Mumbai Rains Live Update | जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

| Updated on: Jul 22, 2021 | 2:04 AM

अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे.

Mumbai Rains Live Update | जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन
प्रातिनिधीक फोटो
Follow us on

अनेक दिवस दडी मारल्यानंतर पावसाने राज्यात जोरदार कमबॅक केले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस मुंबई, ठाणे आणि पालघर परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होऊ शकतो. आज सकाळपासून मुंबई आणि उपनगराच्या परिसरात वेगवान वाऱ्यांसह पावसाला पुन्हा सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमधील सततच्या पावसामुळे मिठी नदी सध्या तुडुंब भरून वाहत आहे. अशातच बुधवारी सकाळी 9 वाजून 56 मिनिटांनी समुद्राला मोठी भरती येणार आहे. या काळात पाऊस सुरुच राहिल्यास मुंबई पुन्हा एकदा जलमय होण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच राज्यातील जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, हिंगोली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची हवामान विभागाने वर्तवली आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Jul 2021 10:56 PM (IST)

    उद्या कोयना धरणातून पाणी सोडले जाणार, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा 

    कराड : उद्या कोयना धरणातून पाणी सोडणार

    पायथा वीजगृहातून 2100 क्यूसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्याचे धरण व्यवस्थापनाचे नियोजन

    पुढील दोन दिवस जोरदार पावसाच्या इशाऱ्यामुळे धरण व्यवस्थापनाची पाणीसाठा नियोजनाची खबरदारी

    कोयना धरण पायथा विद्युत गृहातील दोन्ही युनिट सुरू करणार

    नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

  • 21 Jul 2021 10:54 PM (IST)

    अकोल्यात विजांच्या कडकटासह जोरदार पावसाची हजेरी, दुपारपासून सुरु होती रिमझिम  

    अकोला : विजांच्या कडकटासह जोरदार पावसाची हजेरी

    सकाळपासून होते ढगाळ वातावरण

    दुपारपासून रिमझिम सुरू होती

    रात्री 10.30 पासून सुरू आहे जोरदार पाऊस


  • 21 Jul 2021 09:44 PM (IST)

    त्रंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार, प्रशासनाकडून अलर्ट जारी 

    नाशिक – त्रंबकेश्वरमध्ये पावसाची संततधार

    त्रंबकेश्वर गावातील सखल भागात साचलं पाणी

    पाणी साचल्याने नागरिकांमध्ये घबराट

    प्रशासनाकडून त्रंबकेश्वरला अलर्ट जारी

  • 21 Jul 2021 09:28 PM (IST)

    जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी, प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

    रत्नागिरी – जगबुडी नदीने ओलांडली इशारा पातळी

    खेडच्या मटण-मच्छी मार्केट परिसरात शिरले पाणी

    खाडीपट्टा विभागाला जोडणाऱ्या बायपास रस्त्यालगत आले पाणी

    जगबुडी नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता

    पावसाचा जोर वाढला तर पूर सदृश परिस्थिती उद्भवण्याची शक्यता

    प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

  • 21 Jul 2021 08:05 PM (IST)

    वसई विरारमध्ये हलक्या वाऱ्यासह पावसाची रिपरिप

    वसई विरार – दुपारी 4 वाजल्यापासून वसई विरारमधील पाऊस थांबला आहे

    मात्र काळे ढग जमा झालेले आहेत.

    रात्री 7 च्या नंतर पावसाची अधूनमधून रिपरिप सुरू आहे

    मध्यरात्रीच्या सुमारास पावसाचा जोर वाढला तर कोणतीही आपत्तीजनक घटना घडू नये यासाठी वसईचे तहसील, महापालिकेचे अग्निशमन दल प्रसासन सज्ज असणार आहे

    हलक्या वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरू आहे

    मध्यरात्री जर पावसाचा जोर वाढला तर सकाळी शहरातील सकल भागात पाणी साचून जनजीवन विस्कळीत होऊ शकते

  • 21 Jul 2021 07:55 PM (IST)

    संततधार, अतिवृष्टीमुळे महाड शहरात पाणी शिरले 

    रायगड : संततधार व अतिवृष्टीमुळे महाड शहरात पाणी शिरले

    महाडला लागूनच असलेल्या सावित्री व गाधांरी नदीमध्ये 4-5 दिवसांपासून पाणी दुथडी भरुन वाहत आहे.

