धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला गर्दुल्याने बांबूचा फटका मारला, तरुणाने दोन्ही पाय गमावले

मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या लोकलमधून प्रवास करताना प्रवाशांच्या हातावर फटका मारून त्यांच्या हातातील मोबाईल आणि पर्स आदी वस्तू हिसकविण्याचे प्रकार पुन्हा वाढले आहेत. या प्रकरणात रेल्वेची गस्त कमी झाल्यानेच चोरट्यांचे फावल्याचे म्हटले जात आहे.

धावत्या लोकलमध्ये प्रवाशाला गर्दुल्याने बांबूचा फटका मारला, तरुणाने दोन्ही पाय गमावले
man lost both legs in robber attackImage Credit source: TV9MARATHI
Follow us
| Updated on: May 26, 2024 | 3:20 PM

मुंबईतील लोकलच्या दारात उभ्या असलेल्या एका तरुणाला पुन्हा गदुर्ल्याने फटका मारल्याने तो खाली कोसळून त्याच्या पायांवरुन लोकल गेल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत संबंधित तरुणाने दोन्ही पाय कायमचे गमावल्याने हळहळ व्यक्त होत आहे. यापूर्वी देखील एका पोलिस जवानाच्या हातावर गुर्दुल्याने फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडला होता. तो शोधायला ट्रेनच्या खाली उतरलेल्या पोलिस जवानाला इंजेक्शनमधून कसला तरी द्रवपदार्थ टोचल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे दिवसेंदिवस लोकलचा प्रवास जीवघातक बनत चालला आहे. या फटका गॅंगचा उपद्रप पुन्हा वाढल्याने मध्य रेल्वेच्या पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

लोकलमधून प्रवास करीत असताना प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असतो. कल्याण येथे राहणारे 31 वर्षीय जगन लक्ष्मण जंगले या प्रवाशाला लोकलच्या दारात उभे राहून मोबाईलवर बोलणे महागात पडले आहे. प्रवासी जगन याच्या हातावर एका गर्दुल्याने फटका मारल्याने तो लोकलखाली कोसळला. त्यामुळे त्याच्या पायांवरुन लोकल गेल्याने त्याला दोन्ही पाय निकामी झाले आहेत. जगन याच्यावर ठाण्यातील एका खाजगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणात रेल्वे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र पोलिसांनी यावर काहीही बोलण्यास नकार दिला आहे.

कुटुंबाचा आधार जायबंदी

दादरमधील मॅजेस्टिक बुक स्टॉलमध्ये कामाला असलेल्या जगन यांनी 22 मे रोजी दादर स्थानकातून रा. साडे आठ वाजताची कल्याणला जाणारी लोकल पकडली. लोकलच्या दरवाजात उभे असलेल्या जगन यांच्या हातातील मोबाइल हिसकावण्यासाठी एका गर्दुल्याने ठाणे स्थानक सोडल्यानंतर त्यांच्या डाव्या हातावर लाकडी दांडक्याने फटका मारला. या हल्ल्यात जगन यांचा तोल गेल्याने ते लोकलमधून फलाट क्रमांक दोनपासून 200 मीटर पुढे खाली पडले. त्यांचा मोबाइलही गहाळ झाला. ते मदतीसाठी धावा करीत असतानाच जगन यांच्या दोन्ही पायांवरून लोकलची चाके गेल्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना काही प्रवाशांच्या मदतीने रेल्वे पोलिसांनी तातडीने कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने आणि पायावर तातडीने शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याने त्यांना ठाण्यातील ढोकाळी येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या रुग्णालयात त्यांचे दोन्ही पाय शस्त्रक्रिया करून कापावे लागले. घरात एकुलता एक कमावणारा असलेल्या जगनची आर्थिक स्थिती बिकट आहे. नुकतेच त्याचे लग्न देखील झाले आहे. त्याची प्रकृती आता स्थिर असली तरी त्यांचे दोन्ही पाय गमवावे लागल्याने त्यांच्या चरितार्थाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

कायमस्वरुपी बंदोबस्त हवा

मध्य रेल्वेच्या रेल्वे रुळांशेजारी फटका गॅंग कार्यरत असून ओव्हरहेडच्या खांबावर हे गर्दुल्ले चोरटे दबा धरुन बसलेले असतात. एखादा प्रवासी लोकलच्या दारात उभा असला आणि मोबाईल बोलण्यात गुंग असला की हे लाकडी बांबूने त्याचा हातावर फटका मारुन त्याचा मोबाईल खाली पाडतात. त्यानंतर हा मोबाईल घेऊन चोरटे पसार होतात. या फटका गॅंगवर कारवाई केल्याची आकडेवारी मध्य आणि पश्चिम रेल्वेचे आरपीएफ आणि जीआरपी पोलिस नेहमी जारी करते, परंतू थोड्या दिवसांनी पुन्हा ही फटका गॅंग डोके वर काढते अशी टीका प्रवासी संघटनांनी  केली आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.