मुंबई : गेल्या काही तासात मुंबईसह महाराष्ट्रात प्रचंड पाऊस (Heavy Rain) सुरू आहे, मुंबईतही प्रचंड पाऊस सुरू असून मंगळवारी मुंबई शहरात या महिन्यात सगळ्यात जास्त पाऊस झाला असून अजूनपर्यंत झालेल्या पावसापेक्षा तिप्पट पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत गेल्या 24 तासामध्ये 124 मिमी पावसाची नोंद (124 mm of rain recorded in 24 hours) करण्यात आली आहे. यामध्ये सकाळी 2.30 ते 8.30 या सहा तासात 100 मिमी पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. सगळ्यात जास्त पाऊस झाल्याने भारतीय हवामान खात्याकडून (IMD) रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे सांताक्रूझ वेधशाळेने सकाळी 8.30 ते रात्री 8.30 या 12 तासामध्ये22.6 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे.
गेल्या काही तासात मुंबईत प्रचंड पाऊस झाल्यामुळे मंगळवारी सकाळी 8.30 पर्यंत पावसाचा हा आकडा 124 मिमीवर पोहोचला होता. भारतीय वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की पहाटे 2.30 नंतर पावसाचा जोर मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे सकाळपर्यंत पावसाचा एकूण आकडा 100 मिमी ओलांडल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुंबईसह परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने पावसाच्या अंदाजानुसार बुधवारी शहर आणि ठाण्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. गुरुवार ते शनिवारपर्यंत हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. गुजरात किनारपट्टीपासून ते केरळच्या किनारपट्टीपर्यं कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मंगळवारी सकाळी 8.30 नंतर मुंबईतील उर्वरित भागात पावसाचे प्रमाण कमी झाले तर संध्याकाळी 5.30 वाजल्यानंतर झालेल्या पावसाची नोंद सांताक्रूझ वेधशाळेने 7 मिमी पावसाची नोंद केली आहे. शनिवारपासून पावसाचा जोर पुन्हा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून 13 ऑगस्टपासून पुन्हा जोरदार पावसाची शक्यता असल्याचे वेधशाळेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.