सत्तांतरानंतर पहिली मोठी निवडणूक जाहीर? कुणाचा उडणार धुव्वा?

उद्धव ठाकरे गटाला शह देण्यासाठी या निवडणुकीत शिंदे गट पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला भाजपची मिळणारी रसद महत्वाची ठरणार आहे.

सत्तांतरानंतर पहिली मोठी निवडणूक जाहीर? कुणाचा उडणार धुव्वा?
Mumbai University Senate ElectionImage Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us
| Updated on: Aug 09, 2023 | 11:05 PM

मुंबई : ९ ऑगस्ट २०२३ : राज्यात सत्तातंर होऊन एक वर्ष पूर्ण झाले. या एक वर्षांत अनेक घडामोडी घडल्या. आधी एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत जात राज्यात सत्ता स्थापन केली. एका वर्षानंतर राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार त्यांना येऊन मिळाले. अजित दादांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर, इकडे महाविकास आघाडातील उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे नेते राज्यात निवडणूक घेण्याची सातत्याने मागणी करत आहेत. रुजतात निवडणूक घेण्यास शिंदे सरकार आणि भाजप घाबरत असल्याचा आरोप सातत्याने उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे. मात्र, उद्धव ठाकरे गटाची प्रतिष्ठा पणाला लावणारी एक महत्वाची निवडणूक जाहीर झाली आहे.

उद्धव ठाकरे गटाला शह देण्यासाठी या निवडणुकीत शिंदे गट पूर्ण ताकदीनिशी उतरणार आहे. या निवडणुकीत शिंदे गटाला भाजपची मिळणारी रसद महत्वाची ठरणार आहे. मात्र, त्या तुलनेत शिंदे गट आणि भाजपाला अजित पवार गटाची ताकद कमी प्रमाणात मिळण्याची शक्यता आहे. तर, ‘एकला चलो रे’ची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची कामगिरीही या निवडणुकीत दिसून येणार आहे.

हे सुद्धा वाचा

12 जानेवारीला मतदार नोंदणीची मुदत संपली. असे असतानाही निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर न केल्याने युवासेनेने प्रशासनाला धारेवर धरत निवडणुका कधी होणार, असा थेट सवाल केला होता. अखेर, या निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत.

मुंबई महाविद्यालयाच्या सिनेट पदांसाठी या निवडणूका होणार आहेत. 10 सिनेट पदांसाठी या निवडणूक होणार आहेत. 10 सप्टेंबर रोजी निवडणूक होणार असून या निवडणुकीत 95 हजार पदवीधर मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

सध्या मुंबई महाविद्यालयाच्या सिनेट पदांमध्ये उद्धव ठाकरे गटाचे वर्चस्व आहे. या निवडणूक जाहीर झाल्याने आता शिवसेनेचे दोन्ही गट ( ठाकरे गट, शिंदे गट ) आणि मनसे असे तीन पक्ष ताकदीनिशी उतरण्याची शक्यता आहे.

गेल्या निवडणुकीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेला 100 टक्के यश मिळाले होते. युवासेनेने दहाच्या दहा जागा जिंकून सिनेटवर एकहाती वर्चस्व निर्माण केले होते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत आदित्य ठाकरे विरुद्ध अमित ठाकरे असा सामना रंगणार आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.