मुंबई ठाण्यासह राज्यात उष्णतेची लाट कायम, तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता
राज्याची राजधानी मुंबईत (mumbai) प्रचंड उकाडा जाणवायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतलं तापमान (tempreture) सकाळी 11 वाजल्यापासून वाढायला सुरुवात होईल
मुंबई – राज्याची राजधानी मुंबईत (mumbai) प्रचंड उकाडा जाणवायला सुरूवात झाली आहे. विशेष म्हणजे मुंबईतलं तापमान (tempreture) सकाळी 11 वाजल्यापासून वाढायला सुरुवात होईल. सध्या राज्यातील अनेक भागात उष्णतेची लाट (heat wave) पाहायला मिळत आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची ही लाट कायम राहणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेने जाहीर केली आहे. गोवा, कोकण, आणि उत्तर महाराष्ट्राला तापमानाचा फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच मध्य महाराष्ट्राला 17 मार्चनंतर उन्हाच्या झळा बसेल असा अंदाज पुणे वेध शाळेने वर्तविला आहे. त्याचबरोबर ठाणे जिल्ह्यातही दोन दिवस उष्णतेची लाट राहणार आहे. उष्माघातापासून बजाव करण्यासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केली आहे. दुपारी 12 ते 4 या चार तासात बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबई आणि ठाणे शहरात मोठ्या प्रमाणात तापमान वाढणार असल्याने उन्हाचा बचाव करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी विविध उपाय सांगितले आहेत.
- उष्णतेच्या लाटेपासून बचावासाठी अशी घ्या काळजी
- दुपारच्या वेळेस घरातून बाहेर पडणे टाळावे
- तुम्हाला तहान लागली नसेल तरी अधिक पाणी प्यावे
- शक्यतो हलके, पातळ, आणि सुती कपडे वापरावे
- उन्हात जाताना गॉगल, छत्री, टोपीचा वापर करावा
- पाण्याची बाटली सोबत ठेवावी
- उन्हात काम करणा-या व्यक्तींनी डोक्यावर छत्री किंवा टोपीचा वापर करावा
- कपड्याने आपला चेहरा झाकावा
मुंबई ठाण्यासह इतर राज्यात तापमान 40 अंशापार जाण्याची शक्यता
पुढील दोन दिवसात मुंबई ठाण्यासह महाराष्ट्रात उष्णतेची लाट 40 अंशापार जाण्याची शक्यता पुण्याच्या हवामान वेध शाळेने वर्तवली आहे. तापमान वाढल्यास मुंबईकरांना आणि उन्हाच्या झळा सोसाव्या लागणार आहेत. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी हवामानबाबत एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी मुंबईत तापमान वाढणा असल्याचं म्हटलं आहे. त्याचबरोबर दोन दिवसानंतर हे तापमान हळूहळू कमी होण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
मुंबई उष्णतेच्या लाटेचे स्पष्टीकरण: येत्या 2 दिवसांसाठी मुंबईचे कमाल तापमान 39°C राहील व नंतर हळूहळू कमी होण्याची शक्यता. -IMD कृपया घाबरू नका पण काळजी घ्या. किनारपट्टीच्या भागासाठी उष्णतेच्या लाटेचा निकष: कमाल तापमान सामान्य तापमानापेक्षा 4.5°C वर व कमाल तापमान किमान 37°Cअसावे. pic.twitter.com/0u2vQ2ivLn
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) March 14, 2022
या कारणामुळे उष्णतेची लाट
गुजरात आणि राजस्थानमध्ये तयार झालेल्या उच्च दाबाच्या पट्ट्याने ही तापमानात वाढ झाली आहे. समुद्र किनारी येणारे वारे उशिरा येत असल्याने कमी झालेली हवेतील आर्द्रता ही देखील तापमान वाढीस कारणीभूत असल्याचे हवामान अभ्यासक अभिजीत मोडक यांनी सांगितले आहे.