छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येतायेत, हे…; संजय राऊतांचा घणाघात

Sanjay Raut on Narendra Modi Sabha Shahu for Loksabha Election 2024 and Maharaj Chhatrapati : शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी नरेंद्र मोदी यांच्या सभेवर जोरदार टीका केली. आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर......

छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येतायेत, हे...; संजय राऊतांचा घणाघात
sanjay raut
Follow us
| Updated on: Apr 27, 2024 | 12:03 PM

आज नरेंद्र मोदी यांची कोल्हापूरमध्ये सभा होणार आहे. संध्याकाळी पाच वाजता तपोवन मैदानात मोदींची सभा होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. कोल्हापुरातच नाही तर महाराष्ट्रात नरेंद्र मोदींनी तंबू ठोकला आहे. लवकरच मुंबईत सभा घेणार आहेत. छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी मोदी येत आहेत, हे महाराष्ट्र लक्षात ठेवेल. शाहू महाराजांनी राज्याला आणि देशाला पुरोगामी विचार दिले. जे शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचा पराभव करण्यासाठी नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येतात हे ऐकून मला अजिबात धक्का बसला नाही. भाजपने त्या ठिकाणी उमेदवार जाहीर करणंच चुकीच आहे, असं म्हणत संजय राऊतांनी भाजप आणि नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

संजय राऊतांचा मोदींवर निशाणा

छत्रपती शाहू महाराजांना बिनविरोध निवडून द्याव ही आमची भूमिका होती. कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची होती. तरी छत्रपती शाहू महाराजांसाठी आम्ही ती जागा सोडली आणि भाजप नरेंद्र मोदी हे छत्रपती शाहू महाराजांच्या विरोधात प्रचार करण्यासाठी येत आहेत. महाराष्ट्रातली जनता हे कधीच विसरणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादी पुढे नरेंद्र मोदी कोणी नाहीत. कोल्हापूरची गादी म्हणजे मोदींची गादी नाही. भाजपा त्या गादीचा अपमान करत आहे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

आम्हाला अपेक्षित होतं. मोदी छत्रपती शाहू महाराजांचा पराभव करण्यासाठी महाराष्ट्रात येतात. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा त्या गादीची आहे. शिवाजी महाराजांचा सन्मान ती प्रेरणादायी घोषणा आम्ही देते. महाराष्ट्राची ती कुलदैवत आहे त्यावर तुम्ही आघात करत आहात. शिवाजी महाराजांच्या गादीच्या विरोधात तुम्ही प्रचाराला आला आहात. ‘जय भवानी जय शिवाजी’ ही घोषणा आमची प्रचाराची घोषणा नाही तर प्रेरणास्थान आहे. त्याच्याशी तुमचा संबंध काय?, असा सवाल संजय राऊतांनी विचारला आहे.

महायुतीवर हल्लाबोल

महायुतीच्या जाहीरनाम्याचा तसा काही उपयोग नाही. अजित पवार किंवा शिंदे गटाचा यांचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. शिर्डीत विमानातून वेगळ्या प्रकारचे सामान आलं, असं तेथील लोक सांगत आहेत. त्यांची भिस्त ही पैशांवर आहे. मतांवर नाही. त्यामुळे जाहीरनामा करून त्यांना काय करायचं आहे. त्यांना टीका करू द्या. आधी लिहायला वाचायला शिका, त्यांना जाहीरनामा कळतो का?, असं म्हणत संजय राऊत यांनी महायुतीवर शाब्दिक हल्ला चढवला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.