Supriya Sule | सत्याचाच विजय होईल… आत्या गहिवरली; सुप्रिया सुळे आणखी काय म्हणाल्या?
Supriya Sule | रोहित पवार यांना ईडीने चौकशीसाठी बोलविल्यानंतर प्रकरणात महाविकास आघाडीतून जोरदार हल्लाबोल करण्यात आला. खासदार संजय राऊत यांनी खासशैलीतील दारुगोळ्यासह तर खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी सुप्रिया सुळे भावूक झालेल्या दिसल्या.
मुंबई | 24 January 2024 : रोहित पवार यांच्या ईडी चौकशीने सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले आहे. सकाळीच दारुगोळ्यासह आलेले खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. त्यांच्या भेदक माऱ्याने महाविकास आघाडीचा सूर काय असेल हे स्पष्ट झाले होते. तर खासदार सुप्रिया सुळे यांनी पण या कारवाईमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका केली. काहीही झाले तरी विजय सत्याचाच होईल, हे सांगायला त्या विसरल्या नाहीत. यावेळी सुप्रिया सुळे या भावूक झालेल्या दिसल्या. त्यांनी काय ओढले आसूड, काय म्हणाल्या त्या…
ही महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा लढा
“सत्यमेव जयते. सत्याचा विजय होईलच हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे. आवाहन येत राहतील पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू. हा विचार कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांचा आहे. जो वारसा आहे तो पुढे न्यायचं काम पवार साहेबांनी गेले सहा दशके केले आणि तोच महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्यासाठी आम्ही आजही आमची लढाई सुरु आहे.” असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
विरोधकांविरोधात एजन्सीचा गैरवापर
सध्या केंद्रीय यंत्रणांचा विरोधकांविरोधात गैरवापर होत असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारचा ऑफिशियल स्टेटमेंट आहे. याविषयीचा डेटा आहे. त्यानुसार, 90 ते 95 टक्के प्रकरणे विरोधकांची असल्याचे त्यांनी सांगितले. आईस-म्हणजे इन्कम टॅक्स, ईडी आणि इतर यंत्रणा यांचा वापर विरोधकांविरोधात होत असल्याचा आरोप त्यांनी केला. विरोधी पक्षांना त्रास देण्याचा हा प्रकार आहे.
संघर्ष यात्रेमुळेच नोटीस?
रोहित पवार यांना नोटीस मिळणार ही आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही, असे त्या म्हणाल्या. रोहित पवार यांनी मोठी संघर्ष यात्रा काढली. आज महाराष्ट्रामध्ये शेतकरी कष्टकरी शोषित पीडित वंचित आणि नवीन पिढीसाठी रोहित काहीतरी करू पाहत आहेत. त्याच्यामुळे ही कारवाई झाल्याची चर्चा लोकांमध्ये सुरु असल्याचे त्या म्हणाल्या. रोहितचा अनेक वर्षाचा महाराष्ट्रातलं काम युवा पिढीमध्ये त्याच्याबद्दल असलेले प्रेम आणि असता आणि जर कार्यकर्त्यांना वाटत असेल की आपला हा भाऊ खंबीरपणे लढतोय आपल्यासाठी आणि त्याच्यासाठी आपण इथे यावं तर त्याच्यात गैर काय या देशात अजूनही लोकशाही आहे. आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकतीने आणि सत्याच्या मार्गाने लढा देऊ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.