    मात्र पहिल्यादांच महाड शहरात पाणी शिरले असून बाजारपेठा, अतंर्गत रस्ते पाण्याने भरले आहे.

    शहरातील अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले असून पावसाचा जोर मात्र कायम आहे.

  • 21 Jul 2021 07:13 PM (IST)

    भिवंडीमध्ये मुसळधार पाऊस, पडघा गावातील गणेश नगरात शिरले पाणी

    भिवंडी : मुसळधार पावसात तालुक्यातील पडघा गावातील गणेश नगर या भागात शिरले पाणी

    50 घरांमध्ये अडकून पडलेल्या नागरीकांना रेस्क्यू करून ग्रामपंचायत सभागृहात हलविले

  • 21 Jul 2021 06:33 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला, महाबळेश्वरमध्ये वीजपुरवठा खंडित 

    सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला

    महाबळेश्वर, पाटण सातारा, वाई, जावली कोरेगाव, कराड तालुक्यात मुसळधार पाऊस

    महाबळेश्वर येथील वेण्णा तलाव भरल्यामुळे महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावर आले पाणी

    महाबळेश्वर ते पाचगणी रस्त्यावरील वाहतूक धीम्या गतीने

    महाबळेश्वर येथे मुसळधार पावसामुळे 8 तासापासून वीजपुरवठा खंडित

  • 21 Jul 2021 05:32 PM (IST)

    पालघर जिल्हा पावसाचा अहवाल, जव्हारमध्ये 246. मीमी पाऊस

    पालघर जिल्हा पावसाचा अहवाल दिनांक 21/07/2021 वेळ: सकाळी 9.00 ते सध्यांकाळी 4.00 वाजेपर्यंत

    1)वसई:-54.0 मीमी

    2)जव्हार:- 246.0 मीमी

    3) विक्रमगड:-50.0 मीमी

    4) मोखाडा:- 187.9मीमी

    5) वाडा :- 104.5 मीमी

    6)डहाणू :- 21.48 मीमी

    7) पालघर:- 35.83 मीमी

    8) तलासरी :- 24.0 मीमी

    एकूण सरासरी 90.46

  • 21 Jul 2021 05:30 PM (IST)

    जालन्यात पावसाला सुरुवात, अनेक ठिकाणी ओढे, नाल्यांना पाणी

    जालना : दिवसभर ढगाळ वतावरणानंतर जालना जिल्ह्यात आज संध्याकाळी संततधार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे अनेक ठिकाणी ओढे नाल्यांना पाणी आले. या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले आहे. तर काही शेतातील पिकांचे या पावसामुळे नुकसान होण्याची शक्यता आहे.

  • 21 Jul 2021 04:40 PM (IST)

    हिंगोलीमध्ये सकाळपासून रिमझिम पाऊस, जामगव्हाण परिसरातील पूल वाहून गेला

    हिंगोली : जिल्ह्यात आज सकाळपासून  रिमझिम पावसाने हजेरी लावली होती. दुपारनंतर मात्र पावसाचा जोर वाढला. त्यामुळे ओढे, नाले भरून  वाहतायत. औंढा नागनाथ तालुक्यातील जामगव्हाण  या गावाजवळून  जाणाऱ्या ओढ्यावरील पुलाचा भाग पावसाच्या पाण्यामुळे वाहून गेलाय. त्यामुळे अनेक गावातील वाहनधारकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

  • 21 Jul 2021 04:32 PM (IST)

    कल्याण, आडीवली, ढोकली परिसरात रस्त्यात साचले पावसाचे पाणी

    कल्याण : कल्याण, आडीवली, ढोकली परिसरात रस्त्यात साचले पावसाचे पाणी

    वारंवार तक्रार करुनही प्रशासन लक्ष देत नाही

    टीव्ही नाईनने दाखविली होती बातमी

    माजी नगरसेवक कुणाल पाटील सह स्थानिकांचे पाण्यात ठिय्या आंदोलन

    काम सुरू झालं नाही

    कल्याण सील फाटा,कल्याण मलंग रस्ता बंद करणार

    माजी नगरसेवक कुणाल पाटील यांचा प्रशासनला इशारा

  • 21 Jul 2021 02:22 PM (IST)

    वसईतील सनसिटी रस्ता गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली

    वसई –

    वसई सनसिटी रस्ता गेल्या तीन दिवसांपासून पाण्याखाली

    आज सकाळपासून पडलेल्या पावसाने सनसिटी रस्त्यावर साचले गुडगाभार पाणी

    वसई ऊन सोपारा, गास, विरार कडे जाणारा आहे हा बायपास रस्ता

    याच रस्त्यावर रविवारी एक xuv ही गाडी वाहून जाताजाता राहिली तर काल एक भली मोठी बस ही पाण्यात अडकली होती.

