Eknath Shinde : मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेला खिंडार, 18 नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा; एकनाथ शिंदे म्हणतात…

लवकरच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. दिशाभूल करणारी वक्तव्ये करत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. 166पेक्षा जास्त आमदार (MLAs) आमच्याकडे आहेत. आमचे सरकार स्थिर असून आम्ही सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहोत, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली.

Eknath Shinde : मीरा भाईंदरमध्ये शिवसेनेला खिंडार, 18 नगरसेवकांचा शिंदे गटाला पाठिंबा; एकनाथ शिंदे म्हणतात...
मीरा भाईंदरमधील 18 शिवसेना नगरसेवकांच्या पाठिंब्याविषयी बोलताना एकनाथ शिंदेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jul 14, 2022 | 7:55 PM

मीरा भाईंदर : शिवसेनेतील 18 नगरसेवकांनी (Shiv Sena corporators) शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. अनेक महापालिका, नगर परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि सर्वसामान्य नागरिक या सर्वांनी नव्या सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आमची सर्वसामान्यांना न्याय देण्याची जी जबाबदारी आहे, ती योग्य प्रकारे पाडणार आहोत, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले आहेत. शिवसेनेच्या खासदारांशी संपर्क झालेला नाही. मात्र आम्हाला सगळीकडूनच पाठिंबा मिळत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. यावेळी त्यांनी लवकरच मंत्रिमंडळाचा शपथविधी होईल. दिशाभूल करणारी वक्तव्ये करत असतील, तर तो त्यांचा प्रश्न आहे. 166पेक्षा जास्त आमदार (MLAs) आमच्याकडे आहेत. आमचे सरकार स्थिर असून आम्ही सामान्यांच्या हिताचे निर्णय घेत आहोत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

सरनाईकांना शिवसेनेने हटविल्यानंतर शिंदे गटाला समर्थन

मीरा भाईंदर महापालिकेची शिवसेनेची संपूर्ण जबाबदारी ही आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे होती. मात्र सरनाईकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिल्याने शिवसेनेने त्यांना हटवले होते. आता सरनाईक यांनी आपल्या समर्थक नगरसेवकांसह शिंदे गटाला पूर्ण पाठिंबा दिला आहे. बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाची भूमिका आम्ही पुढे घेऊन जात आहोत. त्यामुळेच या 18 नगरसेवकांनी समर्थन दिल्याचे मुख्यमंत्री शिंदे यावेळी म्हणाले. आता 18 नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. पहिल्या टप्प्यानंतर आता हळूहळू आणखी नगरसेवक आणि इतर नेते पाठिंबा देणार असल्याचेही एकनाथ शिंद म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले एकनाथ शिंदे?

सर्वसामान्यांकडून पाठिंबा

अनेक महापालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, सामान्य नागरिक, या सगळ्यांना सरकारला मान्यता दिलेली आहे. मोठ्या प्रमाणावर नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांना त्यांच्या विचारांचे सरकार मिळाले आहे. तर समर्थन देणाऱ्या या 18 नगरसेवकांचे स्वागत करतो आणि मनापासून धन्यवाद देतो. राज्यात ज्या काही घडामोडी पाहत आहोत, त्या सांगण्याची गरज नाही. हे सरकार जी भूमिका घेऊन स्थापन झाले आहे, ते सर्वसामान्यांच्या न्यायाचे सरकार आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.