहे यावर अजित पवार यांनी भर दिला होता. मात्र, याविरोधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार हेच अध्यक्ष असावेत अशी भूमिका घेत आंदोलन सुरू केले होते.
शरद पवार हेच अध्यक्ष असावेत यासाठी इतर पक्षातील अनेक नेत्यांनीही त्यावर भाष्य केले होते. शरद पवार यांनी 2024 च्या निवडणुका होई पर्यन्त तरी पक्षाची धुरा सांभाळावी असे मत व्यक्त करत संजय राऊत यांनीही शरद पवार यांची देशाला गरज असल्याचे म्हंटले होते. इतकंच काय विरोधी पक्षाची मोट फक्त शरद पवार हेच बांधू शकतात असे मत व्यक्त केले होते.
शरद पवार यांनी घेतलेली भूमिका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना जशी मान्य नाही, तशी देशातील इतर पक्षाच्या प्रमुखांना देखील मान्य नाही. अनेक नेत्यानं शरद पवार यांनी राजीनामा देऊ नये. सर्वांच्या भावनांचा आदर राखावा असे मत व्यक्त करून पक्षाचे अध्यक्ष पद सोडू नये अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.
संजय राऊत याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या भेटीला गेले आहे. खरंतर 5.30 वाजता शरद पवार हे पत्रकार परिषद घेणार आहे. त्यामध्ये शरद पवार हे अध्यक्षपदाबाबत आपली भूमिका मांडणार आहे. त्यामध्ये अध्यक्ष निवड समिती भेटून गेल्यानंतर शरद पवार यांची ही पत्रकार परिषद होणार आहे.
त्याच पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या निवासस्थानी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत भेटीसाठी गेले आहे. संजय राऊत यांचे मत पाहता संजय राऊत हे शरद पवार यांना अध्यक्षपडी रराहावे यासाठी गळ घालू शकतात. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची पुढील काळातील वाटचाल यावरही चर्चा होण्याची शक्यता असून याबाबत अधिकृत माहिती काय दिली जाते हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.