    आजही याच रस्त्यावरून अनेक वाहन आपला जीव मुठीत घेऊन पाण्यातून मार्ग काढत आहेत..

    पाणी ओसरे पर्यंत हा रस्ता बंद करावा अशी मागणी होत आहे पण पोलीस अथवा महापालिका प्रशासन याकडे लक्ष देताना दिसत नाही..

    त्यामुळे याठिकाणी मोठा अपघात सुद्धा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

  • 21 Jul 2021 02:04 PM (IST)

    Nashik Rain | नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस, गंगापूर धरणातील पाणीसाठ्यात वाढ

  • 21 Jul 2021 02:01 PM (IST)

    Ratnagiri Rain | रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरुच, जिल्ह्यातील अनेक नद्या दुथडी भरुन वाहू लागल्या

  • 21 Jul 2021 02:00 PM (IST)

    Fast News | पावसासंदर्भातील महत्त्वाच्या घडामोडी

  • 21 Jul 2021 01:59 PM (IST)

    Mumbai Rain | मुंबईतील मुसळधार पावसाचा प्राणी आणि पक्षांना सुद्धा फटका

  • 21 Jul 2021 01:58 PM (IST)

    मुसळधार पावसाने कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर झाड कोसळले

    मुसळधार पावसाने कोल्हापूर पन्हाळा रस्त्यावर झाड कोसळले

    रजपूतवाडी जवळ भले मोठे झाड कोसळले

    आपत्ती व्यवस्थापनचे पथक घटनास्थळी दाखल

    रत्नागिरीकडे जाणाऱ्या रस्त्यावर कोसळले झाड

    तासाभराच्या प्रयत्नानंतर वाहतूक सुरळीत

  • 21 Jul 2021 01:53 PM (IST)

    Thane Tree Collapsed | ठाणे महानगरपालिका मुख्यालयात झाडे कोलमडून पडली

    ठाणे महानगरपालिका मुख्यालयात झाडे कोलमडून पडली

    जवळपास 6-7 दुचाकी वाहने अडकली असून काही गाड्यांचे नुकसान झाले आहेत

    घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन टीम व अग्निशमन दलाचे 1 फायर इंजिनसह साइटवर पोहोचले आहेत

    कोणतीही हानी नाही

  • 21 Jul 2021 12:21 PM (IST)

    मुसळधार पावसाने ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ गुन्हे अन्वेषण विभागाची दयनीय अवस्था

    मुसळधार पावसाने ठाणे पोलीस आयुक्तालयाजवळ गुन्हे अन्वेषण विभागाची दयनीय अवस्था

    मुसळधार पावसामुळे गुडघाभर पाणी साचले आहे

    त्यामुळे गुन्हे अन्वेषण विभाग, बीडीडीएस, ठाणे नगर वाहतूक शाखा यासर्व पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय होत आहे

    येथील शासकीय रेकॉर्ड भिजण्याची या नष्ट होण्याची शक्यता आहे

  • 21 Jul 2021 12:18 PM (IST)

    कल्याण पूर्वेतील परिसरात आडवली ढोकली परिसरात रस्त्यावर पाणी साचले

    सकाळपासून कल्याण-डोंबिवलीत जोरदार पाऊस सुरू आहे

    सकल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे

    कल्याण पूर्वेतील आडवली ढोकळी परिसरात रस्त्यात पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे

  • 21 Jul 2021 12:16 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात बहुतांश भागात रात्रभर पाऊस

    नाशिक –

    जिल्ह्यात बहुतांश भागात रात्रभर पाऊस

    सध्या मात्र पावसाची विश्रांती

    गंगापूर धरणात दोन दिवसात सुमारे दोनशे दशलक्ष घनफुट वाढला साठा

    आजचा एकूण साठा 2094 दशलक्ष घनफुट

  • 21 Jul 2021 12:14 PM (IST)

    बुलडाणा जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरुवात

    बुलडाणा

    जिल्ह्यात अनेक भागात पावसाला सुरुवात

    सकाळपासून ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस

    मात्र आता पावसाने धरला जोर

  • 21 Jul 2021 12:07 PM (IST)

    Bhiwandi Rain Update | भिवंडीत मागील तासाभरापासून पावसाची दमदार हजेरी

    भिवंडीत मागील तासाभरापासून पावसाची दमदार हजेरी

    सकाळपासून वातावरण ढगाळ असून पहाटे पासून पावसाच्या हलक्या सरी सुरू होत्या परंतु एक तासा पासून पावसाचा जोर वाढला आहे .

