झाडाची फांदी कोसळून वयोवृद्ध महिलेचा मृत्यू, चिमुकल्यासह 2 जखमी
या घटनेमुळे मान्सून सुरू झाल्यापासून शहरात झाड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या चार वर पोहोचली आहे. २८ जूनपासून आत्तापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला आहे.
मुंबई : मान्सूनला (monsoon) जोरात सुरूवात झाली असून शहरात झाडाच्या फांद्या (tree branch) कोसळून लोक जखमी झाल्याच्या बऱ्याच घटना घडताना दिसत आहेत. मंगळवारीही अशी एक दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे. एका झाडाची मोठी फांदी अंगावर कोसळल्यामुळे एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला. तसेच या घटनेत एका महिलेसह तीन वर्षांचा लहान मुलगाही गंभीर जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईतील मालाड या उपनगरात मंगळवारी ही दुर्घटना घडली.
मात्र या घटनेमुळे मान्सून सुरू झाल्यापासून शहरात झाड कोसळून मृत्यूमुखी पडलेल्या लोकांची संख्या चार वर पोहोचली आहे. 28 जूनपासून आत्तापर्यंत चार जणांना जीव गमवावा लागला आहे.
मालाडमधील कासम बाग येथे दुपारी 4.30 च्या सुमारास हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. दोन महिला व तो लहान मुलगा त्यांच्या नातेवाईकाला भेटण्यासाठी रुग्णालयात जात असतानाच ही दुर्घटना घडली. त्यांच्या अंगावर अचानक मोठी फांदी पडल्याने ते तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र शिंदबाई अहिरे यांना कांदिवली येथील रुग्णालयातील डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर या घटनेत जखमी झालेल्या रेखाबाई सोनावणे (46) आणि त्या लहान मुलावर जीवन ज्योती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत झाला चार जणांचा मृत्यू
झाडाच्या फांद्या कोसळून आत्तापर्यंत एकूण चार जणांचा मृत्यू झाला आहे. 28 जून रोजी मालाड येथील रहिवासी कौशल दोशी (३८) यांचा झाडाखाली चिरडून मृत्यू झाला होता. तर त्याच दिवशी गोरेगावच्या एमजी रोड येथे लॉंड्री मालक असलेले प्रेमलाल निर्मल (३०) यांच्या अंगावर नारळाचे झाड अंगावर कोसळल्याने त्यांना जीव गमवावा लागला. 29 जून रोजी भायखळ्यात रेहमान खान (22) यांच्या अंगावर मोठा वटवृक्ष कोसळल्याने त्यांचा मृत्यू झाला.