आरेतील वृक्षतोड करणाऱ्यांना Pok मध्ये पाठवा : आदित्य ठाकरे
आरेतील रात्रभरापासून तणावाचे वातावरण (Aarey tree cutting) पाहायला मिळाले. याप्रकरणी पर्यावरण प्रेमींसह राजकीय नेत्यांनीही (Political comment on Aarey tree cutting) संताप व्यक्त केला आहे.
मुंबई : आरे कॉलनीतील मेट्रो कारशेड प्रकरणी सर्व याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळल्यानंतर आरेत एका रात्रीत शेकडो झाडांची कत्तल करण्यात (Aarey tree cutting) आली. शुक्रवारी (4 ऑक्टोबर) रात्रीच्या सुमारास आरे कॉलनीतील जवळपास 250 ते 300 झाडांवर कुऱ्हाड चालवण्यात आली. पर्यावरणी प्रेमींना आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास विरोध (Aarey tree cutting) केला असता, अनेकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. या सर्व गोष्टीमुळे आरेतील रात्रभरापासून तणावाचे वातावरण (Aarey tree cutting) पाहायला मिळाले. याप्रकरणी पर्यावरण प्रेमींसह राजकीय नेत्यांनीही (Political comment on Aarey tree cutting) संताप व्यक्त केला आहे.
आरेतील वृक्षतोडीला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनीही विरोध दर्शवला आहे. “आरेतील जैवविविधता संपवण्याचा हा घाट लज्जास्पद आहे. अधिकारी ज्या तत्परतेने आरेतील झाडांची कत्तल करत आहेत, त्यांना पाकव्यापत काश्मीरमध्ये पाठवायला हवं. त्यांना पाकव्यापत काश्मीरमधील दहशतवादी तळ उद्धवस्त करण्याचे काम सोपवायला हवं,” असा संताप आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray on Aarey tree cutting) व्यक्त केला आहे.
The vigour with which the @MumbaiMetro3 is slyly and swiftly cutting down an ecosystem in Aarey is shameful and disgusting. How about posting these officials in PoK, giving them charge to destroy terror camps rather than trees?
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 4, 2019
याप्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी एक फोटो ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे. यात न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधली आहे. त्या पट्टीवर “आरे ही वन जमीन नाही” असे लिहीले आहे. संजय राऊत यांनी आरे वृक्ष तोडीवरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. संजय राऊत यांच्या या ट्विटनंतर अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. “तुम्ही सत्तेत आहात, आरेच्या मुद्द्यावरुन युती तोडा” असेही काहींनी यात म्हटलं आहे.
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 5, 2019
गेले तीन-चार महिने सगळीकडे आरे आरे करत आहेत. आरेतील झाडं कापण्यावरुन काहीजण आरेला उत्तर कारे म्हणून करत होते. पण आता सगळीकडे झोपारे कुणी बोलायलाच तयार नाही. कालपासून आरेतील झाडं कापण्यास सुरुवात झाली. आरे वाचवण्यासाठी कुणी झाडाला मिठ्या मारणार होते. कुणी एकही झाड तोडू देणार नव्हते. कुठे गेले कारे करणारे, आरेला कारे करणारे सर्व एक झालेत, अशी संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
#SaveAarey #SaveAareyForest #RetweeetPlease pic.twitter.com/Lx4gGZY0c7
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) October 4, 2019
मुकबधीर-अपंग मुलांवर पुण्यात केलेला लाठीमार आठवा, हे भाजपा-सेनेवाले इतके असंवेदनशील आहेत. जे मुक्या माणसांना सोडत नाही त्यांच्याकडून मुक्या झाडांना वाचवण्याची अपेक्षा करणं हाच आपला गुन्हा आहे. २१ तारखेला मतदान करतांना ह्या असंवेदनशील घटना विसरू नका… #YutiKilledAarey #SaveAarey pic.twitter.com/e6KzyMXSfH
— Satyajeet Tambe (@satyajeettambe) October 5, 2019
मध्यरात्री झाडे तोडण्याचा सरकारचा निर्णय युती सरकारच्या क्रूर वृत्तीचे दर्शन घडवतो. दुसऱ्या दिवशी सकाळी कोणीही सर्वोच्य न्यायालयात जाऊन उच्च न्यायालयाच्या निर्णयावर स्थगिती घेऊ नये, म्हणून मध्यरात्रीच झाडे कापण्यात आली. @NCPspeaksच्या वतीने मी याचा तीव्र निषेध करतो. #SaveAarey pic.twitter.com/7qZEGcr8P7
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) October 5, 2019
मेट्रोच्या कारशेडसाठी आरेला नष्ट करणाऱ्या सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या निसर्गप्रेमींचा आवाज घोटण्याचं काम पोलिसांनी केलं. वृक्ष तोडीला विरोध करणाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. रातोरात ४०० झाडांची पोलीस पहाऱ्यात कत्तल केली. सरकार किती ‘आरे’रावी करणार? जाहीर निषेध. #AareyForest pic.twitter.com/1h2arxN1IP
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) October 5, 2019
.@ShivSena हीच ती वेळ आहे! सरकार मध्ये आहात, हे थांबवू शकता. महायुती महत्वाची का झाडांची महातुटी? કેમ છો #AareyForest तरी म्हणा, निदान!
— Sachin Sawant (@sachin_inc) October 5, 2019
संध्याकाळ झाली की आजी जवळ घ्यायची. तुळशीला दिवा लावायची. नमस्कार करायला लावायची. आणि सांगायची, अवि आता झाडं झोपायची वेळ झाली.
हे संस्कार होत वाढलो आम्ही. ह्या विकृतांनी रात्री झाडांवर करवती चालवल्या.
आतडं तुटतं हे बघून. कसले अमानुष आहेत हे.
छी. घृणा.
— amey tirodkar (@ameytirodkar) October 4, 2019
“आरे” बाबत निकाल देताना मुंबई उच्च न्यायालयानं जी टिप्पणी केली आहे ती गोंधळात टाकणारी आहे. त्यांनी मूळ मुद्यापेक्षा तो मांडण्याची पध्दत कशी चुकली ह्यावर टिका केली आहे.. न्यायशास्त्रात हे नवं आहे. न्याय मागण्याची पध्दत चुकली असली तर न्याय होणार नाही का? #आरे #AareyForest
— Anil Shidore (@anilshidore) October 5, 2019