  • 21 Jul 2021 11:29 AM (IST)

    रत्नागिरीच्या किनारपट्टीवर समुद्राला उधाण, तीन दिवस मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता

    रत्नागिरी –

    प्रकारच्या किनारपट्टी समुद्राला उधाण

    पौर्णिमेचे किनारपट्टी भागात उधाण

    पुढील तीन दिवस किनारपट्टी भागात मोठ्या लाटा उसळण्याची शक्यता

    किनारपट्टी भागात चार फुटांच्या लाटा

    अजय सुरु लाटा मानवी वस्तीजवळ

    लाटांचा तडाखा मिऱ्या पंधरा माड़ परिसराला परिसराला

  • 21 Jul 2021 11:27 AM (IST)

    सोलापुरात पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात

    सोलापूर –

    पावसाच्या हलक्या सरी बरसायला सुरुवात

    दमदार पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी

  • 21 Jul 2021 11:25 AM (IST)

    Kalyan Rain Update | कल्याण-डोंबिवलीत रात्री रिमझिम पाऊस

    कल्याण-डोंबिवलीत रात्री रिमझिम पाऊस होता

    सकाळपासून पाऊस सुरू झाला आहे

    पाऊस असाच पडत राहिला तर सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे

  • 21 Jul 2021 10:19 AM (IST)

    Thane Tree Collapsed | कळवा या ठिकाणी एका जुन्या रिक्षावर भले मोठे झाड पडले

    ठाण्यातील कळवा या ठिकाणी एका जुन्या रिक्षावर भले मोठे झाड पडले असून रिक्षाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे..

    सुदैवाने कोणतीही हानी झाली नसून घटना स्थळी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन दल रस्त्यावरील झाड बाजूला करण्याचे काम सुरू आहे

  • 21 Jul 2021 09:55 AM (IST)

    Vasai Virar Rain Update | वसई-विरार-नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरुच, अनेक रस्त्यांवर पाणी साचले

    वसई-विरार-नालासोपाऱ्यात पावसाची संततधार सुरुच

    शहरातील सकल भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले

    रेल्वे रुळावर कुठेही पाणी साचले नसल्याने लोकल सेवा सुरळीत सुर

    नालासोपारा पूर्व आचोळे रोड पूर्ण पाण्याखाली, सेंट्रल पार्क, स्टेशन परिसर, वसई तील दिवाणमन, सातिवली, एव्हरशाईन, मधुबन, विरार विवा कॉलेज रोडवर काही प्रमाणात पाणी साचले आहे

  • 21 Jul 2021 09:53 AM (IST)

    Mumbai Rain Update | मुंबईच्या बांद्रा, दादर, माहीम परिसरात पावसाची उसंत

    – मुंबईच्या बांद्रा, दादर , माहीम परिसरात पावसाची उसंत

    – हिंदमाता, परळ, दादर परिसरात कुठेही पाणी साचलं नाही

    – मुंबईच्या रस्त्यांवर अप आणि डाऊन अशा दोन्ही मार्गांवर वाहतूक सुरळीत सुरु

  • 21 Jul 2021 09:48 AM (IST)

    Morbe Dam Water Storage | दमदार पावसामुळे मोरबे धरणात 62 टक्के पाणीसाठा

    नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या महापालिकेच्या स्वत:च्या मालकीच्या मोरबे धरण क्षेत्रात एक दिवसात २२६.०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली

    गेल्या तीन दिवसापासून नवी मुंबईत दमदारपणे कोसळत असलेल्या पावसामुळे मोरबे धरणाची पाणी पातळी १.४८ मीटरने वाढून ती ८० मीटर इतकी होवून धरणातील पाणीसाठा ६२% टक्के झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली

