नवी मुंबईकरांनो सावधान! फेब्रुवारीत 2110 कोरोना रुग्णांची वाढ

नवी मुंबई शहरात सध्या ठिकठिकाणी गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.

नवी मुंबईकरांनो सावधान! फेब्रुवारीत 2110 कोरोना रुग्णांची वाढ
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: Feb 20, 2021 | 7:30 PM

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु शहरात सध्या ठिकठिकाणी गर्दी वाढल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. नवी मुंबईकरांसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे. आशिया खंडातील सर्वात मोठ्या बाजारपेठा नवी मुंबईत आहेत. या पाचही बाजारपेठांमध्ये सध्या प्रचंड गर्दी पाहायला मिळते. येथील लोक सामाजिक अंतर ठेवत नाहीत, तोंडाला मास्कही लावत नाहीत. त्यामुळे अल्प कालावधीतच कोरोना रुग्ण दुप्पट झाले आहेत. (2110 new corona patients registered in Navi Mumbai)

फेब्रुवारी महिन्यातील 20 दिवसांमध्ये नुवी मुंबईत 2 हजार 110 रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या आता 805 वरून 1040 वर पोहोचली आहे. नागरिकांनी नियमांचे पालन केले नाही तर परिस्थिती पुन्हा हाताबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सध्या देण्यात आलेली शिथिलता व करोना संसर्ग कमी होत गेल्याने नागरिकांमध्ये वाढलेली बेशिस्ती आणि त्यात एपीएमसी बाजारात नियमांची होणारी पायमल्ली यामुळे करोना रुग्णसंख्या वाढत असल्याचे बोलले जात आहे.

नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात दिवाळी ते 31 जानेवारीदरम्यान कोरोना रुग्णांची संख्या कमी होऊ लागली होती. दिघा, इंदिरानगर व चिंचपाडा नागरी आरोग्य केंद्राचा परिसर पूर्णपणे कोरोनामुक्त झाला होता. परंतु 1 फेब्रुवारीला रेल्वे सेवा सर्वांसाठी खुली झाल्यापासून कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागला आहे. एक महिन्यापूर्वी प्रतिदिन 40 ते 60 रुग्ण वाढत होते. सद्य:स्थितीमध्ये हे प्रमाण 80 ते 100 झाले आहे. एक महिन्यात शुक्रवारी प्रथमच एकाच दिवशी 109 रुग्ण आढळले आहेत.

रेल्वे सेवा सुरू झाल्यापासून नवी मुंबई मनपा क्षेत्रात तब्बल 2 हजार 110 रुग्ण वाढले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्याही वाढली आहे. बेलापूर, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे परिसरातील परिस्थिती गंभीर होऊ लागली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीसह सर्वच बाजारपेठांमध्ये नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जात आहे. मास्कचा वापर केला जात नाही. सोशल डिस्टन्सिंगचाही नागरिकांना विसर पडला आहे. महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनीही रुग्णवाढीची गंभीर दखल घेतली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

संबंधित बातम्या

मोठी बातमी : राज्यात नाईट कर्फ्यू लागू होण्याची शक्यता, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांचे संकेत

मुंबईतील ऑफिसच्या वेळा बदलणार? मुख्यमंत्री मोदींना म्हणतात, कायदा करा!

दिल्लीतून महाराष्ट्रात कोरोना पाठवला जातो का? नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल

(2110 new corona patients registered in Navi Mumbai)

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.