MahaInfra Conclave: मुंबई 2025 पर्यंत World Class City होईल, शाश्वत विकास हाच केंद्रबिंदू, MMR अधिकाऱ्यांचं आश्वासन!
MMR क्षेत्राला पाच वर्षात 2010 ला आणि 2025 ला होता, त्यात अमूलाग्र बदल झाला असेल. सगळ्या मेट्रोचं नेटवर्क पूर्ण झालं असेल. पुढच्या पाच वर्षात ज्या एमएमआरची कल्पना आपण स्वप्नातही केली नसेल, ते चित्र पहायला मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईः मुंबई आणि महाराष्ट्राचा भविष्यातील पायाभूत सुविधांचा रोडमॅप (Mumbai Roadmap) काय असेल, मुंबईतील मेट्रो पॉलिटन रिजनमधील प्रकल्पांचा नागरिकांना कसा फायदा होईल, हे जाणून घेण्यासाठी राज्यातील आघाडीची वृत्त वाहिनी टीव्ही 9 मराठीने आज ‘महा इन्फ्रा कॉन्क्लेव्ह’चे (Mahainfra Conclave) आयोजन केलं आहे. या महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या हस्ते झालं असून उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनीही कार्यक्रमाला उपस्थिती लावली. महाराष्ट्रातील उद्योगाचं भविष्यातील चित्र काय असेल, याचं एक आश्वासक चित्र त्यांनी उभं केलं. याच कॉनक्लेव्हमध्ये MMR अर्थात मुंबई मेट्रो पॉलिटन रिजन क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर काम करणाऱ्या अत्यंत तज्ज्ञ अधिकाऱ्यांचं पॅनलदेखील सहभागी झालं. मुंबई मेट्रो, मुंबई कोस्टल रोड, मुंबई ट्रान्स हार्बर लिंक आणि इतर प्रकल्पांद्वारे एमएमआर क्षेत्रात कसे अमूलाग्र बदल होणार याचं अगदी सविस्तर विश्लेषण या कार्यक्रमात करण्यात आलं. तसंच येत्या तीन वर्षात म्हणजेच 2025 पर्यंत मुंबई ही World Class City होईल आणि राहण्यासाठी हे उत्तम ठिकाण असेल, असं आश्वासन या कार्यक्रमात सहभागी अधिकाऱ्यांनी दिलं.
देशातली पहिली अंडरग्राउंड मेट्रो हे मोठं चॅलेंज!
महा इन्फ्रा कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना एमएमआरसीएलचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंग देओल म्हणाले, देशातील पहिली अंडरग्राउंड मेट्रो बनतेय. या मार्गात कोस्टल एरिया जवळ असल्याने एक वेगळं आव्हान आहे. मुंबईसाठी एक वेगळं चॅलेंज आहे. साऊथ मुंबईत खूप जुन्या आणि ऐतिहासिक इमारती आहे. मेट्रोसाठी भूयार खोदताना या इमारतींना थोडाही धक्का लागला नाही पाहिजे, अशी योजना होती. प्रत्येक ठिकाणी आम्ही मेजरमेंट युनिट लावले होते. व्हायब्रेशन किती होतात, काम करताना काही कुठे जमीन धसते का, यावर सतत लक्ष होते. एकदा अंडरग्राउंड पाणी कसे जाते, यावरही लक्ष होते. मिठी नदीच्या खालून साडेचारशे मीटर भुयार गेले आहे. हे सगळं आव्हानात्मक काम आमची टीम करत होती. सुदैवाने ही सगळी कामं आम्ही आतापर्यंत व्यवस्थित पार पाडली आहेत. जो ट्रॅक लावणार आहोत, तो मार्ग हेरिटेज एरियातून जातो. जे भारतात कुठेही लावलेले नाहीत. स्वित्झर्लंडमध्ये असे तंत्रज्ञान आहे. म्हणजे ट्रेन सुरु होताना, अगदी नगण्य व्हायब्रेशन जाणवले पाहिजे, असा फीला आला पाहिजे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. 66 पैकी आतापर्यंत 15 किलोमीटरच्या ट्रॅकचं काम पूर्ण झालं आहे. MMRCL जनजागृती उत्तम केली आहे. पीआर टीमने सुरुवातीपासून अशा एरियातून जायचं असल्यामुळे लोकांचा सहभागाशिवाय हे शक्यच नव्हतं. हे रस्त्याच्या खाली स्टेशन
लोकांना अपडेट देत राहणंही महत्त्वाचं!
