Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील पब आणि बारवर कारवाई करणार, आदित्य ठाकरेंची घोषणा

पालकमंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी नियम मोडणाऱ्या पब आणि बारवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. Aaditya Thackeray Aslam Shaikh

टीव्ही 9 इम्पॅक्ट : वरळीतील पब आणि बारवर कारवाई करणार, आदित्य ठाकरेंची घोषणा
आदित्य ठाकरे, पर्यावरण मंत्री
Follow us
| Updated on: Mar 01, 2021 | 1:38 PM

मुंबई: पर्यटन आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्या वरळी मतदारसंघात मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला केराची टोपली दाखवली गेल्याचं समोर आलं होतं. वरळीतील नाईट क्लबमध्ये तुफान गर्दीमध्ये कोरोनाचे सर्व नियम धुडकावत जोरदार पार्टीच आयोजन केले होते. वरळीतील कमला मिलमधील सर्व पब मध्ये गर्दी झाली होती. तेथील ट्विस्ट या पबमध्ये तुफान गर्दी झाल्याची बातमी टीव्ही 9 मराठीनं दाखवली होती. आदित्य ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर यांच्या मतदार संघात कोरोनाचे सर्व नियम धाब्यावर बसवले गेल्यानं विरोधकांकडून टीकास्त्र सोडलं गेले होते. टीव्ही 9 मराठीच्या बातमीची दखल घेत पालकमंत्री अस्लम शेख आणि आदित्य ठाकरे यांनी नियम मोडणाऱ्या पब आणि बारवर कारवाई करण्याची घोषणा केली आहे. (Aaditya Thackeray said action will taken on pub and bar in worli)

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

वरळीतील पब आणि बारमध्ये कोरोना नियमांचे उल्लंघन झाले असल्यानं त्याची माहिती घेऊन कारवाई करणार असल्याची घोषणा आदित्य ठाकरेंनी केली आहे. वरळीत घडलेल्या प्रकाराची माहिती घेणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केले.

अस्लम शेख यांचे कारवाईचे निर्देश

पब असुद्या किंवा रेस्टॉरंट किंवा लोक असतील ज्यांनी मास्क नाही तर कारवाई करण्यात आली आहे. काही पबच्या व्हिडीओ मिळाल्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. वेळ पडलीच तर त्यांचा परवाना रद्द केला जाईल, असंही अस्लम शेख म्हणाले. प्राथमिक कारवाई झाली आणि ते रेस्टॉरंट किंवा पब ऐकत नसतील तर सील करून परवाना रद्द केला जाईल, असंही ते म्हणाले.

वरळीतील प्रकारावर देवेंद्र फडणवीसांचं टीकास्त्र

विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नाईट लाईफ आणि कोरोना निर्बंधांवरुन पर्यटनमंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र सोडलं. वरळी हा आदित्य ठाकरेंचा मतदारसंघ असून तिथं त्यांचेच चालते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्यानं पब आणि बार बिनधास्त सुरु असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोरोना हा फक्त शिवजयंती आणि अधिवेशनाच्या वेळी असतो नाईटलाईफला नसतो, असा टोला देखील त्यांनी लगावला.

वरळीतील नाईटलाईफवरुन आशिष शेलारांचं टीकास्त्र

वरळीतील नाईट लाईफमध्ये प्रेमी युगुल किंवा प्रेम दाखवण्यासाठी पब आणि बारमधील लोकांमुळे कोरोना पसरत नाही, असं मुख्यमंत्री कार्यालयानं म्हणून एवढीच अपेक्षा असल्याचं आशिष शेलार म्हणाले. शिवजयंतीला परवानगी दिली जात नाही पण वरळीतील पब आणि बारला परवानगी दिली जाते, असा आरोप शेलार यांनी केला.

संबंधित बातम्या:

वरळीत आदित्य ठाकरेंचंच चालतं, त्यांनी सांगितल्यानेच पब-बार बिनधास्त सुरु : देवेंद्र फडणवीस

अजित पवार क्यूँ डरते है? देवेंद्र फडणवीसांनी हत्यार उपसलं

(Aaditya Thackeray said action will taken on pub and bar in worli)

आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?
आमदाराच्या पीएच्या बायकोचा मंगेशकर रुग्णालयात मृत्यू, अहवालात काय?.
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला
हिंदुत्वावरून प्रफुल्ल पटेल अन संजय राऊत भिडले, रंग बदलला vs बाप बदलला.
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार
'तर बरं झालं असतं', राऊतांच्या 'त्या' टीकेवर प्रफुल्ल पटेलांचा पलटवार.
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं
पुण्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, 'दीनानाथ मंगेशकर'च्या पाटीला काळं.
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट
राज्यभरात अवकाळी पावसाचा हैदोस IMD कडून मुंबईसह 'या' जिल्ह्यांना अलर्ट.
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक
दीनानाथ मंगेशकर रूग्णालयाबाहेर शिवसैनिक आक्रमक, घोषणाबाजीसह चिल्लर फेक.
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?
महिला मजूरांना घेऊन जाणारा ट्रॅक्टर विहिरीत अन्..नांदेडमध्ये काय घडलं?.
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
'शिंदे, पवार तोंडाला पोपट बांधून फिरतात', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?.
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?
शरद पवार यांचा बाप...बापाच्याच पाठीत खंजीर; राऊतांच्या निशाण्यावर कोण?.
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत
'हा दलाल... माझ्या नादाला लागू नको, नाहीतर नागडा करीन मी...'- राऊत.