Mega Block | ठाणे-दिवा नव्या मार्गिकेच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून 72 तासांचा मेगाब्लॉक, 350 लोकल रद्द

मध्य रेल्वेवर (Central Railway) पुन्हा एकदा 72 तासांचा मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा मेगा ब्लॉक घेतला जाणार आहे.

Mega Block | ठाणे-दिवा नव्या मार्गिकेच्या कामासाठी आज मध्यरात्रीपासून 72 तासांचा मेगाब्लॉक, 350 लोकल रद्द
रविवारी मेगाब्लॉक
Follow us
| Updated on: Feb 04, 2022 | 8:36 PM

मुंबई : मध्य रेल्वेवर (Central Railway) पुन्हा एकदा 72 तासांचा मेगा ब्लॉक (Mega block) घेण्यात येणार आहे. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सध्या ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम सुरू आहे. या कामासाठीच हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. आज मध्यरात्रीपासून हा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  5 , 6 आणि 7 फेब्रुवारी रोजी हा ब्लॉक घेतला जाणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. या मेगा ब्लॉकदरम्यान, शंभर पेक्षा जास्त लांब पल्ल्याच्या एक्सप्रेस (Express) आणि मेल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर 350 लोकल ट्रेन देखील या मेगा ब्लॉकदरम्यान धावणार नाहीत. ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान 5 व्या लाईनवर आणि दिवा ते ठाणे स्थानकादरम्यान अप फास्ट लाईन आणि 6 व्या लाईनवर हा मेगा ब्लॉक असणार आहे. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या सर्व गाड्या 3 दिवस बंद राहणार आहेत. प्रवाशांनी याकाळात सहकार्य करण्याचे आवाहन रेल्वे विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

अनेक एक्सप्रेस गाड्या रद्द

कोकणात जाणाऱ्या तेजस, जन शताब्दी, एसी डबल डेकर, तसेच कोच्चूवेली, मंगलोर, हुबळी या एक्सप्रेस गाड्या दिनांक पाच, सहा आणि सात फेब्रुवारी रोजी बंद राहणार आहेत. याबरोबरच डेक्कन एक्सप्रेस, डेक्कन क्वीन एक्सप्रेस, जालना जन शताब्दी, कोयना एक्सप्रेस, पंचवटी एक्सप्रेसह शंभर एक्सप्रेस गाड्या तीन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. त्यासोबतच दिवा-वसईदरम्यान धावणाऱ्या मेमु ट्रेन देखील या काळात बंद राहणार आहेत. तर सर्व फास्ट गाड्या स्लो मार्गावर वळविण्यात येणार आहेत.

मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल

ठाणे ते दिवा स्थानकादरम्यान असलेल्या पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी आतापर्यंत अनेक मेगा ब्लॉक घेण्यात आले असून, आता पुन्हा एकदा आज मध्यरात्रीपासून  ते सात फेब्रुवारीदरम्यान एक ब्लॉक घेण्यात येणार आहे. हा मेगा ब्लॉक तब्बल 72 तासांचा असणार आहे. मध्यरेल्वेकडून वारंवार घेण्यात येत असलेल्या या मेगा ब्लॉकमुळे प्रवाशांचे हाल होत असून, वाहतूकीची देखील समस्या निर्माण होते, मात्र ही समस्या सोडवण्यासाठी मागील ब्लॉकच्या वेळी महापालिका आणि रेल्वे विभागाच्या वतीने जादा बसेसची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

संबंधित बातम्या

सलग दुसऱ्या महिन्यात बोगदा खनन कामात महानगरपालिकेची विक्रमी कामगिरी, प्रकल्पाचे किती काम पूर्ण?

‘ट्रॅफिकमुळे तीन टक्के घटस्फोट होतात’, अमृता फडणवीसांचा दावा; सत्ताधाऱ्यांचं जोरदार प्रत्युत्तर, महिला वकिलांचं मत काय?

Hindustani bhau : रुको जरा सबर करो, हिंदुस्तानी भाऊचा कोठडी मुक्काम वाढला, पोलिसांच्या हाती काय माहिती?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.