नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत देशातील महायुतीच्या बाजूने कल दिला. पुन्हा एकदा एनडीए सरकार सत्तेत आलं. पण महाराष्ट्रात मात्र वेगळं चित्र पाहायला मिळालं. महाराष्ट्रातील जनतेने महाविकास आघाडीच्या बाजूने कल दिला. महाविकास आघाडीचे 30 उमेदवार निवडून आले. तर महायुतीला केवळ 17 जागांवर विजय मिळवला आला. तर सांगलीला अपक्ष विशाल पाटलांचा विजय झाला. या निकालाचा आगामी विधानसभा निवडणुकीवर परिणाम होणार आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीचं चित्र काय असेल? यंदा राज्याच्या मुख्यमंत्रिपदी महाराष्ट्रातील जनतेला कुणाला पाहायला आवडेल? याबाबत एक सर्व्हे करण्यात आला. यात भाजपच्या बड्या नेत्याला लोकांनी पसंती दिली आहे.
राज्याचं मुख्यमंत्री कोण व्हावं? याबाबत एक सर्व्हे करण्यात आला. या सर्व्हेमध्ये लोकांनी भाजपच्या बड्या नेत्याच्या नावाला पसंती दिली आहे. सध्याच्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा भाजपच्या या नेत्याला लोकांनी पसंती दिली आहे. हे नाव म्हणजे देशाचे रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या नावाला पसंती देण्यात आली आहे. सकाळ समुहाने एक सर्व्हे केला यात महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण व्हावं असं वाटतं? असा प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना लोकांनी सर्वाधिक पसंती ही नितीन गडकरी यांच्या नावाला दिली आहे.
भाजपच्या कोणत्या नेत्याला मुख्यमंत्रिपदी बसलेलं पाहायला आवडेल असं विचारलं गेलं तेव्हा 18.8 टक्के लोकांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला पसंती दिली. तर 47.7 टक्के लोकांनी नितीन गडकरींच्या नावाला पसंती दिली आहे. विनोद तावडे यांना 6.3 टक्के, पंकजा मुंडेंना 5 टक्के तर सुधीर मुनगंटीवार यांच्या नावाला 2.8 टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर 14.5 टक्के लोकांनी एकनाथ शिंदेंना तर 5.3 टक्के लोकांनी अजित पवार यांच्या नावाला पसंती दिलीय.
महाविकास आघाडीबाबत असाच प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा 22.4 टक्के लोकांनी उद्धव ठाकरे यांच्या नावाला पसंती दिली. 6.8 टक्के लोकांनी सुप्रिया सुळे, तर 4.7 टक्के लोकांनी नाना पटोले यांच्या नावाला पसंती दिली.