आमचं वकीलपत्र कुणी घेण्याचं कारण नाही; अजित पवार यांनी या नेत्याला खडसावले
बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं झालं. त्यांना कुणी अधिकार दिला कुणास ठावूक. पार्टीची मिटिंग होईल त्यावेळी विचारणार आहे.
मुंबई : भाजपसोबत जाण्याच्या चर्चेला विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. पण, अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यात सामना सुरू झालाय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं बोलू नका. आमचं वकीलपत्र घेण्याचं काही कारण नाही, अशा शब्दात अजित पवार यांनी संजय राऊत यांना खडसावलं. त्यावरून मी शरद पवार यांचे ऐकतो. मी बोलतच राहणार, असं म्हणत संजय राऊत हेही आक्रमक झालेत. अजित पवार म्हणाले, बाहेरच्या पक्षाचे प्रवक्ते हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते झाल्यासारखं झालं. त्यांना कुणी अधिकार दिला कुणास ठावूक. पार्टीची मिटिंग होईल त्यावेळी विचारणार आहे. तुम्ही ज्या पक्षाचे प्रवक्ते आहात त्या पक्षाचं सांगा.
तुमच्या पक्षाच्या मुखपत्राबद्दल बोला. आम्हाला कोट करून असं झालं तसं झालं. असं करू नका. आम्ही आमची भूमिका मांडायला खंबीर आहोत, असं अजित पवार यांनी ठामपणे सांगितलं.
मागे हटणारा माणूस नाही
संजय राऊत म्हणाले, मी खरं बोललो म्हणून मला काही लोकं टार्गेट करतात. मी खरं बोलत राहणार. मला कुणी टार्गेट केलं तरी मी मागे हटणारा माणूस नाही. मी कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं.
मी फक्त शरद पवार यांचे ऐकतो. तपास यंत्रणांचा वापर करून भाजप ऑपरेशन करत आहे. त्यामुळे भाजपवर रागवायला पाहिजे. दुसऱ्या कुणावर नाही, असं संजय राऊत म्हणाले. विरोधकांना फोडण्याचा प्रयत्न होतो की, नाही, यावर बोला, असं संजय राऊत यांनी म्हंटलं.
दादा राऊत यांच्यावर का भडकले?
11 एप्रिल रोजी उद्धव ठाकरे यांच्याकडून सिल्व्हर ओकवर शरद पवार यांची भेट घेतली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यात सव्वा तास बैठक झाली. या बैठकीचा तपशील दुसऱ्याचं दिवशी राऊत यांनी उघड केला.
पक्ष म्हणून भाजपसोबत जाणार नाही. मात्र, ज्यांना वैयक्तिक निर्णय घ्याचा त्यांनी घ्यावा, असं शरद पवार म्हणाल्याचं राऊत यांनी सांगितलं. त्यानंतर पुन्हा सामनातून लोकशाहीही धूळधाण, फोडाफोडीचे सीझन – दोन अशा शिर्षकाखाली लेख लिहिला. या केंद्रस्थानी अजित पवार होते.