आठवलेंची स्टाइल, फडणवीसांची कविता… तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही… विधानसभेत हास्यकल्लोळ
केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या कवितेच्या स्टाईल वापरुन देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात केलेले विधान चर्चेचा विषय ठरत आहे. यामध्ये फडणवीस यांनी विधान करत सभागृहात हास्यकल्लोळ झाल्याचे पाहायला मिळाले.
मुंबई : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचे नेते, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची कविता ऐकली नसेल असा महाराष्ट्रातील एकही नेता नसेल. त्यांच्या संसदेतील कविता असो किंवा जाहीर सभेतील कविता असो त्याची जोरदार चर्चा असते. त्यातून ते कधी कुणाची स्तुती करत असतात तर कधी कुणावर टीका करत असतात. कवितेच्या माध्यमातून टोलेबाजी करणारे नेते म्हणून रामदास आठवले संपूर्ण देशाला परिचित आहे. ह्याच स्टाईलचा आधार घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधार घेत एक विधान केले आहे. त्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडावरुन देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे.
अजित पवार यांनी अर्थसंकल्पावर भाष्य करत देवेंद्र फडणवीस यांना काही सवाल केले होते. त्यावर विधानसभेत उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर देत असतांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाचा आधार घेऊन टोला लागवला आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाची आत्ताच्या आकडेवारीचा आणि जुन्या आकडेवारीचा फरक सांगत शिवसेनेला किती टक्के निधी दिला जात होता हे स्पष्ट करत असतांना रामदास आठवले यांच्या स्टाईलचा आधार घेऊन विधान केले आणि सभागृहात हास्यकल्लोळ पाहायला मिळाला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, रामदास आठवले यांच्या स्टाइलमध्ये सांगायचे झाले तर तुम्ही केली त्यांची कोंडी म्हणून आम्ही मारली मुसंडी असं विधान केले. यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या बंडावरुन अजित पवार यांना देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. त्यामुळे शांतता पसरलेल्या सभागृहात हास्यकल्लोळ निर्माण झाला होता.
खरंतर कुठेलही अधिवेशन असले की संसदेत केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले हे बोलत असतांना कविता सादर करत असतात. राजकीय कवी म्हणून संसदेत त्यांची ओळख आहे. यमक जुळवून रामदास आठवले हे कविता करत असतात. त्यामध्ये ते कुणावर टीका करतात तर कुणावर स्तुती सुमणं उधळून सभागृहात आनंदी वातावरण निर्माण करतात.
असेच काहीसे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे पाहायला मिळाले आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतांना देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना चांगलेच चिमटे काढले. यावेळी त्यांनी मागील अर्थसंकल्पात अवघे पंधरा टक्के निधी शिवसेनेला दिल्याचे म्हंटले आहे.
तर आम्ही 34 टक्के निधी शिवसेनाला दिल्याचे म्हंटले आहे. त्याच दरम्यान देवेंद्र फडणीस यांनी निधीच्या मुद्द्यावरून अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीला टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी एका केलेल्या आठवले स्टाईल विधानाची जोरदार चर्चा होऊ लागली आहे.