मुंबई-रायगड प्रवास 15 मिनिटांत शक्य; TV 9 मराठीच्या ‘महाराष्ट्राच्या महासंकल्प’ कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं

शिवडीकडे काम सुरू करताना गेलो असता तिथं फ्लेमिंगो होते. फ्लेमिंगो पळून जाता नये, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला. त्यामुळं फ्लेमिंगोची संख्या सध्या वाढली आहे.

मुंबई-रायगड प्रवास 15 मिनिटांत शक्य; TV 9 मराठीच्या 'महाराष्ट्राच्या महासंकल्प' कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Feb 13, 2023 | 11:45 AM

मुंबई : टीव्ही ९ मराठीच्या वतीनं महाराष्ट्राच महासंकल्प (Maha Sankalpa of Maharashtra) हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, रोजच्या बातम्या आपण देत असतो. महाराष्ट्राचा महासंकल्प हा कार्यक्रम राबवत आहोत. राज्यासाठी आपण काय करणार आहोत. व्हीजन काय, लाभ काय होणार आहे, याची उत्सुकता सर्वांना असतो. टीव्ही ९ मराठीनं अनेक उपक्रम राबविले जातात. संकट येतात तेव्हा टीव्ही ९ मराठीची टीम काम करते. हा महाराष्ट्राचा महासंकल्प हा आगळावेगळा संकल्प आपण हाती घेतलं.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आमचं सरकार आलं त्याला सहा-सात महिन्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. या कमी कालावधीत केलेली काम सर्वांसमोर आहेत. इंफ्रा प्रोजेक्ट राज्यात सुरू आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात सुरू झाले होते. आता डे टू डे सर्व कामांचं मॉनिटरनिंग आमचं सरकार आल्यानंतर सुरू झालं. समृद्धी महामार्ग नागपूर ते शिर्डी सुरू करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या रस्त्याचं लोकार्पण करण्यात आलं.

समृद्धी महामार्गाचा विस्तार होणार

मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गामुळं १८ तासांचं अंतर सहा तासांवर येणार आहे. शेवटचा टप्पा या वर्षाच्या शेवटी पूर्ण होईल. हा समृद्धी महामार्ग नागपूर-गडचिरोली, नागपूर-गोंदियापर्यंत जाणार आहे.

मुंबई ते रागयड १५ मिनिटांत

मुंबई ते रायगड येथे जायचं असेल तर कमीतमती दोन तास लागतात. शिवडी न्हावासेवा या प्रकल्पा अंतर्गत फक्त १५ मिनिटांत मुंबईतला माणूस रायगडमध्ये पोहचेल. मुंबई-पुणेसुद्धा त्याला कनेक्ट केलं आहे. त्यानंतर गोव्याला कनेक्ट करतोय.

लाखो लोकांना रोजगार मिळेल

१८ ठिकाणी नवीन प्रकल्प तयार करतोय. येथे इंडस्ट्री येईल. नवीन लॉजिस्टिक पार्क तयार होतील. फूड प्रोसेसिंग युनिट होतील. शेतकऱ्यांच्या मालाची व्हॅल्यू अॅडिशन होईल. लाखो लोकांना रोजगार मिळेल. पर्यावरणाचा समतोल होईल. २५० ते ५०० मेगावॅट सोलर एनर्जी जनरेट केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

वन्यजीवांकडे लक्ष ठेवत आहोत. आम्ही रस्त्यावर आलो आहोत, असं त्यांना वाटणार नाही. पर्यटनाला चालना मिळणार आहे. इंडस्ट्री येणार आहे. सेवा इंडस्ट्री येईल. टावनशीप होतील, असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

फ्लेमिंगोची संख्या वाढली

शिवडीकडे काम सुरू करताना गेलो असता तिथं फ्लेमिंगो होते. फ्लेमिंगो पळून जाता नये, यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग केला. त्यामुळं फ्लेमिंगोची संख्या सध्या वाढली आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.