Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांचा नीतीश कुमार यांना फोन; म्हणाले, अहो अजून…

Uddhav Thackeray Call to Nitish Kumar : उद्धव ठाकरे यांचा नीतिश कुमार यांना फोन. दोघांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा. लोकसभा निवडणूक आणि जागा वाटपावर या दोघांमध्ये चर्चा झाली. या दोघांनी कोणत्या मुद्द्यांवर चर्चा केली? आगामी निवडणुकीबाबत इंडिया आघाडीची तयारी कुठपर्यंत? वाचा...

उद्धव ठाकरे यांचा नीतीश कुमार यांना फोन; म्हणाले, अहो अजून...
Follow us
| Updated on: Jan 04, 2024 | 4:05 PM

मुंबई | 04 जानेवारी 2024 : लोकसभा निवडणुकीला अवघे तीन ते चार महिने राहिलेत. अशातच इंडिया आघाडीत जागा वाटपावर अद्याप सहमती झालेली नाहीये. अशात आणखी काही पक्षही इंडिया आघाडीत सामील होण्याची शक्यता आहे. त्याचमुळे कदाचित जागा वाटपाचा प्रश्न अद्याप प्रलंबित आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार या लोकसभेच्या जास्त जागा आहेत. अशातच इंडिया आघाडीत विविध घडामोडी घडत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना फोन केला असल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे यांचा नीतीश कुमार यांना फोन

उद्धव ठाकरे यांनी नीतीश कुमार यांना फोन केला. या फोनमध्ये दोघांची विविध गोष्टींवर बातचित झाली. भाई… असं कसं चालेल… आतापर्यंत आम्ही काहीही केलेलं नाही. आमची कोणतीच रॅली झालेली नाही. कुणी संयोजक झालेलं नाही. जागा वाटपावरही सविस्तर चर्चा झालेली नाही, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

उद्धव ठाकरे यांनी नितीश कुमार यांना आवाहन केल्यानंतर त्यांनीही उत्तर दिलं. हा… असं आहे की 22 जानेवारीला अयोध्येत राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतर देशात निवडणुका होऊ शकतात. काहीच महिन्यात देशात निवडणुका होतील. मग वेळ आहे कुठे? वेळ उरलेलाच नाही, असं नितीश कुमार म्हणाले.

इंडिया आघाडीत काय घडतंय?

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहे. अशातच विविध घडामोडी घडत आहेत. इंडिया आघाडीच्या जागा वाटपावर अद्याप चर्चा सुरू आहे. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष जागावाटपावर चर्चा करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी, ठाकरे गट यांच्यात जागावाटपावर चर्चा होतेय.

वंचित बहुजन आघाडी या निवडणुकीत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. प्रकाश आंबेडकर यांची ठाकरे गट आणि शरद पवार यांच्याशी जागावाटपावर चर्चा होत आहे. प्रकाश आंबेडकर यांनी जागापवाटपाचा फॉर्म्युलाही मांडला आहे. त्यामुळे येत्या काळात प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीत येणार का? हे पाहावं लागेल.

सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा
सुशांतचा खून होतानाचं शूटिंग नोकराने केलं? नारायण राणे यांचा मोठा दावा.
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?
त्याला सांगा तो जिथं जातो तिथं.., राणेंचा ठाकरेंना काय होता सल्ला?.
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'
नितेश राणेंचा पेडणेकरांना थेट सवाल, 'दिशा सालियनच्या घरी 3 तास काय...'.
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?
औरंगजेबाच्या कबरीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया काय?.
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?
नागपूर राड्याप्रकरणी आणखी दोघांना बेड्या, कोण आहेत 'ते' दोघे?.
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.