अदानी प्रकरणात शरद पवार यांनी क्लीनचीट दिली का? संजय राऊत यांनी थेट अर्थच सांगितला, काय म्हणाले राऊत

गौतम अदानी यांच्या चौकशी वरुन सध्या देशभरात चर्चा सुरू असतांना शरद पवार यांनी भाष्य केले होते त्यावरून आश्चर्य व्यक्त केले जात असतांना त्याचा अर्थ संजय राऊत यांनी सांगितला आहे.

अदानी प्रकरणात शरद पवार यांनी क्लीनचीट दिली का? संजय राऊत यांनी थेट अर्थच सांगितला, काय म्हणाले राऊत
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 08, 2023 | 11:52 AM

मुंबई : संपूर्ण देशात गौतम अदानी आणि हिंडेन बर्ग प्रकरणावरून चर्चा सुरू असतांना नुकतीच राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली होती. शरद पवार यांनी दिलेल्या प्रतिक्रियेवरून राज्यासह देशभरात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. विशेषतः राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. याच दरम्यान शरद पवार यांनी जेपीसी म्हणजे संयुक्त संसदीय समितीच्या चौकशीवरुन भाष्य केले होते. सर्वोच्च न्यायालयाची चौकशी अधिक योग्य राहील असेही शरद पवार यांनी म्हंटलं होतं. त्यावरून शरद पवार यांनी गौतम अदानी यांना क्लीनचीट दिली अशी चर्चा सुरू झालेली असतांना संजय राऊत यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या चौकशीच्या संदर्भात भाष्य केले त्यात शरद पवार यांनी क्लीनचीट दिलेली नाही असे स्पष्ट करत शरद पवार यांची अशी भूमिका काही नवीन नाही असे संजय राऊत यांनी म्हंटलं आहे.

शरद पवार आणि तृणमूल कॉंग्रेस यांची अनेकदा भूमिका वेगळी राहिली आहे. त्यामध्ये आता शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायायलायच्या माध्यमातून चौकशी केली तर योग्य राहील असेही म्हंटले होते. त्यामध्ये जेपीसीच्या माध्यमातून चौकशी झाली तर अध्यक्ष त्यांचा असतो म्हणून शरद पवार यांनी तशी मागणी केली असावी.

हे सुद्धा वाचा

पण शरद पवार यांनी जे काही मत मांडलं आहे. त्यात काहीही गैर नाही. त्यांचे मत बरोबर असू शकते असेही संजय राऊत यांनी म्हंटलं आहे. दोषींना शिक्षा ज्या कोणत्या पर्यायी मार्गांनी मिळेल तो पर्याय आम्हाला मान्य आहे असेही संजय राऊत यांनी शरद पवार यांच्या मागणीवर भाष्य केले आहे.

खरंतर शरद पवार यांनी जे वक्तव्य केले त्याचा अर्थच एकप्रकारे संजय राऊत यांनी उलगडून दाखविला आहे. खरंतर गौतम अदानी यांच्या संदर्भात हिंडेनबर्गने दिलेला अहवाल जगभरात चर्चेचा विषय ठरला होता. त्यावरून चौकशीची मागणी केली जात आहे.

गौतम अदानी हे देशातील मोठे उद्योजक आहे. त्यांच्यावर राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाच्या नेत्यांनी गंभीर आरोप केले होते. गौतम अदानी आणि नरेंद्र मोदी यांचे संबंध असून कोट्यवधी रुपयांची अफरातफर केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता.

त्याच दरम्यान एका मुलाखतीत शरद पवार यांनी गौतम अदानी यांच्या चौकशी बाबत मोठं वक्तव्य केले होते. गौतम अदानी यांची चौकशी ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून केली जावी असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले होते. त्याचे कारणही शरद पवार यांनी सांगितलं होतं.

जेपीसीच्या माध्यमातून चौकशी केली तर अध्यक्ष त्यांचाच असतो. त्यामुळे निपक्ष चौकशीवर बोट ठेवत शरद पवार यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून चौकशी व्हावी असे मत मांडले होते.

खरंतर जेपीसीमध्ये 21 सदस्य असतात त्यापैकी 15 सदस्य सत्ताधारी आणि उर्वरित विरोधी पक्षाचे असतात. त्यामुळे त्याचा उपयोग नसल्याचे शरद पवार यांनी मत मांडले होते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.