डोंबिवलीत एकाच घरातल्या 5 जणांचा बुडूम मृत्यू
डोंबिवलीत एकाच घरातल्या 5 जणांचा बुडूम मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. संदप गावात खदाणीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे.
डोंबिवली: डोंबिवलीत एकाच घरातल्या 5 जणांचा बुडूम मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. संदप गावात खदाणीत बुडून पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये 2 महिला आणि तीन मुलांचा समावेश असून कपडे धुण्यासाठी गेले असताना ही घटना घडली आहे. आई -आजी कपडे धुण्यासाठी गेले असताना त्यांच्यासोबत गेलेल्या तीन मुलं काठावर खेळत होती. त्यावेळी त्यांचा पाय घसरला आणि ती पाण्यात पडली. त्यांना वाचवण्यासाठी पहिल्यांदा आईनं आणि नंतर आजीनं पाण्यात उडी मारली पण त्यांना पोहता येत नसल्याने या त्यांचा बुडून मृत्यू झाला.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.