Coroanvirus: मुंबईत 90 लाखांच्या टार्गेटपैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण संपन्न: आदित्य ठाकरे

Aaditya Thackeray | केंद्र सरकारकडून जसजसा लसपुरवठा होतोय तसतसा लसीकरणाचा वेग वाढेल. त्यासाठी नवे धोरण आखण्यात आले आहे.

Coroanvirus: मुंबईत 90 लाखांच्या टार्गेटपैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण संपन्न: आदित्य ठाकरे
कोरोना लसीकरण
Follow us
| Updated on: Jul 02, 2021 | 3:02 PM

मुंबई: काही दिवसांपूर्वी राज्यातील कोरोनाचा हॉटस्पॉट असलेल्या मुंबईत सध्या लसीकरणाची मोहीम अत्यंत वेगाने सुरु आहे. मुंबईत 90 लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य प्रशासनाकडून डोळ्यांसमोर ठेवण्यात आले होते. यापैकी 44 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी दिली. (44 Lakh peoples get vaccinated in Mumbai says Shivsena MLA Aaditya Thackeray)

ते शुक्रवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. सध्या चेंबुर आणि वरळी परिसरात पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना लस देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. जास्तीत जास्त पोलीस परिवारांना लस देण्याचा प्रयत्न केला जात आहे. केंद्र सरकारकडून जसजसा लसपुरवठा होतोय तसतसा लसीकरणाचा वेग वाढेल. त्यासाठी नवे धोरण आखण्यात आले आहे. मात्र, तरीही नागरिकांनी कोरोना टाळण्यासाठी काळजी घेणे गरजेचे आहे, असे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईतील निर्बंधांबाबत आदित्य ठाकरे यांची दिलगिरी

यावेळी आदित्य ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत लादण्यात आलेल्या निर्बंधांविषयी दिलगिरी व्यक्त केली. लोकांच्या मनात निर्बंध लादण्यात आल्यामुळे नाराजी निर्माण झाली आहे. त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. मात्र, हे निर्बंध लोकांचे जीव वाचवण्यासाठीच लागू करण्यात आले आहेत. लोकांनी या निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी केले.

‘सीबीआय, ईडी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनाही लस देणार’

आतापर्यंत पोलीस आणि सीआपीएफ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचे लसीकरण झाले. मात्र, आगामी काळात केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (CBI) आणि सक्तवसुली संचलनालयाच्या (ED) कुटुंबीयांसाठीही लसीकरण कार्यक्रम आयोजित करु, असे वक्तव्य शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी केले. फ्रंटलाईन वर्कर्सचं लसीकरण झालं असलं तरी ते घरी गेल्यानंतर कुटुंबीयांना कोरोनाची लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे आम्ही फ्रंटलाईन वर्कर्सच्या कुटुंबीयांचं लसीकरण करण्यावर भर देत असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या:

महामारी म्हणून जबाबदारी झटकू नका, PM केअर फंडात हजारो कोटी जमा, मृतांच्या नातेवाईकांना मदत द्या, शिवसेनेची मागणी

लस न घेतलेल्यांचा पगार वाढणार नाही; कर्मचाऱ्यांच्या लसीकरणासाठी कंपन्यांची कठोर पावलं

Special Report | लस घेतल्यानंतर ताप आल्यास पेनकिलर घेताय!

(44 Lakh peoples get vaccinated in Mumbai says Shivsena MLA Aaditya Thackeray)

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....