Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक मेसेज अन् पळापळ… मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज, पोलिस हाय अलर्टवर

मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा एक धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आणि एकच खळबळ उडाली. हा मेसेज मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

एक मेसेज अन् पळापळ... मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला धमकीचा मेसेज, पोलिस हाय अलर्टवर
Follow us
| Updated on: Feb 02, 2024 | 9:55 AM

मुंबई | 2 फेब्रुवारी 2024 : मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आल्याचा एक धमकीचा मेसेज मुंबई वाहतूक पोलीस नियंत्रण कक्षाला आला आणि एकच खळबळ उडाली. हा मेसेज मिळाल्यानंतर सर्व यंत्रणा सतर्क झाल्या असून, मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्याचाही प्रयत्न सुरू आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात व्यक्तीने हेल्पलाइन क्रमांकाच्या व्हॉट्सॲप नंबरवर एक मेसेज पाठवला. मुंबईत 6 ठिकाणी बॉम्ब ठेवण्यात आले असून मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकीही त्याने दिली. या मेसेजनंतर मुंबई पोलिसांसह सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आणि मेसेज पाठवणाऱ्या त्या व्यक्तीचा शोध सुरू केला.

तसेच वाहतूक पोलिसांनी शहर पोलिस आणि गुन्हे शाखा एटीएसलाही माहिती दिली. काही संशयास्पद ठिकाणांचीही झडती घेण्यात आली मात्र त्यामध्ये काहीच सापडले नाही. यानंतर रात्री उशिरा जॉइंट सीपींनी याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. शहर पोलिसांसह गुन्हे शाखाही या प्रकरणाचा तपास करत आहे.

यापूर्वीही वाहतूक पोलिसांच्या हेल्पलाइन क्रमांकावर कॉल आणि मेसेजद्वारे धमक्या आल्या आहेत. मात्र त्यामध्ये काहीच तथ्य आढळले नव्हते. आता पुन्हा असाच मेसेज आल्याने खळबळ माजली. धमकीचा तो मेसेज पाठवणाऱ्या व्यक्तीचा कसून शोध घेण्यात येत आहे.

कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल..
कितीही जवळचा असला तरी मकोका लावायला सांगेल...
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका
कोकाटेंची मुक्ताफळं, अजितदादा अनभिज्ञ, कॉंग्रेसची टीका.
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला
'बर्फाच्या लादीवर झोपवून मारू', एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरें टोला.
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा
.. तेव्हा माझा मोठा विजय होईल - करुणा शर्मा.
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला
आधी मुंबईत किती मराठी आहेत ते पाहा, सदावर्तेंचा राज ठाकरेंना सल्ला.
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी
लातूरच्या मनपा आयुक्तांनी स्वत:वरच झाडली गोळी.
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?
करूणा शर्मांकडून मुंडेंचं अंतिम इच्छापत्र सादर, नेमका काय उल्लेख?.
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा
ठाकरेंच्या शिवसेनेत अनेक जण अस्वस्थ अन्... उदय सामंतांचा मोठा दावा.
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?
पुण्यात गर्भवतीचा मृत्यू, 10 लाखांसंदर्भात अहवालात कबुली, काय कारवाई?.
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप
'..हे अतिशय भयानक' रुग्णालयाच्या लाखो रूपयांच्या बिलावरून धसांचा संताप.