नऊ वर्षांच्या व्योमने ‘हेल्थ अॅप’ बनवलं
मुंबई : ज्या वयात मुलं जेमतेम ए,बी,सी,डी लिहायला शिकतात, त्या वयात एका नऊ वर्षाच्या मुलाने चक्क मोबाईल अॅप्लिकेशन बनवलं आहे. व्योम बग्रेचा हा केवळ नऊ वर्षांचा मुलगा. या वयात मैदानावर मित्रांसोबत खेळायचं सोडून व्योमला सॉफ्टवेअर कोडिंगचा छंद जडला आणि त्याने एक हेल्थ अॅप तयार केलं. व्योम हा सॉफ्टवेअर कोडिंग करतो. त्याने बनवलेलं हेल्थ अॅप गूगल […]
मुंबई : ज्या वयात मुलं जेमतेम ए,बी,सी,डी लिहायला शिकतात, त्या वयात एका नऊ वर्षाच्या मुलाने चक्क मोबाईल अॅप्लिकेशन बनवलं आहे. व्योम बग्रेचा हा केवळ नऊ वर्षांचा मुलगा. या वयात मैदानावर मित्रांसोबत खेळायचं सोडून व्योमला सॉफ्टवेअर कोडिंगचा छंद जडला आणि त्याने एक हेल्थ अॅप तयार केलं. व्योम हा सॉफ्टवेअर कोडिंग करतो. त्याने बनवलेलं हेल्थ अॅप गूगल प्ले स्टोअरवरुन अँड्रॉइड वापरकर्ते डाऊनलोड करु शकतात. व्योमचं हेल्थ अॅप एक सामान्य हेल्थ टूल आहे, ज्यामध्ये एक लीटरमध्ये किती ग्लास पाणी येईल? असे फीचर्स उपलब्ध आहेत. व्योम सध्या पार्किंगशी संबंधित असलेल्या अॅप्लिकेशनवर काम करत आहे. मोठं झाल्यावर त्याला रोबोट्सची कोडिंग करायची आहे. जे पर्यावरणाचं जतन करण्यासाठी उपयुक्त ठरतील.
व्योम बग्रेचा हा मुंबईच्या नाहर इंटरनॅशनल स्कूलमध्ये चौथ्या वर्गात शिकतो. लहाणपणीपासूनच व्योमला संगणक कसं काम करतं, याविषयी जाणून घेण्यात कुतुहल होतं. त्यामुळे त्याच्या आईने त्याला ‘व्हाइट हॅट जूनियर’च्या ‘ऑनलाइन कोडिंग प्रोग्राम’मध्ये दाखल केलं. ‘व्हाईट हॅट ज्युनिअर’ हे एक सॉफ्टवेअर कोडिंग प्लॅटफॉर्म आहे, जे लहान मुलांना लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आलं आहे. ‘व्हाइट हॅट जुनिअर’चे मुख्य कार्यकारी अधिकारी करण बजाज यांनी सांगितलं की, “औद्योगिक क्रांतीदरम्यान खूप कमी विद्यालयांमध्ये गणित शिकवलं जात होतं आणि अभ्यासक्रमामध्ये या विषयाचा समावेश करेपर्यंत मोठ्याप्रमाणात बेरोजगारी वाढली होती. मला कोडिंगच्या बाबतीतही असेच काही घडताना दिसत आहे. मला असं वाटत की कोडिंग हा अभ्यासक्रमाचा भाग असावा.”
सध्या मुलं सर्व प्रकारच्या गोष्टी ऑनलाईन बनवत आहेत. ‘व्हाईट हॅट जूनियर’च्या वेबसाईटला भेट दिल्यावर दिसून येतं की, 10 वर्षाच्या लहान मुलांनी साधे रेखा-चित्र ते गेम्स विकसित केले आहेत. 12 वर्षांच्या सान्वीने ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर 12 सेशन पूर्ण केले आहेत. “तिला अॅप आणि गेम विकसित करायचे आहेत, कारण कोडिंग आता तिच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग बनला आहे”, असं करण बजाज यांनी सांगितलं.
शाळांनीसुद्धा आता परंपरागत संगणक प्रोग्रामऐवजी मुलांसाठी कोडिंग कौशल्याची शिकवण सुरु केली आहे. शैक्षणिक तंत्रज्ञान शिकवणाऱ्या संस्थांनीही कोडिंगचे विशेष कार्यसत्र सुरु केले आहेत. लहानपणापासून मुलांना कोडिंग किंवा इतर तंत्रज्ञानाचं ज्ञान असणे आवश्यक आहे. कारण ते आजच्या काळाची गरज आहे. हे केवळ ज्ञान किंवा माहितीसाठीच नाही, तर उद्योजक होण्यासाठीही त्यांना मदत करु शकतं. त्यामुळे लहानपणीपासूनच जर आपण लहान मुलांना टेक्नॉलॉजीची ओळख करुन दिली तर, भविष्यातील स्पर्धेमध्ये ते नेहमीच पुढे राहतील, कारण हे युग तंत्रज्ञानाचं आहे.