अर्ज न करताही 21 वर्षीय अब्दुल्लाहला गुगलची नोकरी, पगार 1.2 कोटी
मुंबई : ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’सारख्या (आयआयटी) संस्थांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. मात्र, अशा कोणत्याही नामांकित संस्थेतून शिक्षण घेतलेले नसतानाही एका 21 वर्षीय तरुणाला थेट गुगलची 1.2 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे अब्दुल्लाह खान नावाच्या या तरुणाने या नोकरीसाठी स्वतःहून अर्जही केलेला नव्हता. अब्दुल्लाह खानने मुंबईमधील मीरा […]
मुंबई : ‘इंडियन इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजी’सारख्या (आयआयटी) संस्थांमधील विद्यार्थ्यांना चांगल्या पॅकेजची नोकरी मिळाल्याच्या बातम्या आपण अनेकदा ऐकतो. मात्र, अशा कोणत्याही नामांकित संस्थेतून शिक्षण घेतलेले नसतानाही एका 21 वर्षीय तरुणाला थेट गुगलची 1.2 कोटी रुपयांच्या पॅकेजची नोकरी मिळाली आहे. विशेष म्हणजे अब्दुल्लाह खान नावाच्या या तरुणाने या नोकरीसाठी स्वतःहून अर्जही केलेला नव्हता.
अब्दुल्लाह खानने मुंबईमधील मीरा रोडच्या एल. आर. तिवारी इंजिनिअरिंग कॉलेजमधून इंजीनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. तो सप्टेंबरमध्ये गुगलच्या लंडन येथील कार्यालयात रुजू होईल. त्याला गुगलने 1.2 कोटी रुपयांचे वार्षिक पॅकेज दिले आहे. आपल्या गुगलमधील नोकरीबद्दल बोलताना अब्दुल्लाह म्हणाला, ‘मी कधीही गुगलमध्ये नोकरीसाठी अर्ज केला नाही. कंपनीने एका कॉम्पिटेटीव्ह प्रोग्रामिंग चॅलेंज आयोजित करणाऱ्या वेबसाईटवर माझे प्रोफाईल पाहून मला बोलावले.’
‘आपण फक्त आवड म्हणून कॉम्पिटेटीव्ह प्रोग्रामिंगमध्ये सहभाग घेतला होता. त्यातून नोकरीची आपल्याला कोणतीही आशा नव्हती आणि त्यासाठी तेथे सहभागही घेतला नव्हता’, असेही अब्दुल्लाहने नमूद केले. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये अब्दुल्लाहला गुगलकडून अधिकृत ईमेल आला. या मेलने अब्दुल्लाहचं आयुष्य बदलून टाकलं. हा ईमेल पाहून तो प्रथम अवाक झाला आणि त्याने हा मेल आपल्या मित्राला दाखवला. त्या मित्रालाही असा अन्य एक व्यक्ती माहित होता ज्याला असाच ईमेल आला होता. अब्दुल्लाहला आलेल्या या मेलमध्ये गुगलला त्याची माहिती एका वेबसाईटवरुन मिळाल्याचेही नमूद करण्यात आले होते. यानंतर अब्दुल्लाहच्या अनेक फेऱ्यांमध्ये मुलाखती झाल्या. अखेर या महिन्यात त्याची गुगलच्या लंडन येथील कार्यालयात ‘फाइनल स्क्रीनिंग’ फेरी झाली.
‘आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत झाला होता नापास’
अब्दुल्लाह खानने सौदी अरबमधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आणि त्यानंतर तो मुंबईमध्ये स्थलांतरित झाला. त्याने आयआयटीसाठीही तयारी केली, मात्र आयआयटीच्या प्रवेश परीक्षेत तो नापास झाला होता.
व्हिडीओ पाहा: