गिझरमधील गॅस लीक, वाढदिनीच बाथरुममध्ये गुदमरुन 15 वर्षीय मुलीचा मृत्यू
आंघोळ करताना गीझरमधील गॅस लीकीज झाल्याने 15 वर्षीय मुलीचा बाथरुममध्ये गुदमरुन मृत्यू (Gas geyser leak girl death in bathroom) झाला.
मुंबई : आंघोळ करताना गीझरमधील गॅस लीकीज झाल्याने 15 वर्षीय मुलीचा बाथरुममध्ये गुदमरुन मृत्यू (Gas geyser leak girl death in bathroom) झाला. ही घटना 10 जानेवारी 2020 रोजी गोराई, बोरिवली येथे घडली. विशेष म्हणजे ध्रुवीच्या वाढदिनीच तिचा मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. ध्रुवी गोहील असं मृत मुलीचं (Gas geyser leak girl death in bathroom) नाव आहे.
ध्रुवी सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी आंघोळीला जाते असं सांगून बाथरुममध्ये गेली. पण एक तास झाल्यावरही ध्रुवी बाथरुममधून बाहरे न आल्यामुळे घरातल्यांनी बाथरुमचा दरवाजा बाहरुन वाजवला. यावेळी दरवाजा तोडून पाहिल्यावर ध्रुवी बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळली. तसेच बाथरुममध्ये चार फूटापर्यंत काचेवर गॅस पसरलेला होता. ध्रुवीचा पायही गरम पाण्याने भाजला होता.
ध्रुवीला तातडीने मंगलमूर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण 24 तासांनतर ध्रुवीचा मृत्यू झाला. रुग्णालयातील डॉक्टरांच्या रिपोर्टनुसार, मुलीचा मृत्यू गीझरमधील गॅस लीकीज झाल्यामुळे गुदमरुन झाला. दरम्यान, ध्रुवी 15 वर्षाची असून दहावीमध्ये शिकत होती.
“मी सर्वांना विनंती करतो गीझरचा वापर करु नका. पाणी गरम करुन किंवा इलेक्ट्रिक गीझरचा वापर करा”, असं आव्हान मृत ध्रुवीचे वडील राजीव गोहिल यांनी केले.
दरम्यान, वाढदिनीच ध्रुवीचा मृत्यू झाल्याने तिच्या कुटुबियांना मानसिक धक्का बसला आहे. त्या सोबतच गॅस गीझरचा वापर टाळण्याचे आव्हान त्यांनी सर्वांना केलं आहे.