    दरम्यान, मोरबे धरण ८८ मीटर पातळीला पूर्ण क्षमतेने भरते

    सध्यस्थितीत धरणात झालेला पाणीसाठा व येत्या काही दिवसांत पाऊस असाच पडत राहिला तर लवकरच धरण भरून वाहू लागेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

  • 21 Jul 2021 09:46 AM (IST)

    Navi Mumbai Rain Update | नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरु

    नवी मुंबई –

    नवी मुंबईत जोरदार पाऊस सुरु

    सकाळपासून रिमझिम सुरु असणाऱ्या पावसाने आता जोर धरला आहे

    नेरुळ, बेलापूर, वाशी, ऐरोली परिसरात पावसात सुरुवात झाली आहे

  • 21 Jul 2021 09:44 AM (IST)

    Mumbai Rain Update | मुंबईमध्ये पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात

    मुंबईमध्ये मान्सूनचे आगमन झाले असून गेल्या 1 तासापासून मुंबई आणि मुंबईतील आसपासच्या भागामध्ये जोरदार पाऊस होत आहे

    मुंबई उपनगरातील वांद्रे, अंधेरी, सांताक्रुज, गोरेगाव, कांदिवली, बोरिवली भागात गेल्या 1 तासापासून थांबून थांबून पाऊस पडत आहे. पोइसर नदीच्या पाण्याची पातळी वाढताना दिसत आहे

    जर अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात पाऊस पडला तर अंधेरी सबवे, मलाड सबवे आणि मिलन सबवेमध्ये पाणी भरु शकते

    Mumbai Rain

  • 21 Jul 2021 09:41 AM (IST)

    MuktaInagar Rain Update | जळगावच्या रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा परिसरात रात्री दमदार पावसाची हजेरी

    मुक्ताईनगर

    जळगावच्या रावेर, मुक्ताईनगर तालुक्यात कुऱ्हा परिसरात रात्री दमदार पावसाची हजेरी

    सकाळ पासून रावेर मुक्ताईनगर तालुक्यात रिमझिम पाऊस सुरू

    अनेक दिवसांपासून पावसाने मारली होती पावसाने दांडी शेतकरी राजा सुखावला
    खरिपाच्या पिकाला जीवदान

  • 21 Jul 2021 09:37 AM (IST)

    Bhandara Rain Update | भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी रिमझिम पाऊस, काही ठिकाणी ढगाळ वातावरण

    भंडारा जिल्ह्यात काही ठिकाणी सकाळपासून रिमझिम पाऊस सुरू आहे

    तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आहे

    मागील बारा दिवसापासून पाऊस नसल्याने काल दुपारच्या सुमारास भंडारा शहरात व ग्रामीण भागात तासभर पाऊस आला

    मात्र आज सकाळपासून जिल्ह्यात काही भागात ढगाळ वातावरण आहेत तर काही भागात रिमझिम पावासाने सुरुवात केली आहे

  • 21 Jul 2021 09:34 AM (IST)

    Sindhudurga Rain Update | गेल्या 24 तासात सिंधुदुर्ग जिल्ह्यात सरासरी 54 मिमी पावसाची नोंद

    सिंधुदुर्ग –

    जिल्ह्यात रिमझीम पाऊस सुरु

    मागील 24 तासात जिल्ह्यात सरासरी 54 मिमी पावसाची नोंद

    सर्वात जास्त पाऊस वैभववाडी तालुक्यात झाला असून याचा फटका भुईबावडा घाटाला बसला होता

    गेले काही दिवस जिल्ह्यात मुसळधार पाऊस होता

    मात्र दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला

    दोन दिवसात जिल्ह्यात 111 मिमी पावसाची नोंद

    सखल भागातले व नदी नालयातले पाणी ओसरले

    विस्कळीत झालेले जनजीवन हळूहळू पूर्वपदावर

  • 21 Jul 2021 09:25 AM (IST)

    Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा

  • 21 Jul 2021 09:25 AM (IST)

    Satara Rain Update | सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात रात्रभर मुसळधार पाऊस

    सातारा –

    सातारा जिल्ह्यातील पश्चिम भागात रात्रभर मुसळधार पाऊस…

    महाबळेश्वर, पाचगणी भिलार,पाटण भागात पावसाचा जोर…

    मागील 24 तासात महाबळेश्वर मध्ये 164 मि.मी. पावसाची नोंद

    सातारा शहरासह ग्रामीण भागात मात्र अधून मधून पावसाच्या तुरळक सरी

  • 21 Jul 2021 09:04 AM (IST)

