संजय राऊत कोत्या मनोवृत्तीचे, त्यांच्यात संस्काराचा अभाव!; भाजप नेत्याचा थेट हल्लाबोल

| Updated on: Nov 18, 2023 | 12:51 PM

Sanjay Raut : संजय राऊत यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारातील कुणी बोलवत नाही, त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलू नये, असं म्हणत भाजप नेत्याने संजय राऊतांवर पलटवार केला आहे. तसंच ओबीसी महासभेवरवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाचा सविस्तर...

संजय राऊत कोत्या मनोवृत्तीचे, त्यांच्यात संस्काराचा अभाव!; भाजप नेत्याचा थेट हल्लाबोल
Follow us on

गिरीश गायकवाड, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, मुंबई | 18 नोव्हेंबर 2023 : सध्या पाच राज्यात विधानसभा निवडणुका होत आहेत. अशात सर्वच राजकीय पक्ष जोमाने प्रचार करताना दिसतायेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपच्या प्रचारासाठी मध्य प्रदेशमध्ये गेले होते. त्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी टीका केली. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यात थांबायला वेळ आहे का? ते इतर राज्यातील प्रचारात असतील तर राज्यातील प्रश्नांचं काय? त्याकडे कोण लक्ष देणार?, असं म्हणत राऊतांनी फडणवीसांवर निशाणा साधला. त्याला आता भाजकडून उत्तर देण्यात आलं आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर शाब्दिक पलटवार केला आहे.

राऊतांवर निशाणा

संजय राऊत यांना ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या प्रचारातील साधं कोणी आता बोलवत नाही. देवेंद्र फडणवीस स्टार प्रचारक आहेत. म्हणून त्यांना राष्ट्रीय नेते म्हणून सर्वत्र जावं लागतं. देवेंद्रजी बाहेर जाऊन प्रचार करतात तर संजय राऊत यांना पोटशूळ का उठतोय? संजय राऊत कोत्या मनोवृत्तीचे आहेत. त्यांच्यामध्ये संस्काराचा अभाव आहे, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.

आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल, दरेकर म्हणाले…

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्यावर प्रवीण दरेकर यांनी भाष्य केलंय. उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे जे करतात, ती दडपशाही आहे. कायदा हातात घेण्याचा कोणालाही अधिकार नाहीये. विकास कामाचा रिचार्ज उद्घाटन झाल्यानंतरच ते जनतेच्या सेवेमध्ये सुरू करण्यात येतो आणि नियम आहे. तुम्ही जर कायदाच मानणार नसाल कायदा हातात घेऊन वातावरण खराब करण्याचे काम करत असाल त्यानुसार कारवाई होते. त्यामुळे ही कारवाई योग्य आहे. जर हे असं वागायला लागले तर इतरही लोक तेच करतील. लोकांचे धाडस वाढेल आणि वातावरण खराब होईल, असं प्रवीण दरेकर म्हणालेत.

ओबीसी महासभेवर म्हणाले…

ओबीसी नेते एक झाले आहेत. पण कुणीही त्या समाजाचं पालकत्व घेतल्यासारखी भाषा करू नये. मग छगन भुजबळ असू दे किंवा जरांगे पाटील असू दे… समाजा -समाजामध्ये वाद निर्माण करण्याचे काम कोणी करू नये. अराजकता माजवू नये. गर्दी जमते म्हणजे त्या समाजाचे तुम्ही मालक नाहीत. अन्यथा अशा मेळाव्यात ऊपस्थित राहायचं की नाही याचा समाजही विचार करेल, असं दरेकर म्हणालेत.