‘त्या’ फोटोवरून रान पेटलेलं असताना संजय राऊतांचं पुन्हा नवं ट्विट; म्हणाले…

Sanjay Raut on BJP : आधी 'तो' फोटो ट्विट, मग 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उधळण्याचा ठपका अन् आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आता एक नवं ट्विट केलं आहे. या नव्या ट्विटमध्ये संजय राऊत यांनी भाजपवर टीका केलीय. एका हिंदी म्हणीच्या आधारे त्यांनी निशाणा साधलाय. वाचा...

'त्या' फोटोवरून रान पेटलेलं असताना संजय राऊतांचं पुन्हा नवं ट्विट; म्हणाले...
Follow us
| Updated on: Nov 21, 2023 | 10:24 AM

मुंबई | 21 नोव्हेंबर 2023 : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विट केलेला ‘तो’ फोटो महाराष्ट्रात चर्चेत आहे. त्या एका फोटोने राज्याच्या राजकीय वर्तुळासह महाराष्ट्रभर चर्चा झाली. संजय राऊत यांनी पुन्हा एकदा तो फोटो ट्विट केला आहे. काल दिवसभरात संजय राऊत यांनी सलग तीन ट्विट केले. या ट्विटमध्ये त्यांनी एक फोटो शेअर केला अन् फोटोत दिसणारी व्यक्ती ही जुगार खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. या तीन स्फोटक ट्विट केले. या ट्विटमधून त्यांनी टीकेची तोफ डागली. आता आज त्यांनी नवं ट्विट केलं आहे. यात त्यांनी पुन्हा भाजपवर शाब्दिक वार केलाय. माझ्या ट्विटला भाजपने उत्तर देणं हे ‘आ बैल, मुझे मार!’, असं असल्याचं संजय राऊत म्हणालेत.

संजय राऊत यांचं नवं ट्विट, जसंच्या तसं

मी माझ्या ट्विटमध्ये कुणाचं नाव घेतलं किंवा आरोप केले? नाही…! मी माझ्या ट्विटमध्ये एवढंच म्हटले आहे की, महाराष्ट्र जळत आहे… अशात ‘काही निरो मकाऊ (चीन) मध्ये जुगार खेळण्यात व्यस्त आहेत. पण भाजपने एक हिट विकेट फेकली आणि जाहीर केलं की, चित्रातील व्यक्ती ‘त्यांचा’ प्रदेशाध्यक्ष आहे. (!) बरं, बरं, बरं… यालाच ते हिंदीत म्हणतात – ‘आ बैल, मुझे मार’!!

संजय राऊत यांचं पहिलं ट्विट

महाराष्ट्र पेटलेला आहे… आणि हे महाशय मकाऊ येथे कासिनोत जुगार खेळत आहेत. फोटो zoom करुन पहा…ते तेच आहेत ना?पिक्चर अभी बाकी है…

भाजपचं प्रत्युत्तर

संजू भाऊचा सकाळी 9 वाजताच्या भोंग्यापूर्वीचा ‘ब्रँड’ तर संपूर्ण महाराष्ट्राला आता कळून चुकला आहे. पण, आज दुपारच्या वायफळ बडबडीपूर्वीचा ब्रँड आता शोधूनच काढावा लागेल. बंदा ये संजय कौनसा नशा करता है…?

संजय राऊत यांचं दुसरं ट्विट

19 नोव्हेंबर मध्यरात्री मुक्काम पोस्ट: मकाऊ,veneshine. साधारण 3.50 कोटी कॅसिनो जुगारात उडवले असे प्रत्यक्ष दर्शी सांगतात. हिंदुत्ववादी असल्याने महाशय द्युत ..खेळले तर बिघडले कोठे? ते तेच आहेत ना?

संजय राऊत यांचं तिसरं ट्विट

ते म्हणे.. फॅमिल सह मकाऊ ला गेले आहेत..जाऊ द्या. त्यांची सोबत बसलेली फॅमिली चिनी आहे का? ते म्हणे.. कधीच जुगार खेळले नाहीत.. मग ते नक्की काय करीत आहेत? त्यांच्या टेबलावर मारुती स्तोत्र आहे का? जेवढे खुलासे कराल तेवढे फसाल! झाला तेवढा तमाशा पुरेसा नाही काय!

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.