चार वेळा नॅशनल अॅवॉर्ड, देवदास ते बाजीराव मस्तानी सिनेमांसाठी सेटची उभारणी; एक नजर नितीन देसाई यांच्या करिअरवर…

Who is Nitin Desai : बॉलिवूडमधील सिनेमांचे भव्य सेटची निर्मिती ते नरेंद्र मोदी यांच्यासाठीची 'ती' रणनिती; पाहा नितीन देसाई यांच्या कामाचा आलेख...

चार वेळा नॅशनल अॅवॉर्ड, देवदास ते बाजीराव मस्तानी सिनेमांसाठी सेटची उभारणी; एक नजर नितीन देसाई यांच्या करिअरवर...
Follow us
| Updated on: Aug 02, 2023 | 1:03 PM

मुंबई | 02 ऑगस्ट 2023 : नितीन चंद्रकांत देसाई… हे नाव उच्चारलं की डोळ्यासमोर उभे राहतात भव्यदिव्य सेट्स… एन डी स्टुडिओ… पण याच एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. अवघी सिनेसृष्टी हळहळली आहे. नितीन देसाई यांच्या आतापर्यंतच्या कामावर एक नजर टाकूयात…

नितीन चंद्रकांत देसाई यांचं सिनेसृष्टीसाठी मोठं योगदान दिलं. बॉलिवूडमधील अनेक ऐतिहासिक आणि बिगबजेट सिनेमांसाठी त्यांना कला दिग्दर्शन केलं आहे.

1989 साली त्यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केलं. परिंदा या सिनेमासाठी पहिल्यांदा त्यांनी कला दिग्दर्शन केलं. नितीन देसाई यांनी अनेक सुपरहिट सिनेमांसाठी सेट्सची निर्मिती केली आहे. हम दिल दे चुके सनम, मिशन काश्मीर, राजू चाचा, देवदास, लगान, बाजीराव मस्तानी या सिनेमांसाठी नितीन देसाई यांनी कला दिग्दर्शन केलं होतं.

चार वेळा नॅशनल अॅवॉर्ड

सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शक म्हणून नितीन देसाई यांना चार वेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक सिनेदिग्दर्शकांसोबत काम केलं आहे. संजय लीला भन्साळी, विधु विनोद चोपडा, राजकुमार हिरानी, आशुतोष गोवारीकर यांच्या सिनेमांसाठी नितीन चंद्रकांत देसाई यांनी कला दिग्दर्शन केलं आहे.

पंतप्रधान होण्याआधी गुजरातचे मुख्यमंत्री असताना नरेंद्र मोदी मुंबईत आले होते. तेव्हा दादरच्या शिवाजी पार्कवर झाला होता. तेव्हा नरेंद्र मोदी यांना कमळातून कार्यकर्त्यांसमोर आणलं गेलं होतं. ही संकल्पना नितीन देसाई यांचीच होती. ती कल्पना मोदींना प्रचंड आवडली. पुढे पंतप्रधान झाल्यानंतर वाराणसीमधल्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये देसाईंना त्यांनी काम दिलं.

नितीन देसाई काळाच्या पडद्याआड

कर्जतमध्ये असलेल्या एन डी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांचा मृतदेह आढळून आला. नितीन देसाई रात्री झोपण्यासाठी आपल्या खोलीत गेले. त्यानंतर ते बाहेर आलेच नाहीत. सकाळी खोलीत पाहिलं असता त्यांचा मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला.

कर्जतचे आमदार महेश बाल्डी यांनी नितीन देसाई यांच्या मृत्यूविषयी माहिती दिली आहे. नितीन देसाई आर्थिक अडचणीतून जात होते. मागच्या काही दिवसांपासून ते याच त्रासातून जात होते. त्यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं, असा अंदाज महेश बाल्डी यांनी व्यक्त केला आहे.

मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.