महाराष्ट्राच्या मनातील एकच प्रश्न, राज ठाकरे सोबत यावेत काय?; आदित्य ठाकरे यांचं थेट उत्तर काय?

| Updated on: Feb 23, 2023 | 6:49 AM

सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला तर सर्व गद्दार आमदार अपात्र होतील. केव्हा ना केव्हा ते अपात्र होतीलच. चाळीस लोकांपैकी एकाने सुद्धा म्हटले नाही की आम्ही 50 खोक्यांना हात लावला नाही.

महाराष्ट्राच्या मनातील एकच प्रश्न, राज ठाकरे सोबत यावेत काय?; आदित्य ठाकरे यांचं थेट उत्तर काय?
raj thackeray
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नंदकिशोर गावडे, टीव्ही9 मराठी प्रतिनिधी, मुंबई : शिवसेनेत बंड होण्यापूर्वीपासून आणि बंडानंतरही एकच प्रश्न सातत्याने विचारला जात आहे. तो प्रश्न महाराष्ट्रभरातून विचारला जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे काय? प्रत्येक मराठी माणसाला पडलेला हा प्रश्न आहे. त्याचं उत्तर माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे घराण्यातील महत्त्वाची व्यक्ती असलेल्या आदित्य ठाकरे यांनी दिलं आहे. आता जे सोबत आहेत. तेच आमचं कुटुंब आहे, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

TV9 Marathi Live | Sanjay Raut Vs Shrikant Shinde | Supreme Court Hearing | Pune Election | Shivsena

दैनिक लोकमतला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरे यांनी राज ठाकरे सोबत यावेत का? या प्रश्नाला थेट उत्तर दिलं. आता जे आमच्या सोबत आहेत तेच आमचं कुटुंब आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमचे राजकीय विरोधक आहे. मात्र, ते अजूनही आमचे मित्रच आहेत. आमच्यात कधीच कटुता नव्हती. आम्ही कधीच कोणती गोष्ट पर्सनल घेत नाही. तसं आमच्या घरातील वातावरण आहे, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

वैयक्तिक शत्रूत्त्व नाही

आतापर्यंत शिवसेनेवर अनेक आरोप झाले. मात्र आम्ही उत्तरं देताना कधीच चुकीची वक्तव्ये केली नाही. कधीच राजकीय चुकीची विधाने केली नाही. फडणवीस आणि आम्ही राजकारणात विरोधक आहोत. पण आमचं वैयक्तिक शत्रूत्व नाही, असं आदित्य यांनी स्पष्ट केलं.

जे सोबत येतील त्यांना घेऊ

वंचितसोबतच्या युतीवरही त्यांनी भाष्य केलं. महाविकास आघाडीमध्ये आम्ही आहोत. राष्ट्रवादी आणि काँग्रेस आमचे मित्र आहेत. जो आमच्यासोबत येत असेल तर त्यांना आम्ही सोबत घेऊन जाणार, असं त्यांनी स्पष्ट केलं.

कधी ना कधी अपात्र होणारच

सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला तर सर्व गद्दार आमदार अपात्र होतील. केव्हा ना केव्हा ते अपात्र होतीलच. चाळीस लोकांपैकी एकाने सुद्धा म्हटले नाही की आम्ही 50 खोक्यांना हात लावला नाही. जर कोणती चोरी नाही केला तर समोर येऊन सांगा. सुरत, गुवाहाटी, गोव्याला पळून गेला. अजूनही सेक्युरिटी घेऊन फिरता याचा अर्थ काय होतो? असा सवाल त्यांनी केला.

म्हणून जंगल घोषित केलं

आरेच्या कारशेडवरही त्यांनी पुन्हा भाष्य केलं. आरेची गोष्ट साफ होती. आम्ही जंगल घोषित केलं होतं. कारशेडची ती जागा होती. ती हलवण्यात यायला हवी होती. आधी तिथे पाच लिओ पोर्ट आहेत. मग जंगल आहे. त्यामुळे ते नष्ट का करावे ही आमची भूमिका होती, असं त्यांनी स्पष्ट केलं.