सध्याचे नागरिक अत्यंत सजग झाले असून प्रत्येक विकास प्रकल्पाबद्दल जाणून घेण्याची त्यांना उत्सुकता असते. ही माहिती देणं आमचं कर्तव्य, या प्रक्रियेत संवादाला खूप महत्त्व आहे, असं सांगताना एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार या कॉन्क्लेव्हमध्ये बोलताना म्हणाले, लोकांना काम किती झालंय, याची खूप उस्तुकता असते. समृद्धी महामार्गाची वेबसाइट आहे, त्यावर कोणता भाग किती पूर्ण झाला, किती मागे राहिला, यासंदर्भात पोस्ट आमच्याकडून केल्या जातात. पण अनेकदा अडचणी पोस्ट करता येत नाही. कारण अखेर विकास ही राजकीय प्रक्रिया आहे. यात संवाद साधणे हा एकमेव मार्ग असतो. अडीच वर्ष आम्ही बांद्रा-वरळी सी लिंकबद्दल अपडेट देत होते. पण काही अपडेट देता येत नाहीत. ते समजून घेणं अपक्षेति आहे. जमीन अधिग्रहणापासून प्रकल्प पूर्ण होईपर्यंत माध्यमांना अपडेट द्यावे लागतात. समृद्धी महामार्गाचे तर शेकडो सिटिझन जर्नलिस्ट आहेत. ते थेट जातात, माहिती टाकतात. त्यामुळे आमचं बहुतांश काम सोपं झालं आहे.
पुढील पाच वर्षात मुंबई World Class city होणार!
येत्या काही वर्षात MMR क्षेत्रातील विकासामुळे काय बदल दिसून येतील, असे विचारले असता अधिकाऱ्यांनी अत्यंत सकारात्मक आणि आश्वासक प्रतिक्रिया दिली. MMR क्षेत्राला पाच वर्षात 2010 ला आणि 2025 ला होता, त्यात अमूलाग्र बदल झाला असेल. सगळ्या मेट्रोचं नेटवर्क पूर्ण झालं असेल. पुढच्या पाच वर्षात ज्या एमएमआरची कल्पना आपण स्वप्नातही केली नसेल, ते चित्र पहायला मिळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. एमएसआरडीसीचे अधिकारी म्हणाले, 2025 मध्ये मुंबईची खूप प्रगती झालेली असेल. आपण एक आर्थिक राजधानी म्हणून मेट्रो पॉलिटन रिजनला पाहतो. ज्या पद्धतीने लोक स्थलांतर करून इथे येत आहेत. त्यांना सर्वांना पायाभूत सुविधा पुरवण्याच्या दृष्टीने आम्ही सर्व अधिकारी, इतर शासनाच्या संस्थांचे जे काम सुरु आहे. ते पूर्ण झाले तर लोकांचं जगणं अधिक सुकर होईल. हे करताना मुंबईकर घरातून बाहेर पडल्यानंतर सोयीने चालत जाऊन एखादं मेट्रो स्टेशन गाठणं, कामाच्या ठिकाणीही चालत पोहोचलो तर आपलं वर्ड क्लास शहर होईल. – एमएमआर हे खूप मोठं एरियआ आहे. येत्या काही वर्षात जो बदल दिसेल, तो अमूलाग्र असेल. मेट्रो पॉलिटन एरियातील विकासासाबोत शाश्वतता महत्त्वाची आहे. 40 टक्के वनक्षेत्र राहिल, याची काळजी घेतली जाईल. मुंबई हे राहण्याजोगं शहर करायचं असेल तर त्यासाठी प्रयत्न करणार आहोत. प्रकल्प होतात तेव्हा ज्यांच्या जमिनी जातात, त्यांना आम्ही या लोकांना एक केंद्रबिंदू ठेवत असतो. अखेरचा प्रकल्प हा शाश्वत विकास हाच असेल, असं आश्वासन अधिकाऱ्यांच्या वतीनं देण्यात आलं.
इतर बातम्या-