पब्जी गेमसाठी मुंबईत तरुणाची आत्महत्या

मुंबई : कुर्ला येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पब्जी (PUBG) गेम खेळण्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करुन न दिल्याच्या रागात तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या राजकोटमध्ये घरातल्यांनी पब्जी (PUBG) गेम खेळण्यासाठी नकार दिल्यावर एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती. कुर्ला येथील नेहरु नगरमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय नदीम शेख याने पब्जी खेळण्यासाठी नवीन […]

पब्जी गेमसाठी मुंबईत तरुणाची आत्महत्या
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 4:32 PM

मुंबई : कुर्ला येथे तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पब्जी (PUBG) गेम खेळण्यासाठी नवीन स्मार्टफोन खरेदी करुन न दिल्याच्या रागात तरुणाने हे टोकाचं पाऊल उचललं. काही दिवसांपूर्वी गुजरातच्या राजकोटमध्ये घरातल्यांनी पब्जी (PUBG) गेम खेळण्यासाठी नकार दिल्यावर एका 15 वर्षीय मुलाने आत्महत्या केली होती.

कुर्ला येथील नेहरु नगरमध्ये राहणाऱ्या 19 वर्षीय नदीम शेख याने पब्जी खेळण्यासाठी नवीन स्मार्टफोन विकत घेण्यास सांगत होता. नदीमला जो स्मार्टफोन पाहिजे होता, त्याची किंमत 37 हजार रुपये होती. त्यामुळे नदीमची त्याच्या कुटुंबीयासोबत भांडण झाले. मात्र घरातल्यांनी शेवटी घरातले नदीमला 20 हजार रुपये देण्यास तयार झाले होते.

पोलिसांच्या माहितीनुसार, नदीम सेल्स एक्झीक्युटिव्ह म्हणून काम करत होता. तो आपली आई, मोठा भाऊ, त्याची पत्नी आणि भावाच्या मुलांसोबत राहत होता. गुरुवारी रात्री नवीन स्मार्टफोन घेण्यासाठी मोठ्या भावसोबत त्याचा वाद झाला. त्यामुळे रात्री उशिरा त्याच्या भावाने गळफास लाऊन आत्महत्या केली. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोदं करत अधिक तपास करत आहे.

नदीमला स्मार्टफोनवर गेम खेळण्याची सवय होती. तो पब्जी खेळण्यासाठी बऱ्याच दिवसांपासून नवीन स्मार्टफोन मागत होता. घटनेच्या दिवशी सुद्धा नदीम आपल्या स्मार्टफोनवर गेम खेळत होता आणि त्यानंतर किचनजवळ जात त्याने गळफास घेत आत्महत्या केली.

सध्या ऑनलाईन गेम पब्जीवर बंदी आणावी अशी मागणी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना  11 वर्षीय मुलाने पब्जी गेमवर बंदी आणावी यासाठी पत्र लिहिले होते. अहम निजाम अस त्या मुलाचे नाव आहे. यासोबत त्यांनी मुंबई पोलीस आयुक्त यांनी ही पत्र लिहिले होते. पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, पब्जी गेममुळे समाजात हिंसा वाढत आहे.

हे वाचा : PUBG गेमवर बंदी घाला, 11 वर्षीय मुलाचं मुख्यमंत्र्यांना पत्र

काय आहे पब्जी गेम?

दोनवर्षांपूर्वी म्हणजेच मार्च 2017 मध्ये पब्जी हा ऑनलाईन गेम लाँच झाला. विशेष म्हणजे हा गेम जपानच्या बॅटल रॉयल या थ्रिलर चित्रपटावर बनवण्यात आला आहे. या गेममध्ये विद्यार्थी आणि सरकार विरुद्ध संघर्ष दाखवला आहे. तसेच यामध्ये खेळाडू शस्त्रांसह एकमेकांसोबत लढतात. जो खेळाडू शेवटपर्यंत या गेममध्ये स्वत:चा जीव वाचवून जिवंत राहतो तो विजयी ठरतो. प्ले स्टोअरवरुन अनेकांनी हा गेम डाऊनलोड केला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.