मुंबईत लवकरच स्फोट घडवणार, ट्विटरवरून दिली धमकी, मुंबई पोलिसांकडून तपास सुरू
महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. यावेळी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत धमकी पोस्ट करण्यात आली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात बॉम्बस्फोटाच्या धमकीची प्रकरणे सातत्याने समोर येत आहेत. यावेळी मुंबई पोलिसांच्या ट्विटर हँडलला टॅग करत धमकीची पोस्ट टाकण्यात आली आहे. पोस्टमध्ये आरोपीने लिहिले की, “मी लवकरच मुंबईत स्फोट घडवणार आहे”. सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ही पोस्ट 22 मे रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली होती, असे पोलिसांचे म्हणणे आहे.
मुंबई पोलिसांच्या सोशल मीडिया टीमने ही पोस्ट पाहताच संबंधित पोलिस ठाण्याला याबाबत कळवण्यात आले होते. याप्रकरणी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू करण्यात आला आहे. ज्या ट्विटर हँडलवरून हे पोस्ट करण्यात आले आहे त्याचीही चौकशी करण्यात येत आहे.
Maharashtra | Mumbai Police received a threat around 11 am on May 22, after a person posted a threatening message on Twitter, “I am gonna blast the Mumbai very soon.” The police have started investigating the concerned account. Further investigation into this matter is underway:…
— ANI (@ANI) May 23, 2023
महाराष्ट्रात अशा धमक्या देण्यात आल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकवेळा बॉंबस्फोटाची धमकी मिळाली होती. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. महाराष्ट्रात अशा धमक्या देण्यात आल्याची ही काही पहिलीच घटना नाही. यापूर्वीही अनेकवेळा बॉंबस्फोटाची धमकी मिळाली होती. एक दिवसापूर्वी म्हणजेच रविवारीही पोलिसांना असाच एक संशयास्पद फोन आला होता. ज्यामध्ये पलीकडील व्यक्ती सांगत होती की, त्याला असे कॉल वारंवार येत आहेत, ज्यामध्ये त्याला 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याची माहिती दिली जात आहे. यापूर्वी 26/11च्या वर्षपूर्तीच्या 13 दिवस आधीही मुंबईत दहशत माजवण्याची धमकी देण्यात आली होती.
एका अंदाजानुसार, यापैकी बहुतेक धमक्या काही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ लोकांकडून येतात. पण 26/11आणि त्यापूर्वी झालेल्या दहशतवादी हल्ल्यांचा विचार करता मुंबई पोलीस अशा कोणत्याही धमकीच्या कॉलला हलक्यात घेत नाहीत.