Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Fire | परळमध्ये गॅस पाइपलाइनला आग, पेट्रोल पंपाजवळ घटना, परिस्थिती आटोक्यात

मुंबईत परळमध्ये भूमीगत गॅस पाइपलाइनमध्ये गळती. पेट्रोलपंपाजवळच आगीची घटना. काळा चौकीच्या सिग्नल परिसरात घटना

Mumbai Fire | परळमध्ये गॅस पाइपलाइनला आग, पेट्रोल पंपाजवळ घटना, परिस्थिती आटोक्यात
मुंबईत परळमध्ये गॅसपाइप लाइनला गळती, आगImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Aug 29, 2022 | 2:51 PM

मुंबईः मुंबईत परळमध्ये गॅस पाइपलाइनला (Mumbai Gas leakage) गळती झाली आहे. पेट्रोल पंपाजवळच ही घटना घडली आहे. अग्निशमक दलाच्या (Fire Brigade) गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आजूबाजूची सर्व दुकाने तातडीने बंद करण्यात आली असून परिस्थिती आटोक्यात असल्याची माहिती समोर आली आहे. महानगर गॅस पाइपलाइनमध्ये ही गळती झाली आहे. गॅस पाइपलाइन भूमिगत असल्याने जमिनीतून गॅस, आग (Mumbai Paral Fire) आणि धूर निघत असल्याचे चित्र भयंकर होते. जमिनीतील पाइपलाइनचा माग घेत अग्निशमक दलाचे जवान त्यावर पाण्याचा फवारा मारत होते. मात्र एका ठिकाणी पाण्याचा मारा सुरु असताना दुसऱ्या ठिकाणाहून धूर निघत होता. त्यामुळे गॅसपाइपलाइनला नेमकी कुठे गळती झाली आहे, ही गळती थांबवता येईल का, हे आव्हान सध्या अग्निशमक दलासमोर आहे.

गॅसपुरवठा तात्पुरता बंद

परळ परिसरातील आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. अग्निशामक दलाच्या प्रयत्नांनी आग विझवण्यात आली आहे. मात्र गॅस पाइपलाइन ही भूमिगत असल्यामुळे त्यात नेमकी कुठे गळती झाली आहे, याचा शोध लागलेला नाही. पाइप लाइनला कुठे बिघाड झालाय, हे शोधण्यासाठी तात्पुरता या भागातील गॅस पुरवठा बंद करण्यात आला आहे. महानगर पालिकेच्या अधिकाऱ्यांमार्फत ही गळतीची ठिकाणं शोधली जात आहेत. त्यावर लवकरात लवकर दुरूस्ती करून गॅसपुरवठा पुन्हा एकदा सुरु केला जाईल.

ही बातमी अपडेट होत आहे…

'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल
खोक्याला वनविभागाच्या कोठडीत जबर मारहाण, अंगावर वळ अन्... फोटो व्हायरल.
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?
मुंबईकरांनो काळजी घ्या, कारण उद्यापासून... हवामान खात्यानं काय म्हटलं?.
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा
ज्येष्ठ अभिनेते मनोज कुमार यांचं निधन, देशभरात शोककळा.
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात..
जेव्हा इम्तियाज जलील अंबादास दानवेंना मिठी मारतात...
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'
सदावर्तेंवर बोलतना मनसे नेत्याची जीभ घसरली, 'पाळलेला कुत्रे....'.
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
कुर्ल्याच्या फिनिक्स मॉलमध्ये आग; अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल.
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?
..अन् गर्भवतीचा मृत्यू, दिनानाथ मंगेशकर रुग्णालयाची मुजोरी, घडलं काय?.