    Akola Rain Update | अकोल्यात रिमझिम पावसाला सुरुवात

    अकोल्यात रिमझिम पावसाला सुरुवात

    सकाळ पासून आहे ढगाळ वातावरण

  • 21 Jul 2021 09:03 AM (IST)

    Gadchiroli Rain Update | गडचिरोली जिल्ह्यात पाच तासापासून पाऊस सतत सुरू

    गडचिरोली जिल्ह्यात काल रात्रीपासून रिमझिम पावसाला सुरुवात

    पाऊस रिमझिम असला तरी पाच तासापासून पाऊस सतत सुरू

    जिल्ह्यातील अनेक भागात ढगाळ वातावरण निर्माण झालेला आहे

  • 21 Jul 2021 09:02 AM (IST)

    Akkalkot Kurnoor Dam | अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाची वाटचाल 50 टक्क्यांच्या दिशेने

    सोलापूर– अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणाची वाटचाल 50 टक्क्यांच्या दिशेने

    उस्मानाबाद जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे बोरी नदीवाटे धरणात पाणी

    दोन दिवसापासून बोरी नदी वाटे धरणात पाणी

  • 21 Jul 2021 09:01 AM (IST)

    Thane Heavy Rain | ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात

    ठाण्यात जोरदार पावसाला सुरुवात

    ढगाळ वातावरण असून वारा पाऊस सुरू

  • 21 Jul 2021 08:21 AM (IST)

    Aurangabad Rain Update | औरंगाबाद जिल्ह्यात तुरळक पावसाच्या सरी, कोकण मुंबईत धुवांधार पाऊस

    औरंगाबाद :-

    औरंगाबाद जिल्ह्यात आज तुरळक पावसाच्या सरी

    एकीकडे कोकण मुंबईत धुवांधार पाऊस

    मराठवाड्यात मात्र अजूनही मोठ्या पावसाची अपेक्षा

    मोठ्या पावसाअभावी मराठवाड्यातील अनेक धरणे भरण्याच्या प्रतीक्षेत

    आज संपूर्ण मराठवाड्यात ढगाळ वातावरणासह हलक्या स्वरूपाचा पाऊस

  • 21 Jul 2021 08:20 AM (IST)

    Nashik Rain Update | नाशिक शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला, पेरणीच्या कामांना वेग

    नाशिक – शहर आणि परिसरात पावसाचा जोर वाढला..

    सलग दोन दिवसांपासून पावसाची संततधार..

    पावसाच्या हजेरीने पेरणीच्या कामांना वेग..

    धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने धरण साठ्यात वाढ

  • 21 Jul 2021 07:48 AM (IST)

    Ratnagiri Rain Update | रत्नागिरीत रात्रभर ठीकठिकाणी सरींवर पाऊस

    रत्नागिरी –

    रात्रभर ठीकठिकाणी सरींवर पाऊस

    पहाटेपासून पावसाची विश्रांती

    पुढील दोन दिवसांसाठी रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याचा रेड अलर्ट

    सततच्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील 90 टक्के भात लावण्याची काम पूर्ण

  • 21 Jul 2021 07:12 AM (IST)

    Kolhapur Red Alert | कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट

    कोल्हापूर :

    कोल्हापूर जिल्ह्यासाठी आज आणि उद्या रेड अलर्ट

    जोरदार पावसाचा हवामान खात्याचा अंदाज

    गगनबावडा,राधानगरी, चंदगड,आजरा,भुदरगड, पन्हाळा-शाहूवाडी या तालुक्यात अधिक पाऊस बरसणार

    नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची भीती व्यक्त करत नदीकाठच्या गावाना दिला सतर्कतेचा इशारा

    डोंगराळ भागात भुस्कलन आणि दरडी कोसळण्याचा ही धोका

    हवमान विभागाच्या इशाऱ्या नंतर जिल्हा प्रशासन ही सज्ज

  • 21 Jul 2021 06:54 AM (IST)

    Mumbai Rain Update | मुंबईत आजही काही ठिकाणी हलका ते जास्त स्वरुपाच्या पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

    मुंबईत आजही काही ठिकाणी हलका ते जास्त स्वरुपाचा पाऊसाची शक्यता

    हवामान खात्याचा अंदाज