राष्ट्रवादीचा कॉंग्रेस राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय म्हणाले?

केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय दर्जाच्या संबंधित घेतलेल्या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट प्रतिक्रिया दिली आहे.

राष्ट्रवादीचा कॉंग्रेस राष्ट्रीय दर्जा काढून घेतल्यानंतर पहिली प्रतिक्रिया, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील काय म्हणाले?
Image Credit source: TV9 Network
Follow us
| Updated on: Apr 11, 2023 | 9:48 AM

मुंबई : नुकताच केंद्रीय निवडणूक आयोगाकडून काही पक्षांच्या संबंधित राष्ट्रीय दर्जाच्या संदर्भात निर्णय घेण्यात आलेला आहे. यामध्ये राष्ट्रीय पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रीय दर्जा काढून घेण्यात आलेला आहे. खरंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला हा मोठा धक्का मानला जातोय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. यामध्ये त्यांनी इतर पक्षांच्या राष्ट्रीय दर्जाच्या संबंधी कुठलाही भाष्य न करता सौम्य प्रतिक्रिया दिली आहे. गेलेला राष्ट्रीय दर्जा पुन्हा परत मिळून आणू असं म्हटलं आहे. याशिवाय निवडणुका येतात आणि जातात त्यानंतर ही परिस्थिती बदलत असते असेही मत जयंत पाटील यांनी म्हंटलं असून केंद्रीय समिती याबाबत पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हंटले आहे.

जयंत पाटील म्हणाले, राष्ट्रीय दर्जा कोणत्या पक्षाकडे राहू शकतो याचे काही निकष आहेत. गेल्या दोन वर्षांपासून याबाबत हेरिंग सुरू होते. त्यात आमची बाजू मांडली होती. परंतु आता निवडणूक आयोगाने निर्णय दिलेला आहे.

या देशातल्या कोणते पक्ष राष्ट्रीय पक्ष राहू शकतात याविषयी जे निकष आहेत. त्यांनी कोणत्या निकषामध्ये हा निर्णय दिला आहे ते पहावे लागेल. प्रत्येक निवडणुकीत काही बदल होत असतो. आणखीन काही निवडणुका वेगळ्या राज्याच्या येणार आहे.

हे सुद्धा वाचा

येणाऱ्या निवडणुकीत आमची कामगिरी सरस झाली तर किंवा समाधानकारक झाली किंवा त्या राज्यात आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणुका लढवू शकलो आणि चांगली मत घेऊ शकलो तर राष्ट्रीय दर्जा परत मिळू शकतो. मला त्यात काही फार अडचण वाटत नाही असेही जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने असा निर्णय काही देशातल्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाबद्दलही घेतलेला आहे. जो अनेक वर्ष जुना पक्ष आहे. त्यामुळे निवडणुक आयोगाने घेतलेल्या निर्णयाबद्दल मतमतांतर आहेत पण तो आता निर्णय झालेला आहे.

आमची केंद्रीय पक्ष समिती याबाबतीत योग्य तो विचार करत आहे. तर इतर जे पक्ष आहेत ज्यांचा राष्ट्रीय दर्जा गेला आहे. त्यांचा दर्जा कोणत्या निकषावरुन गेला आहे. याबाबत मी बोलणं योग्य होणार नाही. याबाबतीत माहिती घेऊन बोलणं योग्य राहील असेही जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

केंद्र सरकारमध्ये निवडक आयोगाच्या समोर बाजू मांडली होती. त्यामुळे त्या तपशीलावर मी टिका टिपणी करणे योग्य होईल असे मला वाटत नाही. लोकांचे मत होऊ शकते. की केंद्राचा दबाव आहे. पण जे निकष आहेत त्या निकषांचा देखील आपल्याला अभ्यास करणे योग्य राहील.

प्रादेशिक पक्ष म्हणून आता एनसीपीजी आहे ती काम करताना महाराष्ट्रात पाहायला मिळेल. कारण राष्ट्रीय पक्षाचा दर्जा आहे तो गेलेला आहे. पुढे निवडणुका आहेत. आमच्या चिन्हाला धक्का लागेल अस मला वाटत नाही आणि घड्याळ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह हे कायम राहील, यात तरी माझ्या मनात शंका नाही.

महाराष्ट्र पुरता हा विषय बघितला तर त्याला कोणताही धक्का लागतोय असं दिसत नाही आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था, विधानसभा आणि लोकसभा या संबंधातल्या निवडणुकीची महाराष्ट्र पुरती तरी आम्हाला चिंता नाही आता अन्य राज्यात निवडणुका झाल्यावर आमची परिस्थिती दुरुस्त होईल आणि पुन्हा हा राष्ट्रीय दर्जा प्राप्त होईल असं मला विश्वास आहे.

विरोधकांची एकजूट कायमच आहे. त्याच्याबद्दल राष्ट्रीय दर्जाचा आणि विरोधकांचे एकजुटीचा काही संबंध आहे असे मला वाटत नाही. विरोधकांची जी एकजूट आज आहे तीच कायम राहावी, राहिली पाहिजेत अशीच भूमिका सर्वांची आहे असेही जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.