कोविड घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल!, गुन्हा सिद्ध झाल्यास काय होऊ शकते शिक्षा?

पेडणेकर महापौर असताना त्यांनी स्वत:च्यात वेदांत इनोटेक कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. याप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही गुन्हा दाखल झालाय.

कोविड घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल!, गुन्हा सिद्ध झाल्यास काय होऊ शकते शिक्षा?
Follow us
| Updated on: Aug 05, 2023 | 9:54 PM

मुंबई : मुंबई महापालिकेतील कोरोना घोटाळ्यावरून सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला. एकाच दिवशी ठाकरे गटाचे दोन नेते आर्थिक गुन्हे शाखेच्या घेऱ्यात आले. कोविड घोटाळा प्रकरणात दोन गुन्हे आर्थिक गुन्हे शाखेचे किशोरी पेडणेकर यांच्यावर दाखल केले. किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळ्याचा आरोप आहे. मृत पावलेल्या कोरोना रुग्णांसाठी आवश्यक बॉडी बॅग खरेदीत घोटाळ्याचा आरोप आहे. बाजारात तेराशे रुपयांना मिळणारी बॉडीबॅग ६ हजार ८०० रुपयांना खरेदी केल्याचा ठपका किशोरी पेडणेकर यांच्यावर ठेवण्यात आला. पेडणेकर महापौर असताना त्यांनी स्वत:च्यात वेदांत इनोटेक कंपनीला कंत्राट दिल्याची तक्रार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे. याप्रकरणी दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय.

सात वर्षांची होऊ शकते शिक्षा

कलम ४२० म्हणजे फसवणुकीचा गुन्हा सिद्ध झाल्यास ७ वर्षांची शिक्षा होऊ शकते. ४२० हा अजामीनपात्र गुन्हा आहे. किंवा कोर्टातून अटकपूर्व जामीन मिळवावा लागतो. शिवाय कलम १२० ब दोन किंवा अधिक व्यक्तींनी कट करणे होय. यासंदर्भात दोन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय.

आता सोडणार नाही

याबाबत बोलताना किशोरी पेडणेकर म्हणाल्या, मला कळवण्यात आलेलं नाही. मी मराठी आहे. लढत राहणार, असा इरादा पेडणेकर यांनी बोलून दाखवला. कोरोनाच्या काळात चार हजार ९०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. ईडीने या घोटाळ्याचा तपास सुरू केला. लोकं मरत असताना काही जण पैसे कमवत होते. पण, आता सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला होता.

किशोरी पेडणेकर या शिंदे गटात गेल्या नाही. म्हणून तुमचा हा दबावतंत्र सुरू असल्याचं ठाकरे गटाच्या नेत्यांचं म्हणण आहे. दुसरीकडे महापालिकेची जागा हडपून ५०० कोटींची जागा हडपल्याच्या आरोपात आर्थिक गुन्हे शाखेकडून रवींद्र वायकर यांची पाच तास चौकशी झाली. त्यामुळे किशोरी पेडणेकर आणि रवींद्र वायकर हे दोन्ही ठाकरे गटाचे नेते अडचणीत आलेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.