मुंबईत बड्या बिल्डराला अटक तर नाशिकमधील बिल्डरांवर सकाळी सकाळीच छापेमारी; काय काय घडलं?
मुंबईतील एका बड्या बिल्डरला अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर नाशिकमध्ये आज सकाळी सकाळी काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापा घातल्याने त्यांचंही धाबं दणाणलं.
मुंबई | 31 जानेवारी 2024 : मुंबईतील एका बड्या बिल्डरला अटक करण्यात आली आहे. बांधकाम व्यावसायिक ललित टेकचंदानी यांना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. तर नाशिकमध्ये आज सकाळी सकाळी काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने छापा घातल्याने त्यांचंही धाबं दणाणलं. बांधकाम व्यावसायिक बी.टी.कडलग यांच्या घरात आणि कार्यालयात आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापा मारला.
ललित टेकचंदानी यांना अटक
बांधकाम व्यवासयिक ललित टेकचंदानी ना मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. ललित टेकचंदानी यांच्यावर तळोजा येथील प्रकल्पात घर देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंगळवारी नऊ तास त्यांची चौकशी करण्यात आली. त्यानंतर ललित टेकचंदानी यांना अटक करण्यात आली. टेकचंदानी यांनी गुंतवणूकदारांचे कोट्यवधी रुपये बुडवल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
Maharashtra | Mumbai police’s Economic Offences Wing (EOW) arrested builder Lalit Tekchandani in a cheating case after a nine-hour interrogation today. The police registered a case against the accused Lalit Tekchandani and others under sections 420, 406 and other sections of the…
— ANI (@ANI) January 30, 2024
ललित टेकचंदानी हे बांधकाम व्यवसायातील मोठं नाव आहे. मात्र ग्राहकांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर असून त्याचप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी मंगळवारी नऊ तास त्यांची चौकशी केली. त्यानंतर अटक केली. टेकचंदानी यांच्या विरोधात कलम ४२० आणि कलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी शेकडो ग्राहकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप लावण्यात आला आहे.
नाशिकमध्ये आयकर विभागाच्या धाडी
नाशिकमधील काही बड्या बांधकाम व्यावसायिकांवर आयकर विभागाने बुधवारी सकाळी छापे टाकले. बांधकाम व्यावसायिक बी.टी.कडलग यांच्याकडे आयकर विभागाचा छापा पडला. कर बुडवल्या प्रकरणी कडलग यांच्या घरी आणि कार्यालयांवर छापमारी करण्यात आली. आयकर विभागाच्या 100 टीम नाशिकमध्ये दाखल असल्याची माहिती मिळाली आहे.