टीव्ही 9 मराठीच्या ‘राँग कट’ला मानाचा NT पुरस्कार; कार्यक्रमाचे प्रोड्यूसर अजय सोनवणे यांचा विशेष सन्मान
Tv9 Marathi wrong cut Programme NT Awards : न्यूजक्षेत्रातील मानाचा NT पुरस्कार जाहीर झाला. टीव्ही 9 मराठीच्या 'राँग कट' या कार्यक्रमाला मानाचा NT पुरस्कार मिळाला. 'राँग कट' या कार्यक्रमाचे प्रोड्यूसर अजय सोनवणे आणि 'राँग कट' टीमचा विशेष सन्मान करण्यात आला.
नवी दिल्ली | 10 डिसेंबर 2023 : टीव्ही 9 मराठी… महाराष्ट्राचं नंबर वन चॅनेल… महाराष्ट्राच्या मनामनावर राज्य करणाऱ्या या चॅनेलने पुरस्कार क्षेत्रातही आपला ठसा उमटवला आहे. टीव्ही 9 मराठीच्या बातम्या आणि प्रसारित होणऱ्या विशेष कार्यक्रमांनाही प्रेक्षकांची पसंती मिळते. तसंच पुरस्कार क्षेत्रातही टीव्ही 9 मराठीने मोहोर उमटवली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या NT पुरस्कारांमध्येही टीव्ही 9 मराठीचा बोलबाला पाहयला मिळाला. ‘राँग कट’ या टीव्ही 9 मराठीच्या कार्यक्रमाला NT पुरस्कार प्राप्त झाला. लोकांच्या मनात घर करून असलेल्या ‘राँग कट’ या कार्यक्रमाचा NT या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ‘राँग कट’चे प्रोड्यूसर अजय सोनवणे आणि ‘राँग कट’च्या संपूर्ण टीमचं यावेळी विशेष कौतुक करण्यात आलं.
‘राँग कट’ ला NT पुरस्कार
टीव्ही 9 मराठीचा लोकप्रिय कार्यक्रम ‘राँग कट’ला मानाचा NT पुरस्कार मिळाला आहे. ‘राँग कट’चे प्रोड्यूसर अजय सोनवणे आणि संपूर्ण टीमचा गौरव करण्यात आलाय. काल दिल्लीत NT पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. करंट अफेयर्स स्पेशल श्रेणीत टीव्ही 9 मराठीच्या ‘राँग कट’ या विशेष कार्यक्रम हा सन्मान मिळाला.
महाराष्ट्र इन्फ्रा सीरिजचाही विशेष गौरव
राजकीय व्यंग म्हणून ‘राँग कट’ या कार्यक्रमाला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळते. तसंच पुरस्कार सोहळ्यातही या कार्यक्रमाचं विशेष कौतुक झालं. ‘राँग कट’बरोबरच न्यूज डॉक्यूमेंट्री श्रेणीत टीव्ही 9 मराठीच्या महाराष्ट्र इन्फ्रा सीरिजलाही गौरवलं गेलं. या इन्फ्रा सीरिजच्याद्वारे प्रोड्यूसर स्वप्निल बेलणेकरांच्या कामाला NT अवॉर्डनं गौरवलं गेलं.
‘राँग कट’ काय आहे?
वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या ही टीव्ही 9 मराठीची ओळख आहे. मात्र या शिवाय टीव्ही 9 मराठीवर विशेष कार्यक्रमही प्रसारित होतात. या कार्यक्रमालाही महाराष्ट्राच्या जनतेची पसंती मिळते. असाच आमचा ‘राँग कट’ हा विशेष कार्यक्रम… हा कार्यक्रम सध्याच्या राजकीय परिस्थितीवर मार्मिक भाष्य करतो. कुणावरही वैयक्तिक टिप्पणी न करणारं व्यंग ‘राँग कट’ या आमच्या कार्यक्रमात असतं. राजकारणाची जाण असणाऱ्या मंडळींची कार्यक्रमाला पसंती मिळते. ‘राँग कट’मधील व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. या कार्यक्रमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. राज्यात एखादी मोठी घडामोड घडली तर ‘राँग कट’मध्ये याबाबत काय प्रसारित होतं? याकडे महाराष्ट्राचं लक्ष असतं.
मानाचा NT पुरस्कार
माध्यमांमध्ये हिंदी-मराठी-तेलगूसह वेगवेगळ्या भाषेत आणि क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्यांना NT अवॉर्डनं सन्मानित केलं जातं. न्यूजक्षेत्रात NT अवॉर्ड मोठ्या सन्मानाचा मानला जातो. यंदाचा हा पुरस्कार टीव्ही 9 मराठीच्या ‘राँग कट’ या कार्यक्रमाला तसंच महाराष्ट्र इन्फ्रा सीरिजला मिळाला.