Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चॅट दाखवले अन् जामीन मिळाला, काय आहे प्रकरण?

मुंबईतील मालवणी पोलीस ठाण्यात दाखल POCSO प्रकरणी सायकल व्यापारी सागर कोटक यांना दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. अल्पवयीन मुलीला सायकल देण्याचे आमिष दाखवून त्याने विनयभंग करण्याचा प्रयत्न केला होता.

चॅट दाखवले अन् जामीन मिळाला, काय आहे प्रकरण?
Girl MolestationImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 20, 2025 | 10:49 PM

मुंबईच्या मालवणी पोलीस ठाण्यात पॉक्सो कायद्याअंतर्गत दाखल गुन्ह्यात सायकल व्यापाऱ्याला दिंडोशी सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. तब्बल 60 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर हा जामीन मिळाला आहे. सागर कोटक असे या संशयित आरोपीचे नाव आहे. संशयिताचं वय 45 असून अल्पवयीन मुलीचं वय 17 वर्ष आहे. त्याने सायकल देण्याचे आमिष दाखवून पीडित अल्पवयीन मुलीला बोलवलं होता. यानंतर रिक्षामध्ये जाताना मुलीचा विनय भंग करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता याप्रकरणी त्या आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे.

नेमकं प्रकरण काय?

पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी म्हटल्याप्रमाणे डिसेंबर महिन्यात त्यांच्या मोठ्या मुलगीच्या मुलीचा (५ वर्ष ) वाढदिवस होता. पीडित मुलगी आपल्या आईसोबत लहान मुलीच्या बर्थडेच्या दिवशी तिला सायकल गिफ्ट देण्यासाठी मालाड येथील सदगुरू सायकल मार्टमध्ये सायकल खरेदी करण्याकरिता गेली होती. मात्र त्यांना जी सायकल आवडली, त्याची किंमत जास्त होती. त्यामुळे त्यांना सायकल खरेदी करता आली नाही. मात्र त्यानंतर आरोपी दुकानदाराने अल्पवयीन मुलाला आपला व्हिजिटिंग कार्ड दिला आणि तिला संपर्क करण्यास सांगितलं होता.

यानंतर पीडित मुलगी १६ जानेवारी २०२५ रोजी घरात सांगून गेली की ती आपल्या मित्राच्या घरी जात आहे. मात्र संध्याकाळी जेव्हा ती घरी परत आली तर ती घाबरलेली आणि एकटीच बसली होती. ती कोणासोबत बोलत नव्हती. यामुळे कुटुंबियांना काही संशय आला तेव्हा त्यांनी मुलीचा मोबाईल चेक केला. त्यात सायकल दुकानदाराचा मुलीसोबत फोटो आणि दोघांमध्ये झालेले चॅट सापडले.

आरोपी सायकल दुकानदाराने अल्पवयीन मुलीला नवीन सायकल भेट म्हणून देण्याकरिता तिला मालाडच्या इन्फिनिटी मॉलजवळ बोलावले होते. तेथून रिक्षामध्ये जात असताना आरोपीने मुलीबरोबर अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. मात्र मुलीने त्याला विरोध केला. पोलिसात दाखल तक्रारीप्रमाणे मुलगी आणि आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते. ते सतत एकमेकांसोबत बोलत होते. आरोपीने पुन्हा पीडित मुलीला भेटण्यासाठी बोलवले होते. त्याच्यासोबत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला होता.

पीडित अल्पवयीन मुलीच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारावर आरोपी सागर अरविंद कोटकविरोधात मालवणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. गुन्हा क्रमांक ८३/२०२५ मध्ये भारतीय न्याय संहिता कलम १३७(२) ,६४ ,७४ आणि पोक्सो कलम ४,८,१२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता . आरोपी विरोधात यापूर्वी देखील चारकोप पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०८ ( ७ ) ,६२ आणि आय टी कायदा २००० अंतर्गत गुन्हा दाखल आहे .

कोर्टातील युक्तिवाद काय?

या प्रकरणात कोर्टात झालेल्या सुनावणी दरम्यान एड विजय उपाध्याय यांनी आरोपी सागर कोटकची बाजू मांडली. तर एड निधी यांनी तक्रारदार मुलीची आणि एड श्रीमती मालनकर यांनी सरकारची बाजू मांडली. सुनावणी दरम्यान आरोपीचे वकील एड विजय उपाध्याय यांनी कोर्टात युक्तिवाद केला की पीडित मुलीने तिचे वय १९ वर्ष आहे असं सांगितलं होता. ते दोघेही एकमेकांना भेटत होते आणि परस्पर संमतीने संबंध होते . पुरावा म्हणून त्यांनी पीडित आणि आरोपी मध्ये झालेले चॅट कोर्टासमोर सादर केल आणि आरोपीला जामीन देण्याची विनंती केली होती.

त्या आधारावर कोर्टाने २५००० वैयक्तिक जात मुचलक्यावर आरोपीला जामीन मंजूर केला आहे. संशयित आरोपी 60 दिवस तुरुंगात राहिल्यानंतर त्याला जामीन मिळाला आहे. जामीन मंजूर करताना कोर्टाने आरोपीवर अट आणि शर्थी लावल्या. दर बुधवारी आरोपी संध्याकाळी ४ ते ५ वाजता या दरम्यान पोलीस ठाण्यात उपस्थित राहणार आहे. पुरावे नष्ट करणे, आरोपीला धमकावणे असे कृत्य करणार नाही. त्याच बरोबर कोर्टाची परवानगीशिवाय देशाबाहेर जाणार नाही असी अट आहे.

'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या
'ज्याची जशी लायकी, तो तशी वक्तव्य करतो'.., चित्रा वाघ स्पष्टच बोलल्या.
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नागपूर राडा; चार आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी.
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया
औरंगजेबाची कबर ही मराठ्यांच्या पराक्रमाचं स्मारक, राऊतांची प्रतिक्रिया.
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका
तोंड उघडलं तरी घाणच बाहेर निघते; मेहबूब शेख यांची वाघ यांच्यावर टीका.
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता
धार्मिक स्थळांना चोख बंदोबस्त; प्रार्थनेसाठी संचारबंदीतून शिथिलता.
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले
सभागृहाची ऐसी तैसी करायचं काम सुरू आहे; जयंत पाटील संतापले.
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?
लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी, लाभार्थ्यांना कधी मिळणार 2100 रूपये?.
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक
'वा लगे रहो चित्रा ताई, तुमच्यासारख्या वाघिणींची गरज'; राणेंकडून कौतुक.
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय
सरकारमधीलच कोणीतरी मुख्यमंत्र्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करतंय.
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी
असं बोलणं म्हणजे...,कडूंची चित्रा वाघ यांच्या त्या वक्तव्यानंतर नाराजी.