अकरावी प्रवेशाचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर
अखेर अकरावी प्रवेशाचे रखडलेले वेळापत्रक जाहीर झाले आहे. दहावीच्या (SSC) निकालानंतर दहाव्या दिवशी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. आजपासून (19 जून) अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. (11th Admission Schedule declared)
मुंबई : अखेर अकरावी प्रवेशाचे रखडलेले वेळापत्रक जाहीर झाले आहे. आजपासून (19 जून) अकरावी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. दहावीच्या (SSC) निकालानंतर दहाव्या दिवशी हे वेळापत्रक जाहीर करण्यात आले. दहावीचा निकाल यावर्षी कमी लागल्याने 11 प्रवेशाचा तिढा प्रवेशाच्या जागा वाढवून सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
अकरावी प्रवेश प्रकियेत विद्यार्थ्यांना सुरुवातीला प्रवेशाचा भाग 1 आणि नंतर भाग 2 भरायचा आहे. कॉलेज पसंती क्रमांकही नोंदवायचा आहे. त्यानंतर प्रवेशासाठी गुणवत्ता यादी जाहीर होईल आणि महाविद्यालयात प्रवेश मिळेल.
11 वी प्रवेशाचे वेळापत्रक बायफोकल प्रवेश: अर्ज, पसंतीक्रम भरणे, कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखांचेही अर्ज भरणे, महाविद्यालयांनी कोट्यातील प्रवेश पूर्ण करणे, बायफोकल वगळता इतर शाखांचे ऑनलाईन प्रवेशअर्ज सादर करणे – 19 ते 23 जून
सर्व शाखा आणि बायफोकल यामध्ये भाग 1 आणि भाग 2 अर्ज भरता येणार – 19 ते 29 जूनपर्यंत (सायंकाळी 5 वाजेपर्यंत)
बायफोकल विषयाची पहिली गुणवत्ता यादी – 25 जून (सायंकाळी 6 वाजता)
बायफोकल विषयाच्या पहिल्या यादीतील ऑनलाइन प्रवेश – 26 व 27 जून (सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत)
सर्वसाधारण गुणवत्ता यादी – 1 जुलै (सकाळी 11 वाजता)
अर्जाची पुर्नतपासणी हकरती – 2 आणि 3 जुलै (सकाळी 10 ते सायंकाळी 5)
पहिली गुणवत्ता यादी – 6 जुलै (सकाळी 11 वाजता)
यादीनुसार प्रवेश घेणे – 8 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5) ते 10 जुलै (सकाळी 11 ते दुपारी 3)
रिक्त जागा तपशील – 10 जुलै (सायंकाळी 7 वाजता)
भाग 1 व 2 अर्ज भरण्यासाठी उपलब्ध – 11 व 12 जुलै
दुसरी गुणवत्ता यादी – 15 जुलै (सायंकाळी 6 वाजता)
यादीनुसार प्रवेश घेणे – 16 ते 17 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5) ते 18 जुलै (सकाळी 11 ते दुपारी 3)
रिक्त जागांचा तपशील – 18 जुलै (सायंकाळी 7 वाजता)
भाग 1 व 2 अर्ज भरण्यासाठी उपलब्ध – 19 ते 20 जुलै, (सकाळी 11 ते सायंकाळी 5)
तिसरी गुणवत्ता यादी – 23 जुलै (सायंकाळी 6 वाजता)
तिसर्या यादीनुसार प्रवेश घेणे – 24, 25 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5) ते 26 जुलै (सकाळी 11 ते दुपारी 3)
तिसर्या यादीनंतर रिक्त जागा – 26 जुलै (सायंकाळी 7 वाजता)
कटऑफ लिस्ट – 26 जुलै (सायंकाळी 7 वाजता)
भाग 1 व 2 अर्ज भरण्यासाठी उपलब्ध – 27 व 29 जुलै (सकाळी 11 ते सायंकाळी 5)
विशेष गुणवत्ता यादी – 31 जुलै (सायंकाळी 6 वाजता)
विशेष यादीनुसार प्रवेश घेणे – 1 व 2 ऑगस्ट (सकाळी 11 ते सायंकाळी 5)
रिक्त जागांची यादी संकेतस्थळावर जाहीर होणार – 3 ऑगस्ट (सकाळी 10 वाजता)