महाराष्ट्रात मोगलाई सुरू, संजय राऊत कडाडले; नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर घणाघात

आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल करत खारघर प्रकरणावरुन सरकारवर गंभीर आरोप केले आहे.

महाराष्ट्रात मोगलाई सुरू, संजय राऊत कडाडले; नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर घणाघात
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 20, 2023 | 10:32 AM

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आमदार नितीन देशमुख यांच्या अटकेवरुन सरकारवर हल्लाबोल केला आहे. नितीन देशमुख हे पाणी यात्रा काढून पाण्याच्या संदर्भात मागणी करत असतांना त्यांना नितीन देशमुख यांना अटक केली ही मोगलाई आहे. महाराष्ट्रात औरंगजेबाचे सरकार आहे का? देवेंद्र फडणवीस यांना माणुसकी राहिली नाही का? असा सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलत असतांना नितीन देशमुख देशमुख यांच्यावर पोलिसांनी हल्ला करून अज्ञानस्थळी लपविल्याचा आरोप केला आहे. नितीन देशमुख हे पाण्याचे नमुने घेऊन दाखवला येत होते यामध्ये कुठला कायदा सुवस्थेचा प्रश्न होता? असा सवाल ही संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे.

नितीन देशमुख हे त्यांच्या मतदार संघात पाणी येतंय ते खारं पाणी आहे. ते पाणी लहान मुलांना प्यायला द्यायचं का? त्याचसाठी नितीन देशमुख हे पायी यात्रा काढत होते. देवेंद्र फडणवीस यांना त्या पाण्याचे नमुने दाखविणार होते. मात्र, त्यावर आवाज उठवला तर त्यांना अटक केली? ही काय मोगलाई सुरू आहे का? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मानसुकी दाखवला पाहिजे होते. उलट त्यांच्या पोलिसांनी नितीन देशमुख यांना अटक करून त्यांना अज्ञात स्थळी लपवून ठेवले आहे. असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. संजय राऊत यांनी यावेळी सरकार हे औरंगजेबाचे सरकार आहे का? असाही सवाल उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

या दरम्यान संजय राऊत यांनी खारघर प्रकरणावरुन सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला आहे. साधू हत्या प्रकरणावेळी छाती बडवणारे आता कुठे गेले ? म्हणत सवाल उपस्थित करत संजय राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला बुच लावलं आहे का? ते बोलत का नाही ? असाही सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री निर्घृण आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सुद्धा डोळ्यात माणुसकी दिसली नाही. भाजपच्या लोकांनी डहाणू मध्ये साधू हत्या प्रकरणावरुन दंगल घडविण्याचा प्रयत्न केला होता. ते कुठे गेले आता? असाही सवाल उपस्थित केला आहे.

खारघर प्रकरणात पन्नास जणांचा पाण्यावाचून मृत्यू झाला आहे. अजूनही मृत्यूचे आकडे लपविले जात आहे. काही जणं घरी जातांना मृत्यूमुखी पडले. लोकं मला भेटायला आल्यावर सांगत आहे. पैसे देऊन आवाज दाबला जात आहे. श्री सदस्यांच्या मृत्यूवर भाजप का बोलत नाही? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.