देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपतीच्या मुलीच्या लग्नातील 9 महत्त्वाच्या गोष्टी
मुंबई : भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि अब्जाधीश उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल हे दोघे 12 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. संपूर्ण विश्वाचं लक्ष या ग्रँड लग्न सोहळ्याकडे होतं. हा संपूर्ण भव्य सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. रात्री सुमारे 4 वाजता नवरीची विदाई झाली. मुकेश अंबानी आणि नीता […]
मुंबई : भारतातले सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची कन्या इशा अंबानी आणि अब्जाधीश उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामल हे दोघे 12 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकले. संपूर्ण विश्वाचं लक्ष या ग्रँड लग्न सोहळ्याकडे होतं. हा संपूर्ण भव्य सोहळा रात्री उशिरापर्यंत सुरु होता. रात्री सुमारे 4 वाजता नवरीची विदाई झाली.
मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची 27 वर्षांची मुलगी ईशा रिलायन्स जिओच्या संचालक मंडळामध्येही आहे. येल विद्यापीठातून तिने डिग्रीचं शिक्षण पूर्ण केलं. पीरामल कुटुंबीय आणि अंबानी कुटुंबीयांचे अगोदरपासूनच जिव्हाळ्याचे संबंध होते. ते आता नात्यामध्ये बदलले आहेत.
लग्नातील महत्त्वाच्या 9 गोष्टी
या लग्नासाठी अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांचीही उपस्थिती होती. शिवाय माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, गृहमंत्री राजनाथ सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचीही उपस्थिती होती.
अंबानींची मुंबईतील अँटिलिया ही 27 मजली बिल्डिंग नवरीसारखी सजवण्यात आली होती. घरच्या प्रवेशद्वारापासून ते घरापर्यंत विविध फुलांनी सजावट करण्यात आली होती. घराच्या परिसरातील रस्तेही सजवल्यामुळे सौंदर्य आणखी वाढलं होतं.
अंबानींची दोन्ही मुलं काल दुपारी घोड्यावर बसून नवरदेव आनंद पीरामल यांना निमंत्रण देण्यासाठी गेले. ही एक प्रथा आहे, ज्यात नवरदेवाला निमंत्रण दिलं जातं आणि मग त्यानंतर नवरदेव वऱ्हाडासह येतं.
वरात यानंतर अँटिलिया इमारतीमध्ये पोहोचली आणि भारतीय पद्धतीने दिमाखात हा विवाह सोहळा पार पडला. पहाटे चार वाजता नवरीची विदाई करण्यात आली.
लग्नापूर्वी प्री-वेडिंग कार्यक्रम राजस्थानमधील उदयपूरमध्ये झाला होता, जिथे हॉलिवूड आणि बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी परफॉर्मन्स सादर केला होता.
या विवाह सोहळ्यानंतर आता 14 तारखेला म्हणजे उद्या मुंबईत रिसेप्शनचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमात ऑस्कर विजेता ए. आर. रहमानचा परफॉर्मन्स पाहुण्यांना पाहता येणार आहे.
या लग्नात बॉलिवूडमधून सर्वात लक्ष वेधून घेणारी जोडी म्हणजे प्रियांका चोप्रा-नीक आणि दीपिका-रणवीर यांची होती. या जोडप्यांचं नुकतंच लग्न झालं आहे.
लग्नाच्या आधी मुकेश अंबानी यांनी उदयपूरमध्ये एक प्री वेडिंग सोहळा ठेवला होता. 7 डिसेंबरला झालेल्या या सोहळ्यात 5 हजार 100 लोकांसाठी चार दिवसांची विशेष अन्न सेवा सुरु केली होती. या लोकांना 10 डिसेंबरपर्यंत रोज तीनवेळचं जेवण देण्यात आलं.
अंबानींचे जावई आनंद पीरामल देशातील प्रसिद्ध रिअल इस्टेट कंपन्यांपैकी एक असलेल्या पिरामल रिअल्टीचे कार्यकारी संचालक आहेत. आनंद पीरामल इंडियन मर्चंट चेंबरच्या युवा विंगचे सर्वात कमी वयाचे अध्यक्षही होते. आनंद पीरामल यांनी पेंसिल्वेनिया विद्यापीठातून अर्थशास्त्रात ग्रॅज्युएशन केलं आहे. तर हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनची डिग्री मिळवली.