पश्चिम रेल्वेवर आणखी 17 एसी लोकल धावणार, एकूण एसी फेऱ्यांची संख्या आता 79 वरुन 96
मध्य रेल्वेच्या मुख्यमार्गावर 6 नोव्हेंबर पासून एसी लोकलच्या दहा फेऱ्या वाढणार असतानाच आता पश्चिम रेल्वेने सोमवारपासून एसी लोकलच्या लोकलच्या आणखी 17 फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या एसी लोकल साध्या लोकलच्या बदल्यात चालविण्यात येणार असल्याने एकूण लोकल फेऱ्याची वाढणार नसल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
मुंबई | 4 नोव्हेंबर 2023 : मध्य रेल्वेने एकीकडे सहा नोव्हेंबरपासून एसी लोकलच्या 10 फेऱ्या वाढविण्याचा निर्णय घेतला असताना आता पश्चिम रेल्वेही सोमवार दि.6 नोव्हेंबर एसी लोकलच्या आणखी 17 फेऱ्या चालविणार आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्याची संख्या 79 वरुन 96 इतकी होणार आहे. या लोकल साध्या लोकलच्या बदल्यात चालविण्यात येणार असल्याने पश्चिम रेल्वेवरील एकूण लोकल फेऱ्याची संख्या तेवढीच म्हणजे 1394 इतकीच रहाणार आहे. या एसी लोकल फेऱ्या सोमवार ते शुक्रवार चालविण्यात येतील तर शनिवारी आणि रविवारी नॉन-एसी लोकल म्हणून चालविण्यात येतील. तसेच डहाणू ते अंधेरी दरम्यान धावणारी लोकल आता चर्चगेटपर्यंत चालविण्यात येणार असल्याने तिच्या वेळात बदल होणार आहे.
पश्चिम रेल्वेवर सोमवारपासून चालविण्यात येणाऱ्या 17 नवीन एसी लोकलच्या फेऱ्यांपैकी 9 फेऱ्या अप दिशेला तर 8 फेऱ्या डाऊन दिशेला चालविण्यात येतील. अप दिशेला ( चर्चगेटकडे ) नालासोपारा-चर्चगेट, विरार-बोरीवली आणि भाईंदर-बोरीवली दरम्यान प्रत्येकी एक फेरी, विरार-चर्चगेट दरम्यान दोन फेऱ्या आणि बोरीवली-चर्चगेट दरम्यान चार फेऱ्या तर डाऊन ( विरारकडे ) दिशेला चर्चगेट-भाईंदर आणि बोरीवली-विरार दिशेला प्रत्येकी एक फेरी, चर्चगेट-विरार आणि चर्चगेट- बोरीवली दरम्यान प्रत्येकी तीन फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.
अप दिशेच्या फेऱ्या
1 ) नालासोपारा – स. 4.55 वा. – चर्चगेट – स. 6.30 वा. – धीमी
2 ) बोरीवली – स. 7.47 वा. – चर्चगेट – स. 8.41 वा. – जलद
3 ) बोरीवली – स. 9.35 वा. – चर्चगेट – स. 10.29वा. – जलद
4 ) बोरीवली – स. 11.23 वा. – चर्चगेट – दु. 12.12 वा. – जलद
5 ) विरार – दु. 1.34 वा. – चर्चगेट – दु. 2.52 वा. – जलद
6 ) विरार – सायं. 4.48 वा. – बोरीवली – सायं. 5.26 वा. – धीमी
7) बोरीवली – सायं. 5.28 वा. – चर्चगेट – सायं. 6.17 वा. – जलद
8 ) विरार – रा. 7.51 वा. – चर्चगेट – रा. 8.15 वा. – जलद
9 ) भाईंदर – रा. 10.56 वा. – बोरीवली – रा. 11.11 – धीमी
डाऊन दिशेच्या फेऱ्या
1) चर्चगेट – स.6.35 वा. – बोरीवली – स. 7.41वा. – धीमी
2 ) चर्चगेट – स.8.46 वा. – बोरीवली – स. 9.30 वा. – जलद
3 ) चर्चगेट – स.10.32 वा. – बोरीवली – स. 11.18 वा. – जलद
4 ) चर्चगेट – दु.12.16 वा. – विरार – दु. 1.27 वा. – जलद
5 ) चर्चगेट – दु.3.07 वा. – विरार – दु. 4.30 वा. – जलद
6 ) चर्चगेट – सायं.6.22 वा. – विरार – रा. 7.46 वा. – जलद
7 ) चर्चगेट – रा.9.23 वा. – भाईंदर – रा. 10.43 वा. – धीमी
8 ) बोरीवली – रा.11.19 वा. – विरार – रा. 11.56 वा. – धीमी